(किनवट शहर प्रतिनिधी)दि.२४
इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीयाची महत्वपुर्ण बैठक माजी नगराध्यक्ष इसाखान सरदार खान यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या निवास्थानी घेण्यात आली या मध्ये ई. पत्रकारांचा उद्देश कर्तव्य, समस्या तसेच शहरातील वाढती बेरोजगारी, आरोग्य, रेल्वे अभावी नागरीकांना होणारी समस्या, महागाई,खातेदार, शेतकरी यांची बँकेत होणारी हेळसांड, स्वच्छता, सामाजिक समस्या इत्यादी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
या वेळीइलेक्ट्रॉनिक प्रेस मीडिया चे अध्यक्ष आनंद भालेराव ,कार्याध्यक्ष नसीर तगाले ,सचिव परवीन शेख सहसचिव सुहास मुंडे , राजेश पाटील,नदीम शेख ,प्रणय कोवे, शेख आतीफ ,विजय जोशी, बापुराव वावळे, अरवींद सुर्यवंशी, सय्यद नदीम, शेख मजहर, शेख रिहान, शेख सहीद, गंगाधर कदम आदी इलेक्ट्रॉनिक प्रेस मिडीया किनवट संघटनेचे पदाधिकारी उपस्थीत होते या वेळी इसाखान यांनी संघठन बळकटीकरण, पत्रकार यांच्या कार्याची शक्ती, देशाला दिशा देण्यात लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ कसा सिहांचा वाटा आहे समाजात बदल कशा प्रकारे घडवतो या बद्दल विस्तृत मार्गदर्शन केले.
Comments
Post a Comment