Skip to main content

Posts

Showing posts from November, 2021

किनवट येथे संभाजी ब्रिगेडचा ५ वा वर्धापन दिन साजरा

  किनवट प्रतिनिधी किनवट येथे संभाजी ब्रिगेडचा ५ वा वर्धापन दिन छत्रपती संभाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून संथागार वृद्धाश्रमात फळे वाटप करून साजरा करण्यात आला. वृद्धाश्रमाच्या वतीने अरुण आळणे यांनी संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांचे राष्ट्रमाता माँ.साहेब जिजाऊ ची प्रतिमा देऊन स्वागत केले व संभाजी ब्रिगेडच्या ५ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत संभाजी ब्रिगेडने दिलेले योगदान खूप मोठे आहे.आज संभाजी ब्रिगेड पक्षाची स्थापना होवून ५ वर्षे पूर्ण झाली आहेत. युगनायक अॅड. पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी आमच्या सारख्या लाखो युवकांना मन मनगट आणि मस्तक सशक्त करून राजसत्ता स्थापित करण्यासाठी संभाजी ब्रिगेड पक्षाची ३०-नोव्हेंबर २०१६ रोजी स्थापना केली.आज त्याला ५ वर्ष पूर्ण झाले.असे मत यावेळी बोलतांना बालाजी सिरसाट यांनी व्यक्त केले. यावेळी संथागार वृद्धाश्रमाचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष अरुण आळणे अधिक्षक आकांक्षा आळणे संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट, सुमित माने, रितेश मंत्री ईश्वर गुर्लेवाड विशा

पर्यावरण संवर्धन कृती संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती-प्रणाली चिकटे

  किनवट, दि.२९ :  पर्यावरण संवर्धन आणि  महिला सशक्तीकरण जनजागृती आणि सामान्य जनजीवनातील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आपण कृती संदेश घेऊन संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करीत आहोत,अशी माहिती यशदा, जलसाक्षरता विभागा अंतर्गत  प्रशिक्षित जलदूत प्रणाली बेबीताई विठ्ठल चिकटे,राहणार पुनवट(ता. वणी, जि. यवतमाळ) यांनी आज पत्रकारांशी  संवाद साधताना दिली.    आज(दि.२९)सकाळी १० वाजता त्यांनी साने गुरुजी रुग्णालयाच्या सभागृहात डॉ. अशोक बेलखोडे यांच्या उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्या बोलत होत्या.   सभोवतालील, दिवसेंदिवस बदलती उपभोगवादी जीवनशैली, वाढते प्रदूषण, तापमानवाढ, अनिश्चित पाऊस , वातावरणदल, ऋतुचक्रबदल, यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या आणि शेतीच्या समस्या, इतर वाढत्या स्थलांतराच्या समस्या लक्षात घेता, सध्या सायकलने प्रवास करत आदिवासी, ग्रामीण, शहरी भागात जाणे, स्थानिक संस्था, शाळा आणि सरकारी यंत्रणेतील अधिकारी व ग्राऊंड लेव्हल वर काम करणारी व्यक्ती, समूह यांना भेटी देणे व जनजागृती उद्देश ठेवून  माहिती पोहचविणे, शक्य तितकं लोकांशी समस्याबाबत  चर्चा करणे, संवाद साधत त्या- त्या भागातील पर

बायो सीएनजी प्रकल्पाचे नितिन गडकरीनां निमंत्रण.

  किनवट:(तालूका प्रतिनिधी)        जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी किनवटच्या संचालकांनी बायो सीएनजी प्रकल्प उभारणी संदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची नुकतीच भेट घेतली असून प्रकल्पाचे निमंत्रण गडकरीनां दिल्याने विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. .         जयआनंद शेतकरी उत्पादक कंपनी ने नुकतेच 10 हजार सभासद नोंदणी केले आहे. राजगड येथे गवतापासून सीएनजी व सेंद्रिय खत  तयार करणारा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर संचालक मंडळतील विनायक गव्हाणे,चंपतराव जाधव, बाळकृष्ण कदम व गौरव नेम्मानीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची  भेट घेतली.  यावेळी त्यांनी बायो सीएनजी व सेंद्रिय खत प्रकल्पाची माहिती विचारली व प्रकल्प उभारणीच्या निमंत्रणास सकारात्मक प्रतिसाद दिला.  दगड, माती, लोखंड व काच सोडून सर्वांपासून तयार होणारा बायो सिएनजी देशासाठी व शेतकर्‍यांचे उत्पन्न दुप्पट होण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असुन या प्रकल्प उभारणीच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.           गवतापासून सीएनजी तयार होणार हा प्रकल लकरच राजगड येथे उभारण्यात येणार आहे. य

