Skip to main content

Posts

Showing posts from January, 2021

किनवट मध्ये विविध ठिकाणी पोलिओ लसीकरणाला सुरवात

  (ता. प्र. किनवट): दि.३१ जाने. "दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दर वेळी" या शासनाच्या ब्रीदवाक्या प्रमाणे किनवट मध्ये शासकीय नागरी दवाखाना, सिद्धार्थ नगर जेतवन बुद्ध विहार बुथ, साठे नगर बुथ, बस्टँड बुथ व इतर सार्वजनीक ठिकाणच्या बुथवर पोलीओ लसीकरणाला सुरवात झाली व पल्स पोलिओ लसीकरण झाले याची सुरवात किनवट नगरीचे  नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी बालकाला पोलीओ पाजवुन केली यावेळी डॉ. किरण नेम्मानीवार, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार,  डॉ.जडते, सतीश गुरु, सुनिल बगाटे, माने सर, साहेरा परवीना, रत्नमाला भरणे , सपना चव्हाण, परीचारिका वाडे , श्रीनिवास आरपेल्लीवार,श्रीकांत माने तथा महाविद्यालयीन विद्यार्थी आदि उपस्थित होते व प्रत्येकांनी घरोघरी जाऊन पोलीओ विषयी जनजागृती केली. तर सिद्धार्थ नगर / साठे नगर बुथ वरील अंगनवाडी सेविका आरोग्य सहायक प्रेमीला हाटकर , सिमा राठोड, अर्चना ढाकणे आदिंनी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवत आहे.

किनवट शहरात गाढवांचा हैदोस प्रशासनाचे दुर्लक्ष

 (ता . प्र. किनवट) किनवट शहरात गाढव राज सुरू झाले असून शहरात जिकडे तिकडे गाढवेच गाढवे दिसून येतात. तसेच या शहरात कुत्रे, डुक्करे, शेळ्या, गाई,म्हशी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर दिसून येतात. त्यामुळे माणसे कमी प्राणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच डुकरांची मस्ती, गाढवांची मस्ती, रस्त्यावर दिसून येत आहे त्यामुळे शहरात अपघाताच्या प्रमाणात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. किनवट येथील धडाडीचे पत्रकार लोकादेश चे संपादक साजिद बडगुजर यांचा अपघात गाढवा मुळेच झाला. त्यांना आपला एक पाय गमवावा लागला. पाय फॅक्चर झाल्यामुळे त्यांना यवतमाळ येथे हलवावे लागले त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाली असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर( चांगली )आहे. परंतु असे अनेक अपघात आतापर्यंत झाले आहेत. व ते होतच असतात याचे काही प्रशासनास देणे घेणे नाही. त्याकडे नगरपालिका प्रशासन ढुंकूनही पाहत नाही किंवा त्यावर कोणतीही उपाययोजना ही करीत नाही हे असेच चालू आहे यावर जनतेनेच विचार करायला हवा. किनवट ला लागूनच पैनगंगा नदी आहे. अनेक वर्षापासून नदीतील रेती घाटांचा लिलाव झालेला नसल्यामुळे ट्रॅक्टरने रेती बंद झाली आहे त्याम

प्रजासत्ताक दिना निमित्त उपविभागीय जिल्हा कार्यालयात शोटोकान इंटरनॅशनल कराटे असोसिएशनच्या विद्यार्थ्यांचे चित्तथरारक प्रदर्शन

 (तालुका प्रतिनिधी किनवट) ७२ व्या प्रजासत्ताक दिना निमित्त किनवट येथील उपविभागीय कार्यालयात सहायक जिल्हाधिकारी एस. किर्तीकुमार पुजार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले व संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले या वेळी आमदार भिमराव केराम, उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार नाईक, तहसिलदार  उत्तम कागणे, निरीक्षक मारोती थोरात, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, श्रीनीवास नेम्मानीवार, माजी नप अध्यक्ष इसाखान स. खान, पत्रकार मंडळी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते त्या नंतर शोटोकान इंटरनॅशनल कराटे असोसिएशनच्या वतीने कराटेचे चित्तथरारक प्रदर्शन विद्यार्थ्यांनी करून दाखवले शोटोकान कराटे असोसिएशनचे प्रमुख संदीप यशीमोड, सहाय्यक मारोती यशीमोड, दिपक पालकर, किरण दरडे, गोदावरी यशीमोड, रोमा गादेकर स्टुडंट्स ओजस्वी मुंडे, शिवांश मेंडके, शर्वरी पत्की, संस्कृती सुंकरवार, किट्टु सुंकरवार, निर्भया मुंडे, पिहु राठोड, भक्ती कोरडे, मोक्ष नेम्मानिवार, खुशी लाखकर, कनिष्का चिल्लावार, याना जाधव, प्राचीका कटारे, संगमेश्वरी चव्हाण, ओवी पत्की, रुषी बोईनवाड, शिवसिद्धी चव्हाण आदी विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट असे कराटे प्रदर्शन दाखवु

