Skip to main content

भुमीहीन बेघरासाठी असलेल्या नगर परिषदेच्या आरक्षीत भुखंड जागेवर भुमाफियांचे अतिक्रमण

 


(ता . प्र . किनवट/ सुरज भरणे)

किनवट नगरपरिषद हद्दीमधील सर्वे क्रमांक 253/1 व 254/1हे क्षेत्र महाराष्ट्र शासन भूमिहीन  बेघराकरिता राखीव असल्यामुळे आर्थिक दृष्ट्या दुर्बल व दारिद्र्यरेषेखालील नागरिकांसाठी या राखीव भूखंडाचे वाटप करून दिलासा द्यावा अशा आशयाचे निवेदन नगरसेविका राहत तबसून काझी,सुनयना  विशाल जाधव जिल्हा परिषद सदस्य तथा समाज कल्याण समिती सदस्य, भाजपचे  अल्पसंख्याक प्रदेश सचिव गुरूप्रीत सिंग  यांच्यासह असंख्य बेघर नागरिकांनी नगर परिषदेचे अध्यक्ष तसेच मुख्य अधिकारी यांना दिले आहे.

किनवट नगरपरिषद हद्दीत समता नगरला लागून 253/1व 254/1 या शेत सर्वे क्रमांकांची जागा महाराष्ट्र शासन भूमिहीन घराकरिता राखीव असून  सन 1980 पासून ही जागा बेघरासाठी आरक्षित असतानासुद्धा अद्यापही महाराष्ट्र शासनाने अथवा नगर पालिका प्रशासनाने या भूखंडावर बेघरांना जागा उपलब्ध करून दिली नाही.

हक्काच्या जागेअभावी समता नगर, सुभाष नगर, गंगानगर,  धोबीगल्ली येथील गोरगरीब कुटुंबे किरायाच्या खोलीमध्ये वास्तव्य करून आहेत.विशेष म्हणजे शासनाकडून किनवट नगरपरिषद हद्दीतील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पंतप्रधान घरकुल आवास योजना तसेच रमाई घरकुल आवास योजनेतून घरकुले मंजूर झालेली आहेत परंतु लाभार्थ्याना त्यांच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्यामुळे ते केवळ जागेअभावी हक्काच्या निवासापासून  वंचित आहेत.

विशेष म्हणजे या मोकळ्या भूखंडावर डोळा ठेवून काही भूखंड माफिया शासनाच्या या राखीव जागेवर व गोरगरीबांच्या हक्काच्या जागेवर विनापरवाना राजकीय आश्रय घेऊन अतिक्रमण करत असून अनेकांनी या ठिकाणी जागा हडप करून बेकायदेशीररित्या बांधकाम सुद्धा सुरु केले आहे. शासनाच्या जागेवर अशाप्रकारे बेकायदेशीर अतिक्रमण करून कोणी शासनाचा भूखंड हडप करण्याचा प्रयत्न करत असेल  आणि या जागेवर अन्य वस्ती बेकायदेशीररित्या स्थलांतरित करण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा भूखंडमाफियावर नगरपालिका प्रशासनासह जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घालून कारवाई करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.




किनवट शहरातील बेघर कुटुंबाची संख्या लक्षात घेऊन तसेच घरकुल लाभार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन प्रशासनाने शेत सर्वे क्रमांक 253/1 व 254/1 या क्षेत्रातील महाराष्ट्र शासनाची राखीव जागा तात्काळ बेघर कुटुंबांना घरकुलांसाठी उपलब्ध करून द्यावी अन्यथा प्रहार संघटनेच्या वतीने लोकशाही मार्गाने वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल अशा असा इशारा सुद्धा निवेदनातून दिला आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा परिषद सदस्य सूनयना विशाल जाधव सदस्या समाजकल्याण समिती जिल्हा परिषद नांदेड,नगरसेविका राहातबसून काझी

 यांच्यासह बेघर  अंजूताई शंकर येरेकार, 

अंकुश बाबू भालेराव, 

राहुल गौतम कापसे, 

चतुरंग अंबादास कांबळे ,

मोहम्मद पाशा वली साहब,

 राहुल गिमेकार, 

शेख फकीर शेख खाजा, 

शेख शब्बीर शेख शरीफ, 

सम्राट  कावळे,

 विजय जोशी,

 महेंद्र  वासाटे, 

शेख महंमद शेख महेबुब, 

अविनाश  नगराळे, 

आरिफ खान समीउल्ला खान, 

शेख हसन शेख सत्तार,

यास्मिन खानम रियाज पठाण, 

मोहम्मद युनुस मोहम्मद युसुफ, 

रशिद बैलिम, 

अक्रम दाऊद चव्हाण 

आदम चव्हाण 

गोपीकिशन आत्राम, 

मोहम्मद अली, 

शेख अक्रम शेख महेबुब, 

मयूर  महाबळे

यांच्या स्वाक्षर्‍या आहेत



Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...