ऑल इंडिया पँथर सेनेच्या वतीने संविधान गौरव महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

   नांदेड :  ऑल इंडिया पँथर सेना आयोजित संविधान गौरव महोत्सव मोठ्या उत्साहात  छत्रपती चौक याठिकाणी साजरा करण्यात आला.कार्यक्रमाची सुरुवात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार व दिपप्रज्वलन करून  करण्यात आली.त्यानंतर लगेचच संविधान प्रस्ताविकेचे सामुदायिक वाचन करण्यात आले.        कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून डॉ.विकास कदम हे होते. त्यांनी उद्घाटनपर भाषणात  संविधानावर प्रकाश टाकला.. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक भिमराव बुक्तरे यांनी केले.  तर प्रमुख वक्ते म्हणून राहुल पवार ( बुलढाणा ) हे होते.ते पुढे बोलतांना म्हणाले की, सर्व महापुरुषांच्या विचाराचा ठेवा म्हणजे भारतीय संविधान आहे.        कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभलेले डॉ.गणेश जोशी,ऍड.विजय गोणारकर हे होते.      जोशी पुढे बोलताना म्हणले की, संविधान कोण्या एका जाती किंवा धर्मासाठी नसून ते पूर्ण  भारतीयांसाठी  आहे.  तर प्रमुख पाहुणे म्हणून  लाभलेले माधवदादा जमदाडे , मनीष कावळे, डॉ. विठ्ठल पावडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. राजू सोनसळे, अक्षय जोंधळे, वैभव गायकवाड, अशोक वायवळे, दिनेश

स्वारातिम उपकेंद्र र्के.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रामध्ये संविधान दिना निमित्त परिसंवाद

  किनवट श. प्रतिनिधी:- किनवट तालुक्यातील स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा उपकेंद्र र्के.श्री उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्रामध्ये भारताला आज संविधान स्विकारून ७२ वर्ष झाली भारत देश जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा देश म्हणून महासत्ते कडे वाटचाल करीत आहे या दिनाचे औचित्य साधून  परिसंवाद कै.श्रीउत्तमराव राठोड स्वारातिम उपकेंद्रात परीसंवादाचे आयोजन करण्यात आले होते या परीसंवादास प्रमुख व्याख्याती म्हणुन संथागार वृद्धाश्रमाची अधिक्षीका आकांक्षा आळणे यांची उपस्थिती लाभली होती त्यांनी भारतीय राज्य घटना व मुलभुत हक्क या विषयावर  व्याख्यान दिले तसेच आदीवासी संशोधन व समाजकार्य BSW च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की आपल्याला जेंव्हा भारतीय राज्यघटना मूलभूत कर्तव्ये प्रदान करते तिथेच आपली राज्यघटना मूलभूत कर्तव्यांच्या मार्फत काही जबाबदाऱ्या आपल्या वर सोपवते त्या जबाबदाऱ्या पार पाडन प्रत्येक नागरिकांच कर्तव्य आहे तसेच संविधानाची मुल्य जोपासने , संविधानाचे या संविधानामुळेच देश कसा एकसंघ बनला आणि देशातील नागरीकांना कसे अधिकार प्रदान केले व न्याय दिला अशी माहीती आळणे यांनी

सरस्वती विद्या मंदिर महाविद्यालयात संविधान उत्साहात

  राजेश पाटील किनवट शहर बातमिदार :  सरस्वती विद्या मंदीर कला महाविद्यालय परिसरात महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला व संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आनंद भंडारे, प्रा. डॉ.सुनिल व्यवहारे, प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी, प्रा. रामकिशन चाटे, प्रा. डॉ.द्वारका प्रसाद वायाळ, प्रा. अण्णासाहेब सोळंके, प्रा. विजय उपलेंचवार, प्रा. मनोहर थोरात प्रा. किरण पाईकराव, प्रा. प्रदीप एडके प्रा. पाटील, प्रा. विवेक चनमनवार, प्रा. अजय किट्टे , प्रा. डॉ. किरण आयनेनीवार, सेवक गोवींद मामा आदी उपस्थित होते.

