भोकर येथील पाच वर्षीय चिमुकलीवर बलात्कार व हत्या घटनेच्या निषेधार्थ किनवट येथिल आदिवासी मन्नेरवारलू समाज असोसिएशन तर्फे तहसिलदारांना निवेदन
किनवट ता.प्र दि २२ भोकर तालुक्यातील दिवशी येथिल ५ वर्षीय चिमुकलीवर बलात्कार करुन खुन केल्याच्या घटनेच्या निषेधार्थ किनवट येथिल
आदिवासी मन्नेरवारलू समाज असोसिएशन व्दारे अध्यक्ष प्रा.पुरषोत्तम येरडलावार यांच्या
नेतृत्वाखाली राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे यांना तहसिलदार किनवट यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
दिनांक २१ रोजी नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील दिवशी या गावात एका ५ वर्षीय
चिमुकलीवर बलात्कार करुन खुन केल्याची घटना घडल्या नंतर राज्यात या घटनेचा निषेध
नोंदवला व एकच संतापाची लाट उसळली तर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
आरोपीला कठोर शिक्षा व्हावी व या प्रकरणी तत्काळ सुनावनी करुन आरोपीला फासावर लटकवावे या आशयाचे निवेदन अध्यक्ष प्रा.पुरषोत्तम येरडलावार यांच्या नेतृत्वात देण्यात आले तर यावेळी सादर करण्यात आलेल्या
निवेदनावर युवा अध्यक्ष बालाजी न्यालमवार, सचिव संतोष माडपेल्लीवार,
रमेश निलमवार, निखिल गोस्कुलवार, श्रीकांत आवारीवार, प्रभाकर बोलेनवार,
सामाजिक कार्यकर्ते अलिम सय्यद यांच्या स्वाक्ष-या आहेत तर त्यावेळी उपस्थित
देखिल होते तर अनेक समाज बांधव देखिल यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment