Skip to main content

पिक कर्ज वेळेवर मिळत नसल्याने किनवटचे माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांसाठी बँकेतच फास घेण्याचा प्रयत्न मांडवी (एस बी आय बँकेतील प्रकार )बँक प्रशासन हादरले



 (मांडवी प्रतिनिधी-इंद्रपाल कांबळे)

 आज मांडवी येथील स्टेट बँकेत शेतकरी अरुण आळणे यांनी पीक कर्ज वेळेवर का देत नाही म्हणून फाशी घेण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली

 याबाबतचे सविस्तर वृत्त असे की मागील पाच ते सहा महिन्यापासून  शेतकऱ्यांच्या पीक कर्जाची फाईला अनेक दिवसांपासून प्रलंबित असून अनेक वेळा बँकेला विचारणा केली असता सविस्तर माहिती काही मिळत नसल्यामुळे आज शेवटी वैतागून शेतकऱ्यांसाठी अरूण आळणे यांनी बँकेच्या फील्ड ऑफिसर यांच्या टेबलावरती असलेल्या पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला.

या वेळी उपस्थित पोलिस उपनिरीक्षक शिवप्रसाद कराळे व विजय कोळी, बँकेचे सुरक्षा रक्षक यांनी त्याना उतरविण्याचा प्रयत्न केल्याने पुढील अनर्थ टळला या अचानक घडलेल्या प्रकारामुळे बँक चे बाहेर उपस्थित शेतकरी व बँक कर्मचारी हे आवक झाले.

 सायंकाळी चार वाजता पर्यंत बँकेच्या बाहेर अनेक शेतकरी उभ्या असतानाही अधिकारी हे नेट नाही या कारणास्तव एकही अर्ज पास होत नाही असे कारण सागत होते 


 मागील अनेक महिन्यांपासून पीक कर्ज चे अर्ज हे बँकेत देत आहे त्यापैकी करुणा आरून आळणे यांच्या फाईलीवर सही पण झालेली आहे  या बँकेत अरुण आळणे यांच्यासह अनेक शेतकन्यांच्या  पीक कर्जाच्या  फाईली देऊन आहेत  अनेक वेळा भेट दिली असता बँकेतून सविस्तर माहिती मिळत नाही हे लोक व्यवस्थित बोलत पण नाही नेट नाही हे कारण देऊन बाजूला बसतात बँकेच्या कमासाठी शेतकरी येथे रोज ये-जा करत असतात त्यांच्या कामे बुडतात पण बँकेच्या कर्मचारी माहिती सुद्धा देत नाही यामुळे या कर्मचाऱ्यांना कर्तव्याची जाणीव व्हावी व शेतकऱ्यांना वेळेत कर्ज मिळावे यासाठी फाशी घेतल्या शिवाय पर्याय नाही त्यामुळे मला असे करावे लागत आहे

 किनवटचे माजी नगराध्यक्ष व शेतकरी यांनी सांगितले.

 


 "मांडवी चे बँकेचे फिल्ड ऑफिसर यांनी असे सांगितले की मांडवी स्टेट बँकेला इंटरनेट कनेक्टिव्हिटी बीएसएनएल यांचे असून ती सतत बंद असते त्यामुळे बँकेच्या नाईलाज आहे आतापर्यंत दोनशे शेतकऱ्यांचे पीक कर्ज हे प्रलंबित असून येत्या पंधरा दिवसात सर्व शेतकऱ्यांना कर्जवाटप करण्यात येईल एकही शेतकरी कर्ज पासून वंचित राहणार नाही असे त्यांनी सांगितले आहे"

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...