Skip to main content

थोर समाज सुधारक बळीराम पाटील यांच्य४८ व्या स्मृतीदिना निमित्त रक्तदान शिबीर संपन्न



(ता. प्र. किनवट/ राजेश पाटील)

 बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात एकुण चाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रारंभी थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त त्यांचा प्रेरक अर्धकृत्ती पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, माजी आयुक्त, वसई विरार,मुंबई येथील गोविंद राठोड,किशिसस्थेचे सचिव शंकरराव चाडावार, कोष्याध्यक्ष जसवंतसिंग सोखी,डाॅ.प्रशांतजी मांडवी, माजी प्राचार्य वि.मा.शिंदे, रक्तदान शिबिराचे उदघाटन डॉ. यू. पी.धुमाळे, रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. घोडके ऋषीकेश ,महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर, उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील ,राष्ट्रीय छात्र सेना विभागप्रमुख प्रा. काझी एस.एस.रासेयो स्वयंसेवक किशोर आडे , निलेश राठोड, यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी तथा विभागीय समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी केले. प्रास्ताविकातून थोर समाजसुधारक स्मृतीशेष बळीराम पाटील यांच्या समाजिक, शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकला.रक्तदानांचे महत्त्व सांगितले.याप्रसंगी महाविद्यालयास पहिल्यांदा सदिच्छा भेट दिल्यामुळे गोविंद राठोड, माजी आयुक्त ,वसईविरार,मुंबई यांचा सत्कार महाविद्यालय,व संस्थेच्या वतीने करण्यात आले.किनवट शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे व डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय व रुग्णालय,नांदेड येथील रक्तसंक्रमण अधिकारी संपूर्ण टीमचे स्वागत करण्यात आले.राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी भारतीय सैन्य दलात लागल्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला. कोरोना या महभंयकार रोगाची लागण झाल्याने संपूर्ण जग एका बिकट परिस्थितीत वावरत आहे.आशा बिकट परिस्थितीत राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने रक्तदान शिबिर घेऊन एकुण चाळीस पिशव्या रक्तसंक्रमण करण्यात आले.दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबीर घेऊन सेवा करण्याचे काम रासेयो विभागाने केले आहे. रासेयो स्वयंसेवक, स्वयंसेविका, राष्ट्रीय छात्र सेनेचे विद्यार्थी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक,शाखा बळीराम पाटील महाविद्यालय,किनवट माजी पर्यवेक्षक प्रा. प्रकाश उत्तरवार यांनी सत्तरा वेळा रक्तदान केले.ती परंपरा पुढे चालू ढेवण्यासाठी त्यांचा मुलगा शंतनू उतरवार यांनी रक्तदान केले.एलआयसी डि.ओ.प्रतिक मुनेश्वर, नगर परिषद किनवट येथील विद्युत अभियंता विनोद पवार, हिंदी विभागाचे डॉ. गजानन वानखेडे, रासेयो स्वयंसेविका कोमल राठोड, सामाजिक क्षेत्रातील यमुना केंद्रे, ज्योती कोटावार,महम्मद कलीम, म. हाजी, जफर खान अफीफ खान, संदीप येशीमोड,यांनीही रक्तदान केले.एकुण चाळीस रक्तदात्यांनी स्वइच्छेने रक्तदान केले.



कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रासेयो सल्लागार प्रा. डॉ. आनंद भालेराव,डाॅ.अंबादास कांबळे, डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा. विजय खूपसे, रासेयो महिला कार्यक्रम अधिकारी प्रा.डाॅ.लता पेडलवाड , कार्यालयीन अधीक्षक राजेंद्र धात्रक, डि. टी. चाटे, रासेयो स्वयंसेवक किशोर आडे, निलेश राठोड, अनिकेत पहूरकर,अनिकेत ठाकुर,सुधीर पाटील याच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी सहकार्य केले.रक्तदान शिबिराचे संचलन रासेयो क. म. कार्यक्रम अधिकारी प्रा. पुरुषोत्तम येरडलावार यांनी केले.तर आभार महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. सुलोचना जाधव यांनी मानले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...