कनकवाडी ग्रामपंचायत कार्यालयात संविधान दिन साजरा व प्रास्ताविकेचे वाचन

    राजेश पाटील special report किनवट :  २६ नोव्हंबर १९ रोजी भारताने भारताने संविधान अंगिकृत केले व २६ जानेवारीला प्रजेच्या हाती सत्ता आली भारतीय राज्य  घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व मसुदा समितिने  २ वर्ष ११ महिने१८ दिवस अथव परीश्रम घेऊन जगातील सर्वात मोठ्या लोकशाही राज्य घटनेची  निर्मिती केली याच दिनाचे  औचित्य साधून किनवट तालुक्यातील कनकवाडी ग्रामपंचायत कार्यालयात २६ नोव्हेंबर संविधान दिन साजरा करण्यात आला व प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले यावेळी ग्रामसेवक सुनिल जाधव सरपंच जयश्री पंडीत व्यवहारे, अंगणवाडी सेविका कार्यकर्ती कमल बाई शिसले, ग्रां प. सेवक आत्माराम नपते, सी ए स सी संगणक परिचालक संतोष आडे आदींची उपस्थिती होती

ॲड.श्रीकृष्णा राठोड यांची विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता पदी निवड

  किनवट,दि.२६ : दिवाणी व फौजदारी न्यायालयातील जेष्ठ अभिवक्ता अॅड.श्रीकृष्णा राठोड  यांची मुलाखतीतून सहाय्यक सरकारी अभिवक्तापदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.    अॅड.श्रीकृष्णा मोहनराव राठोड हे मागील अनेक वर्षांपासून किनवट न्यायालयात वकिली करीत आहेत.एक यशस्वी वकिल म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.अभिवक्ता संघाचे सचिव म्हणूनही त्यांनी कांही वर्षे काम केले आहे.  फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम २५(३) नुसार विशेष सहाय्यक सरकारी पदासाठी ता.२४नोव्हेंबर रोजी नांदेड येथे घेतलेल्या मुलाखती मधून १९ उमेदवारांची निवड मुलाखत समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सदस्य चंद्रसेन देशमुख व आर.एस.चरके यांच्या समितीने केली आहे.   निवड झाल्याबद्दल श्री. राठोड यांचे अभिनंदन किनवट अभिवक्ता संघाचे अध्यक्ष एड.अरविंद चव्हाण, उपाध्यक्ष एड.तौफिक कुरेशी,सचिव एड.पंकज गावंडे,सहसचिव एड.बिपीन पवार,कोषाध्यक्ष एड.सुनिल येरेकार व ईतर अभिवक्त्यांनी केले आहे.

संविधान गौरव महोत्सवास हजारोच्या संख्येने सहभागी व्हा- भिमराव बुक्तरे

   नांदेड :  ऑल इंडिया पँथर सेना नांदेड आयोजित संविधान दिन २६ नोव्हेंबर निमित्त संविधान गौरव महोत्सवास हजारोंच्या संख्येने उपस्थित राहुन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे यांनी केले.       छत्रपती चौक,नांदेड  याठिकाणी दुपारी 12 वाजता संविधान गौरव महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.          या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून  प्राचार्य डॉ.विकास कदम तर अध्यक्षस्थानी  तहसीलदार किरण अंबेकर यांची उपस्थिती  असणार आहेत तर या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून युवा वक्ते राहुल पवार यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभणार आहे.  या कार्यक्रमात संविधानाची प्रत, व प्रस्ताविका चे मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात येणार आहे असे भिमराव बुक्तरे यांनी सांगितले. पुढे बोलतांना ते म्हणाले की आज संविधनाविषयी जनजागृती करण्यात आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे.

खासदार हेमंत पाटील यांच्या पाठपुराव्याने जलधारा ३३ केव्ही उपकेंद्राला ५ मेगावॅटचे रोहित्र मिळाल्याने शेतीसह ९ गावांचा विज पुरवठा पुर्ववत

  किनवट प्रतिनिधी:  किनवट तालुक्यातील जलधारा सर्कल मधील ३३ केव्ही उपकेंद्रातील ५ मेगावॅटचे रोहित्र जळाल्याने ९ गावांचा विज पुरवठा  मागील एक महिण्यापासून खंडित झाला होता,  खासदार हेमंत पाटील यांनी पाठपुरावा करून एका दिवसात हा प्रश्न निकाली काढून  शेतीसह ९ गावांचा विजेचा प्रश्न मिटला असुन खासदार हेमंत पाटील यांचे आभार मानले जात आहेत. खरिपानंतर शेतकऱ्यांनी रब्बीच्या पेरणीला सुरवात केली, गहू , हरभरा पीक घेण्याची लगबग सुरू आहे, शेतीसाठी लागणारा वीज पुरवठा जलधारा सर्कल मधिल सावरगाव, सावरगावतांडा, मांजरीमाथा,वाघदरी,रिठा, रिठातांडा, नंदगाव, नंदगावतांडा, या   गावांचा विज पुरवठा जलधारा ३३ के.व्ही. उपकेंद्रातील ५ मेगावॅटचा क्षमतेचा शेती पंपाचा पॉवर ट्रान्सफॉर्मर  जळाल्यामुळे मागील एक महिन्यापासून खंडित झाला होता.  त्यामुळे या भागातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत होते. याबाबत खासदार हेमंत पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी तक्रारू करताच तात्काळ खासदार पाटिल यांनी त्यादृष्टीने कारवाई करण्यासाठी वरीष्ठ पातळी वरून महावितरणची सर्व यंत्रणा कामाला लावली.  खासदार हेमंत पाटील यांनी स्वतः नांदेड जिल्