*गेली १५ वर्षा पासुन पाठपुरावा करून देखील हमाल कॉलनीत रस्ता नसल्याने कामगारांचे उप विभागीय कार्यालया समोर उपोषण*

  ता. प्र. किनवट : गेली १५ वर्ष सतत पाठपुरावा करून देखील नगर परिषदे अंतर्गत येणार्‍या हमाल कॉलनी ते हबीब कॉलनी रस्ता नसल्याने तेथील नागरिकांना चिखलातुन वाट काढावी लागत आहे या करीता न.प. प्रशासनाकडे दाद मागुनही व आदेशीत असुन देखील न.प. प्रशासन टाळा टाळ करीत असल्याचे दिलदार गाडी हमाल सहकारी संस्थेचे , संघटनेचे सचीव किशनराव यांनी सांगितले आहे या करीता या करीता मोईन चव्हाण अध्यक्ष दिलदार गाडी हमाल सहकारी संस्था, युवराज सकत, शे. मगदुम शे . हाजी, देवीदास लामटीले, शेख अमीर हुसेन, सुख देव सिडेकर आदी कामगार उपोषणास बसले आहेत

किनवट ते माहुर १६१ राष्ट्रीय महामार्गा वर अनधीकृत क्र.९७/४४० नालीचे बांधकामा मुळे यंशवत कावळे या शेतक-यांचे उपोषण सुरु

किनवट ते माहुर १६१ राष्ट्रीय महामार्गा वर अनधीकृत नालीचे बांधकामा मुळे यंशवत कावळे या शेतक-यांचे उपोषण सुरु शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी व कॉर्पोरेशन प्राईव्हेट लि. ने अनधिकृत बांधकाम का केले शेतकरी यशवंत कावळे न्यायाच्या प्रतिक्षेत..... (ता. प्र. किनवट) किनवट ते माहुर १६१ राष्ट्रीय महामार्गा वरील पुलाचे काम चालु असतांना देखील शेतकरी यंशवंत कावळेच्या शेता समोर अनधीकृत नालीचे बांधकाम शारदा कन्स्ट्रक्शन कंपनीने केले असल्याचा आरोप शेतकरी यंशवंत कावळे यांनी केला आहे २०१९ मध्ये छोटी मोरी क्र.९७/४४० ची आवश्यकता नाही असा अहवाल प्राप्त झाला परंतु पुन्हा ह्या मोरी ची बांधकाम आवश्यकता नसताना शेतकरी यंशवंत कावळे यांना त्रास का दिला जातोय या करीता यांनी परीवारासह उपोषण करता आहे  २०१९ मध्ये तेव्हां संबधीत अभियंता यांनी लेखी आश्वासन देऊन उपोषण मागे घ्यायला लावले परंतु याची अंमल बजावणी झाली नसल्याचे त्यांनी सांगीतले सहाय्यक जिल्हाधिकारी त्यांना न्याय देतील अशी त्यांना अपेक्षा आहे.

ग्रा. प. कोठारी (सिं.) येथिल प्रधानमंत्री आवास योजनेतील खरे घरकुल लाभार्थी लाभा पासुन वंचीत

 उपोषणाची दखल घेऊन गट विकास अधिकारी प.स. किनवट यांनी१५ दिवसात प्र.आ.यो. संबंधी चौकशीचे करण्याचे व दोषीवर कार्यवाही करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे (बातमीदार: कोठारी (सि.) इंद्रपाल कांबळे) किनवट तालुक्यातील ग्रा.प. कोठारी (सिं) येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थींचे पक्के घर असल्याचा खोटा ठराव देवुन खऱ्‍या लाभर्थ्यावर अन्याय होत असल्याने त्यांनी दि.२५ रोजी उपोषणाचा मार्ग पत्करला आहे आमच्या प्रतिनिधींनी वंचीत असलेल्या लाभार्थ्याशीं संवाद साधला असता १ ते५ प्रमाणे२०२०-२१ च्या जि. ओ. टाँकींग क्रमवारीनुसार ५६ नंतर ९१,९४,११०,१२१,१२८,१६०,१६१,१६४, व१८३ मध्ये लाभ मिळाला परंतु ५६ नंतर१८३ आतील सुटलेल्यानां लाभ का मिळाला नाही उलट काहींनी शेतात खरे बांधली या मध्ये ग्रा.से., अभियताचे साटलोट तर नाही ना तेव्हां या घटनेची सखोल चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे या अमरण उपोषणास १) सुभाष उद्धव आडे, २)तुकाराम हिरासिंग राठोड,३) मनोज मधुकर राठोड,४) उमेश जोगराम चव्हाण५) दत्ता भिक्कु राठोड,६) संजय बापुराव पवार व गावातील ग्रामस्थ बसले आहे या उपोषणाची दखल घेत गट विकास अधिकारी

