Skip to main content

“ महाविहार बावरी नगर नांदेड येथे ऑनलाइन धम्म परिषदेचे आयोजन"


(नांदेड प्रतिनिधी आम्रपाली शेळकीकर):

 सन १९८८  पासून  महाविहार, बावरीनगर, दाभड नांदेड येथे दरवर्षी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेचे अविरतपणे आयोजन करण्यात येते. देश विदेशातून पाचारण केलेल्या विद्वान भिक्खूंकडून धम्मदेसना घेण्यासाठी लाखोंच्या संख्येत लोक येथे  येत असतात. कोव्हिड-१९ विषाणूच्या सर्वदूर झालेल्या  प्रादुर्भावामुळे तथा शासनाच्या निर्देशांमुळे, यावर्षी आयोजित होणारी ३४ वी अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद दूरदृष्य (ऑनलाइन) प्रणाली  द्वारे आयोजित करण्याचे ठरविण्यात आले आहे.  

 महाराष्ट्रातच नव्हे तर सबंध देशभरात नावलौकिक असलेले तथा शासनाचा तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त  असलेले हे ठिकाण बुद्ध कालीन धम्मानुयायी बावरी ब्राह्मणाच्या स्मरणार्थ “बावरीनगर” म्हणून संबोधिल्या जाते. प्रतिवर्षी प्रमाणे महाविहार बावरीनगर दाभड नांदेड येथे याही वर्षी दि. २८ व २९ जानेवारी २०२१  रोजी दोन दिवसीय अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषद आयिजित करण्यात आलेली आहे.  भारतीय बौद्ध ज्ञानालंकार शिक्षण संस्था मुळावा चे अध्यक्ष पू. भदंत धम्मसेवक महास्थवीर यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद संपन्न  होणार आहे.


 या दोन दिवासीय दूरदृष्य (ऑनलाइन) प्रणाली  द्वारे आयोजित धम्म परिषदेत भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो, भिक्खु डॉ. एम. सत्यपाल थेरो, भिक्खु विणय बोधिप्रिय थेरो, भिक्खू पय्यारत्न थेरो, भिक्खु हर्षबोधी थेरो, भिक्खु करुणानंद थेरो, भिक्खु ज्ञानरक्षित- औरंगाबाद, भिक्खु संघपाल इत्यादी देश विदेशातील विद्वान भिक्खुंची धम्म देसणा होईल. 

आवाहन:

कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर आयोजित होणा-या ३४ व्या अखिल भारतीय बौद्ध धम्म परिषदेत कोणत्याही प्रकारची  दुकाने थाटण्यास बंदी घालण्यात आलेली आहे. कोव्हिड -१९ या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये अगर त्याचा प्रसार होऊ नये व अशा संकट समयी स्वत:च्या आरोग्यचीही काळजी घेणे आवश्यक असल्याने सर्व उपासक उपसिकांना आवाहन करण्यात येते की त्यांनी महाविहार बावरीनगर येथे धम्म परिषदेकरीता प्रत्यक्ष न येता आपल्या निवासस्थानाहुनच सोशल मिडियावर दूरदृश्य (ऑनलाईन) प्रणालीद्वारे धम्मदेसनेचा लाभ घ्यावा,  असे आवाहन धम्म परिषदेचे संयोजक महाउपासक डॉ. एस. पी. गायकवाड यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...