शेतातील वीज जोडणी सुरळीत करा अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करण्यात येईल -अजय कदम पाटील

  किनवट प्रतिनिधी/ सय्यद नदीम  : जगभरात कोरोना संक्रमनाने आधीच आर्थिक संकटात शेतकरी अडकला त्यातच अस्मानी संकटाने अवेळी आलेल्या पावसाने शेतकरी यांचे कंबरडे मोडले बी बियाणे घेण्यासाठी शेतकरी कर्जबाजारी होऊ लागला आहे . रब्बी हंगामात हरभरा ,गहू या पिकांची लागवड केली असून बीज अंकुर फुटण्याच्या अवस्थेत आहे. या पिकांना जलस्त्रोता द्वारे पाणी देणे चालू असून अचानक पूर्वसूचना न देता विजतोडणी केली जात आहे.   शेतकऱ्यांची वीज पंपाची वीज तोडणी केल्यास लोकशाही मार्गाने महावितरण समोर आंदोलन करू असा इशारा अजय कदम पाटील तालुका अध्यक्ष संभाजी ब्रिगेड यांनी एका निवेदनाद्वारे तहसीलदार यांना दिला असून तहसीलदार मार्फत सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना देण्याचे निवेदनात उल्लेख आहे. शेतकऱ्यांचा महावितरणने सहानुभूति पूर्वक विचार करावा व वीज जोडणी सुरळीत चालू करून सहकार्य करावे असे स्पष्ट निवेदनात असून यावर सुनील चव्हाण पाटील , शिवा पाटील सोळंके,सम्यक सर्पे ,धनंजय कराळे, परमेश्वर घाडगे ,पप्पू  पुटवाड यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

हजरत टिपु सुलतान यांची २७१ वी जयंती हर्षोल्हासात साजरी टिपु सुलतान ब्रिगेडचा उपक्रम

 किनवट ता.प्र. मैसुर घराण्यातील एक कुशल महान शासक १७६१ मध्ये त्यांनी शासन चालवले  इंग्रजा सोबत झुंज देत त्यांना विरगती प्राप्त झाली तसेच लंडन येथील अठराव्या शतकातील म्युझीयम मध्ये त्यांचे रॉकेट ठेवुन आहे अशा कार्यानी इतिहासातील आपली छाप सोडणारे हजरत टिपु सुल्तान यांची २७१ वी जंयतीचे औचित्य साधून किनवट येथील टिपु सुलतान ब्रिगेड शाखेच्य वतीने दारलुम मदरसा येथे विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले यावेळी टिपु सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम , तालुका अध्यक्ष शेख शाकीर शहराध्यक्ष हाफिज तोसीफ साहब , युवा ता. अध्यक्ष शेख रियाज, मेहमुद शेख , फारूक चव्हाण, शब्बीर भाई, नासेर भाई आदी उपस्थित होते टिपु सुलतान ब्रिगेडचे  प्रदेशाध्यक्ष डॉ. जहीरोद्दीन पठान यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.

गंधकुटीत कार्तिक पौर्णिमेनिमित्त प्रबोधनात्मक 'काव्यपौर्णिमा' रंगली. प्रत्येक पौर्णिमा काव्यपौर्णिमा : क्रांतीसूर्य प्रतिष्ठान उपक्रम !

  किनवट ( प्रतिनिधी ) : गंधकुटी बुद्धविहार सिद्धार्थनगर गोकुंदा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने 'काव्यपौर्णिमा' घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा साहित्यिक रमेश मुनेश्वर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा. गजानन सोनोने, सांगावाकार महेंद्र नरवाडे, कवी रुपेश मुनेश्वर, गायक सुरेश पाटील, कवी प्रकाश सोनवणे उपस्थित होते. उपस्थितांच्या बहारदार काव्य प्रबोधनाने  कवी संमेलनात रंगत आणली. प्रारंभी वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे संचालक  सुरेश पाटील यांनी वंदनगीत गाऊन कार्यक्रमास सुरवात केली. त्यानंतर राणीसाकार प्रा.गजानन सोनवणे यांनी..  " गातो मी गाणे निळ्या नभाचे  आहे तराने नव्या दमाचे ... " ही रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळविली. सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी -  " घटनेच्या पानातून प्रतिष्ठा ही मिळतांना रुढीवादी ग्रंथ मग चाळता कशाला " ही रचना सादर करून संविधान जागृती केली. कवी रुपेश मुनेश्वर यांनी -  " इतिहासाचे पान पहा जगी ठरलया महान , माझ्या भिमरायाचं देनं भारताच संविधान"