एक -एक शब्द एक ग्रंथ निर्माण करते.प्रत्येक शब्द म्हणजे भाषा आहे. शब्द वाढल्याशिवाय भाषा वाढणार -प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड "मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ऑनलाईन कार्यक्रमात यांचे गौरवोद्गार"

(किनवट वृतांत:)  एक -एक शब्द एक ग्रंथ निर्माण करते.प्रत्येक शब्द म्हणजे भाषा आहे. शब्द वाढल्याशिवाय भाषा वाढणार नाही.असे मत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ ,नांदेड भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुल आणि बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किनवट मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त कार्यक्रमात प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी व्यक्त केले.प्रारंभी पूज्य वंदनीय स्वामी रामानंद तीर्थ, थोर समाजसुधारक बळीराम पाटील यांच्या विचारांना अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य सुरेश पाटील यांच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.एस.के.बेंबरेकर होते.मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून प्रा. डॉ.वैजनाथ अनमुलवाड, तर प्रमुख पाहुणे प्रसिध्द वक्ते डॉ. आनंद इंजेगावकर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मराठी विभागप्रमुख प्रा.डाॅ.पंजाब शेरे यांनी केले.पुढे बोलतांना डॉ. अ

किनवट इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीयाची संघठनेची विविध विषयावर महत्वपुर्ण बैठक

(किनवट शहर प्रतिनिधी)दि.२४ इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीयाची महत्वपुर्ण बैठक माजी नगराध्यक्ष इसाखान सरदार खान यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवास्थानी घेण्यात आली या मध्ये ई. पत्रकारांचा उद्देश कर्तव्य, समस्या तसेच शहरातील वाढती बेरोजगारी, आरोग्य, रेल्वे अभावी नागरीकांना होणारी समस्या, महागाई,खातेदार, शेतकरी यांची बँकेत होणारी हेळसांड, स्वच्छता, सामाजिक समस्या इत्यादी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. या वेळीइलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया चे अध्यक्ष आनंद भालेराव ,कार्याध्यक्ष नसीर तगाले ,सचिव परवीन शेख सहसचिव सुहास मुंडे , राजेश पाटील,नदीम शेख ,प्रणय कोवे, शेख आतीफ ,विजय जोशी, बापुराव वावळे, अरवींद सुर्यवंशी, सय्यद नदीम, शेख मजहर, शेख रिहान, शेख सहीद, गंगाधर कदम आदी इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीया किनवट संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते या वेळी इसाखान यांनी संघठन बळकटीकरण, पत्रकार यांच्या कार्याची शक्ती, देशाला दिशा देण्यात लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ कसा सिहांचा वाटा आहे समाजात बदल कशा प्रकारे घडवतो या बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.

स्वारातिम विद्यापीठ नांदेड व बळीराम पाटील महाविद्यालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ऑनलाईन कार्यक्रम

(किनवट शहर प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुल आणि बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. या वेबिनारचे आदिवासी साहित्याचे अभ्यासक, भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुलचे प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड हे उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.दलित साहित्याचे अभ्यासक व विद्रोही कवी ,मराठी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. आनंद इंजेगावकर हे मराठी भाषा संवर्धन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर राहणार आहेत.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत प्राचार्य सुरेश पाटील सादर करतील.  मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या विषयावर प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. अनिल कांबळे,महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर, मराठी भाषेचा सार्वत्रिक वापरःवस्तुस्थिती व भवितव्य या विषयावर प्रसिद्ध विचारवंत, कथाक

“ महाविहार बावरी नगर नांदेड येथे ऑनलाइन धम्म परिषदेचे आयोजन"

(नांदेड प्रतिनिधी आम्रपाली शेळकीकर):  सन १९८८  पासून  महाविहार, बावरीनगर, दाभड नांदेड येथे दरवर्षी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे अविरतपणे आयोजन करण्यात येते. देश विदेशातून पाचारण केलेल्या विद्वान भिक्खूंकडून धम्मदेसना घेण्यासाठी लाखोंच्या संख्येत लोक येथे  येत असतात. कोव्हिड-१९ विषाणूच्या सर्वदूर झालेल्या  प्रादुर्भावामुळे तथा शासनाच्या निर्देशांमुळे, यावर्षी आयोजित होणारी ३४ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद दूरदृष्य (ऑनलाइन) प्रणाली  द्वारे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे.    महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशभरात नावलौकिक असलेले तथा शासनाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त  असलेले हे ठिकाण बुद्ध कालीन धम्मानुयायी बावरी ब्राह्मणाच्या स्मरणार्थ “बावरीनगर” म्हणून संबोधिल्या जाते. प्रतिवर्षी प्रमाणे महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे याही वर्षी दि. २८ व २९ जानेवारी २०२१  रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयिजित करण्यात आलेली आहे.  भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा चे अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न  होणार आहे.  या द

चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणी नराधमास फाशीची शिक्षा द्या... -संभाजी ब्रिगेडची मागणी

  किनवट ता.प्र दि २२ भोकर येथिल ५ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार  करुन खुन केल्या प्रकरणी मराठा सेवा संघ प्रणीत सभांजी  ब्रिगेड किनवट ने  या घटनेच्या निषेध म्हणुन सहाय्यक  जिल्हाधिकारी तथा  उपविभागीय अधिकारी  कार्यालय किनवट यांना निवेदन देण्यात आले यात आरोपीस कठोरात कठोर शिक्षेची मागणी या द्वारे करण्यात आली. या निवेदनावर म. से. स. प्रणीत संभाजी ब्रिगेड तालुका अध्यक्ष अजय कदम पाटील, संतोष डोणगे पाटील, I कैलास सिल्लमवार, परमेश्वर मुराडवार, अदित्य चव्हाण, रवी मुराडवार, अक्षय वानखेडे, रवींद्र नक्कावार, निलेश कोत्तापेल्लीवार, अक्षय पडलवार, सुर्यकांत बावणे, दगडु भरकड, राम प्रसाद जयस्वाल, उमाकांत कराळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

भोकर येथील पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार व हत्या घटनेच्या निषेधार्थ किनवट येथिल आदिवासी मन्नेरवारलू समाज असोसिएशन तर्फे तहसिलदारांना निवेदन

  किनवट ता.प्र दि २२ भोकर तालुक्यातील दिवशी येथिल ५ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन खुन केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ किनवट येथिल  आदिवासी मन्नेरवारलू समाज असोसिएशन व्दारे अध्यक्ष प्रा.पुरषोत्तम येरडलावार यांच्या  नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना तहसिलदार किनवट यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.   दिनांक २१ रोजी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी या गावात एका ५ वर्षीय  चिमुकलीवर बलात्कार करुन खुन केल्याची घटना घडल्या नंतर राज्यात या घटनेचा निषेध  नोंदवला व एकच संतापाची लाट उसळली तर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.   आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व या प्रकरणी तत्काळ सुनावनी करुन आरोपीला फासावर लटकवावे या आशयाचे निवेदन अध्यक्ष प्रा.पुरषोत्तम येरडलावार यांच्या नेतृत्वात देण्यात आले तर यावेळी सादर करण्यात आलेल्या  निवेदनावर युवा अध्यक्ष बालाजी न्यालमवार, सचिव संतोष माडपेल्लीवार,  रमेश निलमवार, निखिल गोस्कुलवार, श्रीकांत आवारीवार, प्रभाकर बोलेनवार,  सामाजिक कार्यकर्ते अलिम सय्यद यांच्या स्वाक्ष-या आहेत तर त्यावेळी उपस्थित  देखिल होते तर अनेक समाज बांधव देखिल याव

भुमीहीन बेघरासाठी असलेल्या नगर परिषदेच्या आरक्षीत भुखंड जागेवर भुमाफियांचे अतिक्रमण

  (ता . प्र . किनवट/ सुरज भरणे) किनवट नगरपरिषद हद्दीमधील सर्वे क्रमांक 253/1 व 254/1हे क्षेत्र महाराष्ट्र शासन भूमिहीन  बेघराकरिता राखीव असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी या राखीव भूखंडाचे वाटप करून दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन नगरसेविका राहत तबसून काझी,सुनयना  विशाल जाधव जिल्हा परिषद सदस्य तथा समाज कल्याण समिती सदस्य, भाजपचे  अल्पसंख्याक प्रदेश सचिव गुरूप्रीत सिंग  यांच्यासह असंख्य बेघर नागरिकांनी नगर परिषदेचे अध्यक्ष तसेच मुख्य अधिकारी यांना दिले आहे. किनवट नगरपरिषद हद्दीत समता नगरला लागून 253/1व 254/1 या शेत सर्वे क्रमांकांची जागा महाराष्ट्र शासन भूमिहीन घराकरिता राखीव असून  सन 1980 पासून ही जागा बेघरासाठी आरक्षित असतानासुद्धा अद्यापही महाराष्ट्र शासनाने अथवा नगर पालिका प्रशासनाने या भूखंडावर बेघरांना जागा उपलब्ध करून दिली नाही. हक्काच्या जागेअभावी समता नगर, सुभाष नगर, गंगानगर,  धोबीगल्ली येथील गोरगरीब कुटुंबे किरायाच्या खोलीमध्ये वास्तव्य करून आहेत.विशेष म्हणजे शासनाकडून किनवट नगरपरिषद हद्दीतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पंतप्रधान घरकुल आवास

