Skip to main content

//उपविभागीय दंडाधिकारी न्यायालयाकडे प्रशांत वाठोरे यांची जन सामान्य हित याचीका दाखल//






(ता .प्र. किनवट )


शहरात उद्भवणारा सार्वजनिक उपद्रव किनवट शहरात आज गंभीर रुप धारण केले आहे यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आलेच आहे 

त्यामध्ये गाढवांच्या सार्वजनिक रस्त्यावरच्या मस्ती मुळे सर्वसामान्याचे अपघात होत आहेत. तसेच किनवट शहरवासी व व परिसरातील नागरिक त्यांच्या दुचाकी सार्वजनिक रस्त्यावर बेशिस्तपणे लावत असल्यामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. तसेच किनवट शहरातील सार्वजनिक रस्त्यावर गल्लोगल्ली सदृढ शरीर धारण करणारे भिकारी हे तर फार सर्वसामान्याला भावनिक साद देऊन ते जनसामान्यांना एक प्रकारचा त्यांच्या मनाच्या विरुद्ध कृती करण्यास भाग पाडून सार्वजनिक उपद्रव देत आहेत. यासंबंधातील अनेक बातम्या अनेक वर्तमानपत्रांमध्ये छापून सुद्धा आलेल्या आहेत किनवट वासी व परिसरातील जनसामान्यांच्या त्रासाचे कारण हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत जाते म्हणून की काय परिसरातील नामवंत पत्रकार श्री प्रशांत रतन वाठोरे यांनी 2 फेब्रुवारी 2021 रोजी उपविभागीय दंडाधिकारी साहेब किनवट यांच्या न्यायालयात फौजदारी कलम 133 व भारतीय दंड विधान कलम 188 प्रमाणे त्यांच्या विधिज्ञ मार्फत जनसामान्यांच्या हितासाठी सार्वजनिक उपद्रव थांबवण्याबाबत याचिका दाखल केली आहे सदर याचिकेवर काय निर्णय होईल याची किनवट शहरातील व परिसरातील जनसामान्य हे कुतूहलाने वाट बघत आहेत. सार्वजनिक उपद्रव काढून टाकणे हे स्थानिक स्वराज्य संस्थेचा कर्तव्य आहे या कर्तव्य मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था कसूर करत आहे का ? की नागरिक स्वराज्य संस्थेच्या म्हणजेच किनवट नगरपालिकेच्या आदेशाचे पालन करत नाहीत याचाही खुलासा हे याचिकेद्वारे जनसामान्यांना कळणार आहे.




सदर याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी त्याच्या याचिकेमध्ये 'गेल्या अनेक दिवसापासून किनवट शहरात व परिसरात सार्वजनिक रस्त्यावर मोकाट गाढवे फिरत असल्यामुळे अनेक अपघात झाले आहेत" म्हणजे सर्वसामान्य माणसाला जीवघेणा त्रास सहन करावा लागत आहे सदर सार्वजनिक उपद्रव काढून टाकण्याचे अधिकार हे नगरपालिकेला आहेत.तसेच किनवट मध्ये व परिसरात मोकाट गुरे, डुकरे, यामुळे अपघाताचे प्रमाण तर वाढलं आहे परंतु ते करत असलेल्या घाणीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच शहरात सार्वजनिक उपद्रव देणार कुत्रे, डुकरे, गायी-म्हशी मोठ्या प्रमाणात सर्व सामान्य नागरिकांना उप्द्व्याप देत आहेत. तसेच तसेच गाढवाच्या मस्ती मुळे अनेक अपघात झाले आहेत शहरात सार्वजनिक रस्त्यावर वाहने दुचाकी कोठेही पार्क केल्या जाते त्यामुळे ट्रॅफिक जामचा प्रभाव दिसून येत आहे. बेशिस्तपणे वाहन पार्क करणार्‍यावर नगरपालिका तसेच पोलीस प्रशासन कारवाई करू शकते सदर सार्वजनिक उपद्रव त्वरित थांबविण्यात यावा यासाठी परिसरातील नामवंत पत्रकार श्री प्रशांत वाठोरे यांनी दंडाधिकारी साहेब यांच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे सदर याचिकेची दखल न्यायदंडाधिकारी साहेबांनी घेतलेली आहे किनवट वासियांचा सार्वजनिक उपद्रव लवकरच कमी होणार आहे असे आज तरी आपल्याला म्हणावे लागेल कृती आणि अपेक्षा यामध्ये फरक आहे सदर सार्वजनिक उपद्रव कमी होण्यासाठी प्रशासन काय खंबीरपणे पावले उचलते याकडे किनवट वाशी व परिसरातील जनसामान्यांचे लक्ष लागून आहे.



Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...