इंडियन ड्रॅगन कुंग- फु मार्शल आर्ट अकॅडमी तर्फे १५ दिवसीय मोफत कराटे प्रशिक्षण शिबीर

  गोकुंदा ग्रा.प्रतिनिधी:- विद्यार्थ्यांना मानसीक व शारिरीक सर्वांगाने ते समृध्द व्हावे व त्यांचे स्वतःचे संरक्षण करता यावे त्यांना शिस्त लागावी त्यांची चंचलवृत्ती , स्मरणशक्ती वाढावी व सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे इंडियन ड्रॅगन  कुंग- फु मार्शल आर्ट अकॅडमी नांदेड यांच्या वतीने शांती निकेतन परीसर गोकुंदा येथे ११ नोव्हेंबर ते२५ नोव्हेंबर पर्यंत १५ दिवसीय मोफत कराटे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या सुवर्ण संधीचा लाभ शालेय विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन इंडियन ड्रॅगन  कुंग- फु मार्शल आर्ट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक भिमराव सर( ब्लॅक बेल्ट), सहायक प्रशिक्षक हुकुम ठाकुर सर, व राईज अकॅडमीचे लक्ष्मीकांत कापसे सर यांनी केले आहे

CIBIL (सिबिल) म्हणजे काय याबद्दल महत्त्वपूर्ण माहिती.

  (Credit Information Bureau (India) Limited (CIBIL) माझ्या महाराष्ट्रातील तमाम नोकरदार वर्ग, भांडवलदार, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, कामगार ,ग्रहणी, तसेच माझ्या बंधू व भगिनींनो आज आपण एक जिव्हाळ्याचा व अत्यंत गरजेचा विषय यावर आपण माहिती घेणार आहोत तो म्हणजे ज्या ज्या वेळेस आपण आपल्या स्वतःच्या कमाई मधून आपल्या गरजा भागवू शकत नाही त्यावेळेस आपण इतरांवर अवलंबून असतो म्हणजेच आपल्या कमाईच्या व्यतिरिक्त इतर व्यक्तीकडून, संस्थेकडून आपण कर्ज घेत असतो त्या कर्जाच्या स्वरूपात आपण त्यांना "व्याज" देत असतो म्हणजे मानवी जीवनाचे आर्थिक चक्र गतिमान व्हावे मानवी जीवन हे आनंदमय सुखमय होवो यासाठीच हा एक आर्थिक व्यवहार हा भाग निर्माण झालेला आहे या आर्थिक व्यवहाराचे जतन किंबहुना आता पेक्षाही जास्त सुरक्षित आर्थिक व्यवहार किंबहुना अर्थ नियोजन आपल्याला आपल्या येणाऱ्या पिढीसाठी द्यायचा आहे किंबहुना प्रदान करायचा आहे त्यासाठी आपल्याला सर्वांनी आजपासूनच मानवा मानवातील परस्पर आर्थिक व्यवहार हे चांगले राहिले पाहिजेत यासाठी आपल्या सर्व नागरिकांना आर्थिक व्यवहार परस्पर आर्थिक व्यवहार हे चांगले राहावे यास

सरफेसी कायदा 2002 महत्व पूर्ण माहिती. (Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 - SARFAESI Act)

  माझ्या महाराष्ट्रातील तमाम  भांडवलदारांनो, कामगारांनो, शेतकऱ्यांनो, नोकरदार वर्ग, व्यापाऱ्यांनो तसेच माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो आज आपण एक नवीन आणि सध्या जिव्हाळ्याचा विषय होऊन बसलेल्या सरफेसी अधिनियम ज्याला मराठी भाषेमध्येआर्थिक मालमत्तेचे तारणीकरण, पुनर्गठण व तारणांवरील हक्काची अंमलबजावणी कायदा 2002 असे संबोधल्या जाते त्या बदल आपण जाणून घेणार आहोत हा अधिनियम आपल्याला जाणून घेणे फारच महत्त्वाचे आहे बॅंकांच्या, फायनान्शियल संस्थेच्या (फायनान्शिअल कंपनी)मोठ्या किंवा छोट्या रकमांची कर्जे थकबाकीची प्रभावीपणे व परिणामकारक वसुली करणे सुलभ व्हावे या उद्देशाने सरफेसी कायदा अमलात आला. या कायद्यामुळे सहकारी बॅंकांसह सर्वच बॅंका व *आर्थिक संस्था* (फायनान्शिअल कंपनी) यांना थकबाकी वसूल करणे सोपे झाले आहे. एकूण विचार करता सरफेसी कायदा बॅंकांसाठी आर्थिक संस्था साठी वरदानच आहे व त्याचा जास्तीत जास्त फायदा घेणे बॅंकांसाठी व आर्थिक संस्थे साठी हितावह आहे. दिवसेंदिवस बॅंकांच्या आर्थिक संस्थेच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत होती,  एनपीएच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली होती. वसुलीसं

