Skip to main content

स्वारातिम विद्यापीठ नांदेड व बळीराम पाटील महाविद्यालय किनवट यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ऑनलाईन कार्यक्रम



(किनवट शहर प्रतिनिधी)

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुल आणि बळीराम पाटील कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,किनवट मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने  मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.हा कार्यक्रम किनवट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहे. या वेबिनारचे

आदिवासी साहित्याचे अभ्यासक, भाषा, वाङमय व संस्कृती अभ्यास संकुलचे प्रा. डॉ. वैजनाथ अनमुलवाड हे उदघाटक म्हणून उपस्थित राहणार आहेत.दलित साहित्याचे अभ्यासक व विद्रोही कवी ,मराठी भाषेचे अभ्यासक प्रा. डॉ. आनंद इंजेगावकर हे मराठी भाषा संवर्धन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डाॅ. एस. के. बेंबरेकर राहणार आहेत.कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वागत गीत प्राचार्य सुरेश पाटील सादर करतील. 

मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या विषयावर प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. अनिल कांबळे,महात्मा गांधी महाविद्यालय, अहमदपूर, मराठी भाषेचा सार्वत्रिक वापरःवस्तुस्थिती व भवितव्य या विषयावर प्रसिद्ध विचारवंत, कथाकार, वैचारिक लेखक प्रा. डॉ. शंकर विभूते,इंदिरागांधी महाविद्यालय, नांदेड हे मार्गदर्शन करणार आहेत.मराठी भाषेचे भवितव्य व संवर्धन या विषयाच्या अनुषंगाने प्रा. डॉ. संतोष हंकारे, पारंपारिक तमाशा:कला आणि वास्तवजीवन बोलीभाषा संदर्भात मराठी विभागाच्या मुंबई विद्यापीठ, मुंबई येथील शामल गरुड यांचे व्याख्यान होणार आहे. समारोप कार्यक्रमात मराठी भाषा व संवर्धन व बोलीचे संवर्धन या विषयावर प्रसिद्ध विचारवंत प्रा. डॉ. रवींद्र बेंबरे हे मार्गदर्शन करणार आहेत. या वेबिनाराचे सत्रनिहाय सत्र अध्यक्ष म्हणून सत्यशोधकीय विचारवंत प्रा. रामप्रसाद तौर, प्रसिद्ध नाटककार व नाट्य लेखक प्रा. डॉ.अंबादास कांबळे, सत्यशोधकीय अभ्यासक प्रा. डॉ. उमाकांत इंगोले,प्रा.डाॅ.सुरेंद्र शिंदे उपस्थित राहणार आहेत. या वेबिनारमध्ये महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. राजकुमार नेम्मानीवार, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती आहे. या अभ्यासपूर्वक वेबिनारमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड.संचालक,भाषा,वाङमय व संस्कृती अभ्यास संकुलच्या डॉ. शैलजा वाडीकर, बळीराम पाटील महाविद्यालय, किनवट येथील मराठी विभागप्रमुख तथा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे यांनी कळविले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...