Skip to main content

मांडवी येथे आमदार भिमराव केराम यांच्या हस्ते विविध कामाचे भूमिपूजन व वन परिक्षेत्र अंतर्गत वन्यप्राणी नुकसान भरपाई अनुदान वाटप

 


  (मांडवी  प्रतिनिधी इंद्रपाल कांबळे)

 कै. बळीराम पाटील शासकीय ग्रामीण रुग्णालय मांडवी येथे प्रसूती कक्ष व विस्तारीकरण या कार्यक्रमाचे भूमिपूजन व वन परिक्षेत्र अंतर्गत वन्यप्राणी नुकसान भरपाई अनुदान वाटप नुकतेच किनवट माहूर विधानसभाचेआमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पार पडले.

 व तसेच मांडवी येथील जुने जिल्हा परिषद शाळेतील परिसरात संस्कृती भवन या सभागृहाचे लोकार्पण सोहळा पार पडला .

मा. आमदार यांच्या स्थानिक विकास निधीतून मुख्य रस्त्याला लावलेल्या पाच लाखाच्या हायमॅक्स दिव्याचे लोकार्पण करण्यात आले.

 यावे माननीय आमदार व माहूर येथील अध्यात्मिक गुरु श्याम भारती महाराज यांची उपस्थिती विशेष होती. प्रस्तुती कक्ष भूमिपूजन पार पडताना मा.आमदार साहेबांनी आपले विचार मांडत असताना असे सांगितले की मांडवी परिसरामध्ये आरोग्य विषयी अधिक कामे असून सदैव काम करण्यास मी तात्पर्य तयार आहे यापूर्वी पण या विभागावर रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानंतर आता दवाखान्याची विस्तारीकरण करण्यासाठी प्रयत्न केल्या जाईल असे सांगण्यात आले इथून समोर ग्रामीण विभागाचे अनेक कामे प्रलंबित असून सर्व पूर्ण करण्याचे प्रयत्न चालू आहे असे आमदार साहेबांनी सांगितले मांडवी मेण रस्त्याचे काम रुंदीकरणाचे हाती घेतलेले असून लवकरच पूर्ण केल्या जाईल असे साहेबांनी सांगितले मांडवी येथील विद्युत महामंडळाची नवीन कार्यालय सुरू केले जाऊन त्याच्यामुळे परिसरातील समस्या सोडवल्या जाईल असे आमदार साहेबांनी सांगितले.

 अध्यात्मिक गुरु श्याम भारती महाराज यांची उपस्थिती ही विशेष होती यावेळी अनेक मान्यवर हे उपस्थित होते.

 जिल्हा परिषद सदस्य बाबाराव राठोड. पंचायत समिती सदस्य इंदल राठोड .भाजपा प्रदेश सदस्य संध्याताई राठोड .प्रफुल्ल राठोड .माजी सरपंच दलाल पवार .भाजपा तालुका अध्यक्ष संदीप केंद्रे .माजी नगराध्यक्ष किनवट अनिल तीरमानवार. शासकीय इंजिनियर रमेश बधेवार. वैद्यकीय अधिकारी किनवट मुलमुले साहेब .डॉ. विक्रम राठोड व अन्य मान्यवर उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...