स्थानिक विकास निधीतून दिव्यांगांच्या राखीव निधी दहा लक्ष रुपये खर्च करा-राज माहुरकर

  किनवट प्रतिनिधी जागतिक अपंग दिनानिमित्त दिनांक 03/12/2021 रोजी अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या वतीने आमदार भीमराव केराम यांना अर्ज देऊन राखीव निधी 10 लक्ष रुपये खर्च करण्या संबंधि दुसऱ्यांदा विनंती अर्ज दिला. किनवट माहूर तालुका हा अतिशय डोंगराळ व आदिवासी तालुका म्हणून शासनदरबारी ओळख आहे अशा या विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम हे निवडून आल्याने सामान्य जनतेच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत यामध्ये कोरोणा काळाने तर भल्याभल्यांना जेरीस आणले होते व आजही परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी बराच काळ लागणार आहे अशा परिस्थितीमध्ये अपंग बांधवांचे हाल तर न बोललेले बरे अशी अवस्था झाली असताना गेल्या वर्षापासून राज माहुरकर लढत असून बऱ्याच पैकी दिव्यांगांना न्याय मिळवून देण्यामध्ये यशस्वी झाले असले तरी शासन निर्णयानुसार स्थानिक विकास निधी मधील राखीव 10 लक्ष रुपये गेल्यावर्षी मागणी करून मिळाली नसल्याचे अर्जात नमूद केले आहे परंतु या वर्षी तरी आमदार भीमरावजी केराम साहेब यांनी दिव्यांगांच्या राखीव 10 लक्ष रुपये येणाऱ्या जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून दिव्यांगावर खर्च करावा अशी अपेक्षा संघटनेचे सचिव यांनी अ

अशोक चव्हाण यांचे शांततेचे आवाहन

  मुंबई:- त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात महाराष्ट्रात काही ठिकाणी तोडफोड झाल्याच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त करून शांततेचे आवाहन केले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात काही ठिकाणी दगडफेक, वाहनांची तोडफोड असे प्रकार घडले आहेत. निषेध नोंदवण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करणे चुकीचे आहे. या घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांततेचे पालन करावे, असेही आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.

त्रिपुरा राज्यात झालेल्या मस्जीद मदरसा जळीत हल्ला प्रकरणी मुस्लीम समुदायाचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा

  किनवट ता. प्रतिनिधी: त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजाचे धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या मस्जीद व मदरशांवर योजनाबद्ध पद्धतीने हल्ले झाले या विरोधात त्रीपुरा सरकारने च्या विरोधात आज १२ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता नमाज पठण करून किनवट येथे जामा मस्जीद ते उपविभागिय अधिकारी कार्यालय पर्यंत रॅली चे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत मुस्लिम मौलवी , सामाजीक संघटना , टिपु सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, तालुका अध्यक्ष शेख शाकीर व राजकीय पक्ष, कम्युनीष्ट पार्टी ऑफ इंडिया चे अर्जुन आडे, गब्बर काजी,वंचीत ब. स. आ. एम आय एम, रॉ. कॉ. , एस अहमद अली, साजीद आदी विविध पक्षांचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते त्यांनी उपविभागिय अधिकारी यांना निवेदन दिले व त्रीपुरा प्रकरणी कठोरत कठोर कारवाई करण्याची विनंती केली .

मांडवी येथे शनिवारी शासकिय सेवा व योजनांचा महा मेळावा:सकाळी ९ वाजता उद्घाटन सोहळा

    किनवटदि.१२ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवी (ता. किनवट) येथे शनिवारी(दि.१३) सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत "शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा",आयोजित करण्यात आला आहे.     सकाळी ९ वाजता उद्घाटन सोहळा होईल.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल.आणेकर हे राहतील.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर(घुगे),जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे व सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच.पुजार हे उपस्थितीत राहतील.    या महामेळाव्याची जय्यत तयारी तालुका प्रशासनाने केलेली आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचावी व त्यांचा लाभ जनतेला मिळावा, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   या महामेळाव्यात शासनाच्या विविध कार्यालयांचे ७५ स्टाल राहणार आहेत.या स्टालवर त्या त्या कार्यालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय से

मांडवी येथे शनिवारी शासकिय सेवा व योजनांचा महामेळावा ; तालुका प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी

