(ता. प्र. किनवट): दि.३१ जाने.
"दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दर वेळी" या शासनाच्या ब्रीदवाक्या प्रमाणे किनवट मध्ये शासकीय नागरी दवाखाना, सिद्धार्थ नगर जेतवन बुद्ध विहार बुथ, साठे नगर बुथ, बस्टँड बुथ व इतर सार्वजनीक ठिकाणच्या बुथवर पोलीओ लसीकरणाला सुरवात झाली व पल्स पोलिओ लसीकरण झाले याची सुरवात किनवट नगरीचे
नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांनी बालकाला पोलीओ पाजवुन केली यावेळी डॉ. किरण नेम्मानीवार, डॉ. संतोष गुंटापेल्लीवार, डॉ.जडते, सतीश गुरु, सुनिल बगाटे, माने सर, साहेरा परवीना, रत्नमाला भरणे , सपना चव्हाण, परीचारिका वाडे , श्रीनिवास आरपेल्लीवार,श्रीकांत माने तथा महाविद्यालयीन विद्यार्थी आदि उपस्थित होते व प्रत्येकांनी घरोघरी जाऊन पोलीओ विषयी जनजागृती केली.
तर सिद्धार्थ नगर / साठे नगर बुथ वरील अंगनवाडी सेविका आरोग्य सहायक प्रेमीला हाटकर , सिमा राठोड, अर्चना ढाकणे आदिंनी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वीपणे राबवत आहे.
Comments
Post a Comment