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी जाहिर किनवट तालुकाध्यक्षपदी आनंद भालेराव

नांदेड  प्रतिनिधी: : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाची नांदेड जिल्हा कार्यकारिणी दि.२० जानेवारी २०२१ रोजी जाहिर करण्यात आली. या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष डी.टी.आंबेगावे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पत्रकारांवर कदापिही खोटे गुन्हे दाखल होऊ देणार नसल्याचे भाष्य केले तसेच संघाचे संपादक व पत्रकारांचे कुटुंब यांचे कल्याणासाठी विविध योजना राबवून सक्षम पत्रकार ही संकल्पना संघाने हाती घेतल्याचे सांगितले. यावेळी नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड, जिल्हा कार्याध्यक्ष विशाल पवार, जिल्हा संघटक शंकरसिंह ठाकूर, जिल्हा संपर्क प्रमुख मारोती शिकारे, जिल्हा समन्वयक संदीप कांबळे, जिल्हा महिलाध्यक्षा विजया सोनटक्के, राज्य महिला उपाध्यक्षा सविता चंद्रे, मराठवाडा संपर्क प्रमुख सुर्यकांत तादलापूरकर, मराठवाडा महिलाध्यक्षा वैशाली हिंगोले, यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड, देगलूर तालुकाध्यक्ष मिलींद कावळगावकर, मुखेड तालुकाध्यक्ष भारत सोनकांबळे, कार्याध्यक्ष असद बल्खी, नायगाव तालुकाध्यक्ष अविनाश अतेराये, बिलोली तालुकाध्यक्ष बलीमोद्दीन फारूकी, भोकर तालुकाध्यक्ष दत्ता बोईनवाड, किनवट तालुकाध्यक्ष आ

डुकरांनी तोडले मानवी मृतदेहाचे लचके नांदेडच्या शासकीय रुग्णालया समोरील मन खिन्न करणारी घटना

नांदेड डुकरांनी तोडले मानवी मृतदेहाचे लचके नांदेडच्या शासकीय रुग्णालया समोरील मन खिन्न करणारी घटना प्रतिनिधी :  डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरीच्या प्रवेशद्वारा जवळ असलेल्या कचराकुंडीच्या बाजूला एका मानवी मृतदेहाचे लचके डुक्करांनी तोडल्याचा लाजिरवाणी आणी संतापजनक प्रकार घडला आहे. सदरील घटनेचा जिल्हाधिकाऱ्यांनी तपास करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. नांदेडच्या डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालयातील आणि वैद्यकीय रुग्णालयातील अनेक संतापजनक प्रकार यापूर्वीही पुढे आले आहेत .रुग्णालय प्रशासना कडून होत असलेल्या बेजबाबदारपणाने आता कळस गाठला आहे. रुग्णांवर उपचारासाठी करण्यात येणारी टाळाटाळ ,रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना अपमानास्पद वागणूक यासह अनेक बाबींनी कळस गाठला आहे. आता त्यात मोठी भर पडली असून शासकीय रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराच्या बाजूला असलेल्या कचराकुंडी लगत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह पडला होता . दोन ते तीन दिवसांपूर्वी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदरील मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसू

तालुका विधी सेवा समिती , वकील संघाच्या वतीने न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा कार्यक्रम संपन्न

 किनवट, ता. २१( बातमीदार):  आता जवळपास सर्वच कामे मराठीत करण्याचे प्रयत्न न्यायालयात होत आहेत. पुढच्या पिढीला शुद्ध भाषा देण्यासाठी मराठीतच व्यवहार करावा व मराठी भाषा समृद्ध करावी, असे आव्हान दिवाणी न्यायाधीश जहांगीर पठाण यांनी केले आहे.    तालुका विधी सेवा समिती व वकील संघाच्या वतीने आज( ता.२१) न्यायालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त ते अध्यक्षीय समारोप करताना बोलत होते. यानिमित्त बोलताना सहदिवाणी न्यायाधीश जयंत जे. एन. जाधव म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने आता निवाडे हे प्रादेशिक भाषेतून देण्यास सुरुवात केली आहे. न्यायालयातही आता जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर होत आहे.   यावेळी एड. अरविंद चव्हाण व एड. सुभाष ताजणे यांनी आपले विचार मांडले. प्रास्ताविक वकील संघाचे सचिव एड. दिलीप काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहसचिव अड. राहुल सोनकांबळे यांनी केले.  यावेळी अड. अनंत वैद्य, अड. यशवंत गजभारे, एड. एन. एच. ठाकूर, एड. टी.आर चव्हाण, एड. पंकज गावंडे एड. अभिजीत वैद्य, एड. नेमानीवार, अड. उदय चव्हाण एड. मिलिंद सरपे यांच्यासह पक्षकार व न्यायालयीन कर्मच

आकाश सुर्यवंशी यांचा ग्राम पंचायत निवडणुकीत दणदणीत विजय.