    *किनवट*,दि.११ : स्वातंत्र्याच्या अम्रत महोत्सवानिमित्त  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवी (ता. किनवट) येथे शनिवारी(दि.१३) सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत "शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा",आयोजित करण्यात आला आहे.या महामेळाव्याची जय्यत तयारी तालुका प्रशासनाने केलेली आहे, अशी माहिती सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार, तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस.बी.अंभोरे यांनी दिली.    शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचावी व त्यांचा लाभ जनतेला मिळावा, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.   या महामेळाव्यात शासनाच्या विविध कार्यालयांचे ७५ स्टाल राहणार आहेत.या स्टालवर त्या त्या कार्यालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवा व  योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने जनतेकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे व पूर्तता करणाऱ्या नागरिकांना त्वरीत लाभही देण्

वी कंपनीचे मोबाईलचे टावर बसवण्यासाठी नागरीकांचा आक्षेप

Vi mobile tower राजेश पाटील  किनवट शहर बातमीदार: सध्या मोबाईल नेटवर्कचे जाळे दिवसेंदिवस वाढतच चालले असुन या टावर मधुन निघणाऱ्या रेडीएशन लहरी मुळे मानवी शरीरावर बिकट परिणाम होत आहे खैरोद्दीन मार्ग येथे भारत नागरगे यांचा कॉम्पलेक्स आहे याच छतावर वी मोबाईल कंपनीचे टावर बसवण्यात येणार आहे परंतु या टावर उभारण्या विरोधात जागरूक समाज सेवक शेख मुशेब शेख युसुफ व तेथील स्थानिक रहीवाशांनी आक्षेप घेतला आहे त्यांचे म्हणने आहे की या वी मोबाईल टावर मुळे लहान बालके व वयोवृद्ध  लोकांना टावर पासुन निघणाऱ्या फ्रिक्वेन्सी मुळे शरीरावर विपरीत परिणाम होत आहे म्हणुन हे टावरचे काम त्वरीत थांबवावे व लोकांच्या आजारांचे संरक्षण करावे असे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय यांना देण्यात आले . या निवेदनवर शेख मुशेब शेख युसुफ, अनवर म. सुलेमान, मोहसीन, सुदाम मुनेश्वर, शोएब शेख, अली चाऊस, योगेश बिरमुर, समीर शाह, जुनेद खान, शेख इब्राहीम, शेख जोहेब, शादाब शेख, म. शारीक, सय्यद नदीम, शेख सोहेल, अरस लान खान, सईद अरबाज, सय्यद मुजीबोदिन, एजाज म. इसाक आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सम्राट अशोक महिला बचत गटास सेवार्थ फाऊंडेशन तर्फे लघु उद्योग प्रशिक्षण

किनवट:  किनवट तालुक्यातील घोटी या गावी सेवार्थ फाऊंडेशन तर्फे आज सम्राट अशोक महिला बचत गटास लघु उद्योग प्रशिक्षण देण्यात आले. सेवार्थ फाऊंडेशन तर्फे विविध क्षेत्रात काम करत असून सेवार्थ फाऊंडेशन हे महिला व बालविकास यासाठी पण काम करत असून याचाच एक भाग म्हणजे महिला सक्षमीकरण करण्यासाठी आज सेवार्थ फाउंडेशने सम्राट अशोक महिला बचत गटास आज लघु उद्योग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी सम्राट अशोक महिला बचत गटाच्या अध्यक्ष इंदुबाई लढे तसेच सचिव पंचफुलाबाई कानिंदे तसेच सयाबाई पाटील, निर्मलाबाई कावळे, शिल्पा पाटील, सुमनबाई कयापाक, जनाबाई पाटील, पुष्पाबाई पाटील, सीमा भवरे, धम्मदीक्षा पाटील सर्व सभासद उपस्थित होते तसेच सेवार्थ फाऊंडेशन तर्फे ऋषिकेश लढे तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते.

भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ओबीसी जागर अभियानास सुरवात

किनवट प्रतिनिधी: भाजपा ओबीसी मोर्च्या च्या वतीने ओबीसी जागर अभियानाची सुरुवात किनवट तालुक्यातील इस्लापूर येथून मा. आमदार भीमरावजी केराम साहेब यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आली यावेळी ओबीसी मोर्चा.जि.अध्यक्ष बाबुराव केंद्रे, मा.गोविंराव अंकुरवाड,अनु. जमाती अध्यक्ष. मा.अनिल तिरमनवार,मा.संदीप केंद्रे ता. अध्यक्ष मा.सूर्यकांत अरंडकर जी.प. सदस्य मा.भगवान हुरदुके जी.प. सदस्य,मा.कपिल करेवाड प.स.उपसभापती, शेखर चिंचोलकर ओबीसी ता.अध्यक्ष किनवट क्षेत्र,माधव डोकळे प.स.सदस्य, काशिनाथ शिन्दे जी.सचिव मा.बालाजी आलेवार मा.प्रकाश भोयर मा.स्वप्नील गरडे मा.नारायण राठोड मा.विवेक केंद्रे मा. रमेश बोडेवाड मा. गणपत राठोड मा.देविदास पळसपुरे मा.बोरकर मा.जीतेंन्द्र अ .कुलसगे भाजपा अनु'जमाती मोर्चा ग्रामिण जिल्हाउपाध्यक्ष,  भाजपा, वइतर भाजप पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित होत.,

