Skip to main content

... अण् नामांतरा साठी आमचाही ९० किलो मिटर अंतराचा रात्रीचा सायकल मार्च... अॅड.मिलिंद सर्पे,किनवट.

 


   शिशु पँथर ते दलित पँथर अॅड मिलींद सर्पे यांचा जीवनातील रोमहर्षक प्रवास.....


मराठवाडा विद्यापीठाला डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचे नांव द्यावे ,अशी चळवळ "दलित पॅंथर',या संघटनेकडून मराठवाड्यात सुरु झालेली होती.तो काळ होता १९७७ चा. मी तेंव्हा होतो सहावित. २७ जुलै १९७८ ला विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा  ठराव एकमताने मंजूर झाला खरा परंतु , त्या नंतर २७ जुलै च्या  रात्रीपासून मराठवाड्यातील दलित समाजावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार सुरु झाले.मराठवाड्यातील दलित वस्त्या १५ दिवस जळत होत्या . मराठवाडा ठप्प झाला होता.नामांतराची अंमलबजावणी झाली नाही.पुढे चालून १४ जानेवारी १९९४ रोजी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर न होता नामविस्तार झाले, "डाॅ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद."

    नामांतर चळवळीचा मोठा इतिहास आहे.या चळवळीत माझा सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दादाराव कयापाक,सुरेश गायकवाड,मनोहर भगत,सुखदेव मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली माझा सहभाग होता.तो खारीचा असलातरी फारच स्फुर्तिदायक होता , असे मला आजही वाटते. त्या काळी मला प्रा. धनवे सरांनी "शीशू दलित पँथर",चा अध्यक्ष केले होते.

 नामांतराचा लढा सुरू झाला तेंव्हा मी सहावित होतो.वय होते १२ वर्षे.नामांतर झाले १९९४. तेंव्हा मी याच मराठवाडा विद्यापीठातून तीन पदव्या घेऊन बाहेर पडलो होतो.नामांतर लढ्यात सहभागी असलेला मी एक भीमसैनिक असल्याने या चळवळीत अनेक  आठवणी माझ्या स्मृतीत आजहि ताज्या तवान्या आहेत.

   आज १४ जानेवारी. नामविस्तार दिनानिमित्त नामांतर चळवळीतील एक अनुभव मी आपणास सांगणार आहे.तो असा....

 ते नामांतर चळवळीतील भारावलेले दिवस होते.नामांतराच्या संदर्भाने गोकुळ गोंडेगाव येथे "दलित पॅंथर" च्या वतीने जाहिर सभेचे रात्री आयोजन करण्यात आले होते.बहुदा १९७७ चेच साल असावे.दलित पॅंथर चे कार्यकर्ते किनवटहून शेवटच्या सायंकाळ च्या बसने रवाना झाले.यात प्रा.पी.एस.धन्वे, दादाराव कयापाक,सुरेश गायकवाड,सुखदेव मुनेश्वर, नितिन कावळे इत्यादींचा समावेश होता.मी सहावित असल्याने माझ्याकडे गोकुळ गोंडेगाव ला एस.टी.ने जाण्यासाठी पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता.परंतु, सभेला जायायची माझी तीव्र इच्छा होती.म्हणतात ना की,'ईच्छा तेथे मार्ग'.मी गोकुळ गोंडेगाव ला  सायकलने जाण्याची तयारी केली.यासाठी मी माझे बालमित्र प्रकाश पाटील व दिलिप कावळे यांना तयार केले व आम्हि तीघे बाल मित्र किरायाच्या दोन सायकली घेऊन निघालो रात्री आठ वाजता. दिलिप कावळेला सायकल चालवता येत नवती.सांगण्यासारखे म्हणजे ती रात्र होती अमास्याची,काळाकुट अंधार  व  कच्चे रस्ते.  रस्त्याने किनवट ते गोकुळ हे अंतर आहे अंदाजे ४५ किलो  मिटर कच्चा व जंगल व्याप्त रस्ता.ही रात्रपार करुन आम्हि  पोंहलो रात्री दोन वाजता गोकुळ गोंडेगाव ला.मला त्या काळात ब-यापैकी भाषण करता येत असलेल्याने  तेथे माझे भाषण झाले.यानंतर आम्हि जेवन करुन परतीच्या प्रवासाला निघालो रात्री चार वाजता व पडत उठत किनवटला पोंहचलो दुपारी ११ च्या  सुमारास ‌.घरातली साखर व ज्वारी चोरुन विकली आणि सायकलचा किराणा दिला.

   ही घटना जरी छोटी वाटत असली तरी चळवळीच्या दृष्टीने फार मोठी आहे, असे मला वाटते .म्हणूनच आजच्या नामांतर दिनानिमित्ताने बालवयातील  ९० किलो मिटरच्या विशेष म्हणजे रात्रीच्या सायकल मार्चची ही घटना शेअर केली आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.