(दाभड बातमीदार )   नांदेड पासुन हाकेच्या अंतरावर असलेले दाभड ह्या गावच्या ग्रामपंच्यात निवडणुक २०२१   वार्ड १ चे अपक्ष उमेदवार आकाश भगवानराव सुर्यवंशी यांचा दणदणीत विजय  झाला आहे. आकाश सुर्यवंशी हे सामाजीक बांधीलकी जोपासणारा कार्यकर्ता म्हणून ओळखला जातो यामुळेच अपक्ष असताना हि मतदारांनी त्यांना भरघोस मतांनी निवडुन दिले या निवडी बद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरांतून  अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

खडकी बाजार येथुन समृद्ध विकास परिवर्तन पॅनलचे अमोल मुकींदराव येरेकार भरघोस मतांनी विजयी

( बातमीदार: खडकी बाजार) ता .१८ किनवट तालुक्यातील खड़की बाजार ग्राम पंचायत निवडणुकीत समृध्द ग्राम विकास परिवर्तन पॅनलचे नव निर्वाचीत उमेदवार अमोल मुकींदराव येरेकार यांचा भरघोस मतांनी विजय झाला वार्ड क्र.३ मधुन ते उभे होते त्यांना२८८ मते पडली तर त्यांचे प्रतिस्पर्धी सिध्दोधन हनवते यांना१२०, अमिंद्र गिमेकार,६०, रमेश मुनेश्वर४० असे मते पडली निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना विजयी उमेदवार घोषीत केले या विजया मुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले संजय सुर्यवंशी,  विनोद वच्छेवाड, अनिल पवार, हर्षवर्धन हनवते, गौरव सुर्यवंशी, सचिन डांगे, ज्ञानेश्वर राहुलवाड  ,शरद येरेकार ,समृद्ध ग्राम विकास परिवर्तन पॅनल व परीवारा तर्फे त्यांचे वतीने त्यांचे अभिनंदन केले.

थोर समाज सुधारक बळीराम पाटील यांच्य४८ व्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

(ता. प्र. किनवट/ राजेश पाटील)  बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकुण चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचा प्रेरक अर्धकृत्ती पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, माजी आयुक्त, वसई विरार,मुंबई येथील गोविंद राठोड,किशिसस्थेचे सचिव शंकरराव चाडावार, कोष्याध्यक्ष जसवंतसिंग सोखी,डाॅ.प्रशांतजी मांडवी, माजी प्राचार्य वि.मा.शिंदे, रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ. यू. पी.धुमाळे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. घोडके ऋषीकेश ,महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील ,राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा. काझी एस.एस.रासेयो स्वयंसेवक किशोर आडे , निलेश राठोड, यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासे

घोटी येथे राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची संयुक्त जयंती विविध उपक्रमांनीसाजरी

किनवट / घोटी(तालुका प्रतिनिधी) किनवट शहरापासून जवळच असलेल्या मौजे घोटी या शांतताप्रिय गावांमध्ये सर्वधर्म समभाव या भावनेतून घोटी गावकऱ्यांच्या सहकार्याने किंबहुना आशीर्वादाने राजू पाटील सुरोशे यांच्या नेतृत्वात राष्ट्रमाता जिजाऊ व सावित्रीबाई फुले यांची जयंती मान्यवरांच्या साक्षीने व घोटी गावातील प्रतिष्ठित नागरिकांच्या उपस्थितीत धुमधडाक्यात साजरी करण्यात आली म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ चे विचार आत्मसात करता येतात म्हणजे त्यांचे विचार जीवनात आणल्यास उच्च दर्जाचे जीवन जगता येते हे मान्यवराच्या मार्फत प्रबोधनकार अतुल बळेकर यांनी सांगितले तसेच प्राध्यापक पंजाब शेरे  सर यांनी आपल्या प्रबोधनातून राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे जीवन चरित्रावर व शिक्षण आणि संस्कार याविषयी त्यांनी उच्च दर्जाचे मार्गदर्शन केले. राजू पाटील सुरोशे हे गावातील एक युवा नेतृत्व आहे ते गेल्या दहा ते बारा वर्षापासून गावकऱ्यांसाठी काम करतात म्हणजेच ते सतत सेवा वृत्तीतून आपले जीवन समर्पित करत  आलेले आहेत. त्यांच्या जीवनात 80 टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण आहे हे त्यांच्या जीवनाच्या यशाची

स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा किनवटच्या कार्यालयात शेतकऱ्याचे ठिय्या आंदोलन

  ता. प्र . किनवट : कोरोना महामारी व नापिकीमुळे डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिकच भर पडली असताना स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा किनवट कडून शेतकऱ्यांस पीककर्ज देण्यास टाळाटाळ करत आहे अशी अनेक शेतकऱ्यांची तक्रार लक्षात घेऊन किनवट येथील सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा कीनवट च्या कार्यालयात घुसून शेतकऱ्यासह ठिय्या आंदोलन केले. या बँकेत शेतकऱ्यांची पिक कर्ज देण्यासाठी दलाला ची मदत घ्यावी लागते. अन्यथा पीक कर्जे मंजूर केल्या जात नाहीत असा घणाघाती आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच या बँकेतील कर्मचारी शेतकऱ्याशी आडमुठीची भाषा वापरतात व काही अडचणी विचारल्यास कोनोही बोलायला तयार नाहीत असा आरोप करत ठिय्या आंदोलन करण्यात आले . शेवटी येथील बँक मॅनेजरने येत्या पंधरा दिवसात राहिलेल्या सर्व शेतकऱ्यांचे पीक कर्ज देण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर तुर्तास ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळेस लाभार्थी शेतकरी व निखिल वाघमारे , सुरेश मुनेश्वर , सिध्दार्थ वाघमारे , प्रवीण गायकवाड ,सुधाकर हलवले ,विजय पाटील, संदीप योगेश राठोड व इतर शेतकरी बांधव उपस्थित होते ह

... अण् नामांतरा साठी आमचाही ९० किलो मिटर अंतराचा रात्रीचा सायकल मार्च... अॅड.मिलिंद सर्पे,किनवट.

     शिशु पँथर ते दलित पँथर अॅड मिलींद सर्पे यांचा जीवनातील रोमहर्षक प्रवास..... मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव द्यावे ,अशी चळवळ "दलित पॅंथर',या संघटनेकडून मराठवाड्यात सुरु झालेली होती.तो काळ होता १९७७ चा. मी तेंव्हा होतो सहावित. २७ जुलै १९७८ ला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा  ठराव एकमताने मंजूर झाला खरा परंतु , त्या नंतर २७ जुलै च्या  रात्रीपासून मराठवाड्यातील दलित समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु झाले.मराठवाड्यातील दलित वस्त्या १५ दिवस जळत होत्या . मराठवाडा ठप्प झाला होता.नामांतराची अंमलबजावणी झाली नाही.पुढे चालून १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर न होता नामविस्तार झाले, "डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद."     नामांतर चळवळीचा मोठा इतिहास आहे.या चळवळीत माझा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दादाराव कयापाक,सुरेश गायकवाड,मनोहर भगत,सुखदेव मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली माझा सहभाग होता.तो खारीचा असलातरी फारच स्फुर्तिदायक होता , असे मला आजही वाटते. त्या काळी मला प्रा. धनवे सरांनी &

पिक कर्ज वेळेवर मिळत नसल्याने किनवटचे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांसाठी बँकेतच फास घेण्याचा प्रयत्न मांडवी (एस बी आय बँकेतील प्रकार )बँक प्रशासन हादरले

 (मांडवी प्रतिनिधी-इंद्रपाल कांबळे)  आज मांडवी येथील स्टेट बँकेत शेतकरी अरुण आळणे यांनी पीक कर्ज वेळेवर का देत नाही म्हणून फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली  याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मागील पाच ते सहा महिन्यापासून  शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची फाईला अनेक दिवसांपासून प्रलंबित असून अनेक वेळा बँकेला विचारणा केली असता सविस्तर माहिती काही मिळत नसल्यामुळे आज शेवटी वैतागून शेतकऱ्यांसाठी अरूण आळणे यांनी बँकेच्या फील्ड ऑफिसर यांच्या टेबलावरती असलेल्या पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थित पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे व विजय कोळी, बँकेचे सुरक्षा रक्षक यांनी त्याना उतरविण्याचा प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला या अचानक घडलेल्या प्रकारामुळे बँक चे बाहेर उपस्थित शेतकरी व बँक कर्मचारी हे आवक झाले.  सायंकाळी चार वाजता पर्यंत बँकेच्या बाहेर अनेक शेतकरी उभ्या असतानाही अधिकारी हे नेट नाही या कारणास्तव एकही अर्ज पास होत नाही असे कारण सागत होते   मागील अनेक महिन्यांपासून पीक कर्ज चे अर्ज हे बँकेत देत आहे त्यापैकी करुणा आरून आळणे यांच्या फाईलीवर सही पण झालेली आहे  या बँकेत

पिंपळशेंडा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट , विविध प्रंलबीत कामाचा घेतला आढावा (मांडवी प्रतिनिधी: इंद्रपाल कांबळे)