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रचे संस्थापक डी. टी. आंबेगावे यांचा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालय, संथागार वृद्धाश्रमात फळ व बिस्कीटे वाटुन साजरा

✍🏻राजेश पाटील ( ता. प्र. किनवट ) शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक, अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांचा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना व संथागार वृध्दाश्रमात वृध्दांनाफळ व बिस्कीटे वाटप करून साजरा करण्यात आला तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून पदाधिकारी सदस्यांना नियुक्ती पत्र ओळखपत्र देण्यात आले यावेळी रुग्णालयात परीचारीका, व डॉक्टर यांनी सहकार्य केले तसेच संथागार वृद्धाश्रमात संचालक तथा माजी नगराध्यक्ष अरुण आळणे , माजी न. प. सेवीका करूणाताई आळणे , अधिक्षीका आकांक्षा आळणे, संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला या वेळी आशिष शेळके, नसीर तगाले ,सय्यद नदीम,राजेश पाटील ,शेख अतीफ, शेख राजीक शे. शब्बीर,प्रणय कोवे , विशाल गिमेकर,गंगाधर कदम,राज माहुरकर ,रमेश परचाके , बापुराव वावळे, लखन जाधव आदी  पत्रकार मंडळी उपस्थित होती  या वेळी सर्व पदाधिकारी सदस्यांनी मा. डी . टी.आंबेगावे  यांना फोन करून व समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या.

मांडवी येथे शनिवारी शासकिय सेवा व योजनांचा महा मेळावा

    किनवट,दि.१० :जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद हायस्कूल,     मांडवी (ता. किनवट) येथे शनिवारी(दि.१३) सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत "शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा",आयोजित करण्यात आला आहे. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचावी व त्यांचा लाभ त्यांना मिळावा, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे,अशी माहिती,सहाय्यक जिल्हाधिकारी किर्तिकिरण पुजार तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, दिवाणी न्यायाधीश एस.बी.अंभोरे व सहदिवाणी न्यायाधीश व्ही.जी.परवरे यांनी दिली.   या महामेळाव्यास उपस्थित राहून सर्व योजनांच्या माहीतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड.अरविंद चव्हाण, सचिव ॲड.पंकज गावंडे, किनवट तालुका ग्राहक पंचायत या स्वंयसेवी ग्राहक संस्थेचे अध्यक्ष ॲड.मिलिंद सर्पे व सचिव प्रा.विशाल गिमेकर यांनी केले आहे.

लोकनेते माजी आमदार नाईक साहेब यांचा वाढदिवस राजू सुरोशे यांच्या नेतृत्वात साजरा

  किनवट ( तालुका प्रतिनिधी) किनवट/ माहूर तालुक्याचे लोकनेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचा वाढदिवस किनवट/ माहूर व तमाम महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात आला त्यामध्ये किनवट शहरा जवळच असलेल्या घोटी येथे राजू सुरोशे पाटील यांच्या नेतृत्वाने समस्त गावकऱ्यांच्या  पुढाकाराने लोकनेते माननीय प्रदीप जी नाईक साहेब यांचा वाढदिवस फुलाजी बाबा सिद्धेश्वर संस्थान घोटी फाटा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे मोठ्या धुमधडाक्यात व श्रद्धेने स्नेहाने तसेच प्रेमापोटी व विकासात्मक दृष्टिकोनाच्या आशे पोटी समस्त गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. लोकनेते प्रदीप नाईक यांच्याकडून  घोटी येथील रहिवाशांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत कारण विकासात्मक दृष्टिकोन हा केवळ लोकनेते प्रदीप नाईक यांच्याकडेच आहे ही जबाबदारी प्रदीप नाईक साहेबच पेलू शकतात त्यामुळे सर्वसामान्य जनता पुनश्च नाईक साहेबांनीच किनवट /माहूर विकासाचा धुरा सांभाळावा असे मनोमनी पटलावर आशा ठेवून आहे. म्हणूनच की काय आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा एक भाग म्हणून राजू सुरोशे व समस्त घोटी येथील गावकऱ्यांनी वाढदिवस साजरा केला सदर वाढदिवसाला सत्कार मूर्ती आमदार प्र