(टाईम्स ऑफ किनवट वृतांत)  मांडवी पासून 25 किलोमीटर लांब असलेल्या पिंपळशेंडा हे अतिदुर्गम विभागातील गाव असून आज जिल्हाधिकारी डॉ विपीन इटकर व मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. नांदेड सो. वर्षा ठाकूर घुगे यांनी पिंपळशेंडा या जिल्हा तील शेवटच्या टोकाच्या गावाला भेट दिली आहे  1 जानेवारी रोजी जिल्हाधिकारी किनवट तालुक्यात अनेक गावांना भेटी देत असताना शेवटचे टोक असलेली पिंपळशेंडा या गावी संध्याकाळी पाच वाजता जिल्हाधिकारी यांनी भेट दिली यावेळी गावातील अनेक अडचणीचे प्रश्न ऐकून घेतले रस्त्याच्या आणि पाण्याची समस्या एकूण घेऊन तात्काळ उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना याबद्दल विचारणा केली  रस्त्याची समस्या ते स्वतः पाहिले असल्यामुळे नवीन रस्ता निर्मितीसाठी सुद्धा बोलत होते पैदल जाऊन ते पाहणी करून आचार सहिता संपल्यानंतर लगेच कामाला सुरुवात केली जाईल असे सांगण्यात आले गावातील रस्त्याचे प्रश्‍न मांडत असताना प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्यांशी ते स्वतःला त्यांचे विचार ऐकून घेतले यावेळेस पोलिस स्टेशनचे ठाणेदार संतोष केंद्रे यांनी हे गावलांब असल्यामुळे आणि तेलंगणाच्या हदी तून या गावी यावे लागत असल्याने येण्यास हु

आज कि न्युजचे संपादक नसीर तगाले यांचा वाढदिवस साजरा सामाजीक कार्यकर्ते व पत्रकाराच्या उपस्थितीत संपन्न

(ता . प्र . किनवट राजेश पाटील)  आज कि न्यूज  कार्यालयांमध्ये आज कि न्यूज चे संपादक नसीर भाई तगाले यांचा वाढदिवस पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला.  या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड ,जिल्हा परिषद सदस्य प्रवीण म्याकलवार, डी राजा, कचरू जोशी, एमसीएन न्यूज चे प्रेस रिपोर्टर परविन मॅडम ,सामाजिक कार्यकर्त्या सुरेखाताई काळे, नदीम भाई ,वसीम भाई ,पत्रकार गंगाधर कदम, चाऊस भाई ,किनवट टुडे न्युज संपादक आनंद भालेराव, टीव्ही न्युज चे संपादक शेख आतिफ, रिहान भाई, विजय जोशी ,जगदीश सामानपेलीवार, आदी मान्यवर उपस्थित होते.      महाराष्ट्रातील सुपरिचित असलेला लीजेंड दादासाहेब फाळके पुरस्काराने व लेजंड  बॉलिवूड अवार्ड ने नुकतेच आज कि न्यूज चे संपादक नसेल तर यांना मुंबई येथे सन्मानित करण्यात आले होते त्याबद्दल सर्व मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या

संथागार वृद्धाश्रमात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

(किनवट : तालुका प्रतिनिधी) ता .३ जाने . किनवट येथील संथागार वृद्धाश्रमात स्त्री शिक्षणाच्या आद्य प्रेरीका क्रांतीज्योती सवित्रीबाई फुले यांची १९० वी जयंती हर्षोल्हासात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या सुरवातीस क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पुजन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते  करण्यात आले  आमदार केराम यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाईच्या कार्याचा परीचय दिला व त्यांच्या काव्य साहित्या बद्दल सखोल माहीती सांगीतली या नंतर व्याख्याते अतुल बेळीकर यांनी सावित्रीबाई व क्रांतीसुर्य जोतीराव फुले यांच्या जीवनपट मांडून व्याख्यान दिले  या कार्यक्रमास प्रमुख अतीथी म्हणुन किनवट -माहुरचे तालुक्याचे आमदार भीमरावजी केराम, लोकनेते शिवसेना उपजिल्हा प्रमुख जोतीबा खराटे , संथागार चे संचालक माजी नगराध्यक्ष अरुण आळणे, माजी नगर सेवीका करुणाताई आळणे,प्रसिद्ध व्याख्याते अतुल बेळीकर, NGO संगिता पाटील, बालाजी मुरकुटे, मारोती भरकड, एल आय सी विकास अधिकारी संदिप पेटकुले, दत्ता आडे, राजकुमार बाविस्कर, वाडगुरे सर, राजु पेटकुले, संजय गुरनुले, पांडुरंग गुरनुले, संतोष मऱ्हसकोले, प्रा.डॉ. पंजाब शेरे, प्रा