Skip to main content

सरफेसी कायदा 2002 महत्व पूर्ण माहिती. (Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 - SARFAESI Act)

 


माझ्या महाराष्ट्रातील तमाम  भांडवलदारांनो, कामगारांनो, शेतकऱ्यांनो, नोकरदार वर्ग, व्यापाऱ्यांनो तसेच माझ्या महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो आज आपण एक नवीन आणि सध्या जिव्हाळ्याचा विषय होऊन बसलेल्या सरफेसी अधिनियम ज्याला मराठी भाषेमध्येआर्थिक मालमत्तेचे तारणीकरण, पुनर्गठण व तारणांवरील हक्काची अंमलबजावणी कायदा 2002 असे संबोधल्या जाते त्या बदल आपण जाणून घेणार आहोत हा अधिनियम आपल्याला जाणून घेणे फारच महत्त्वाचे आहे


बॅंकांच्या, फायनान्शियल संस्थेच्या (फायनान्शिअल कंपनी)मोठ्या किंवा छोट्या रकमांची कर्जे थकबाकीची प्रभावीपणे व परिणामकारक वसुली करणे सुलभ व्हावे या उद्देशाने सरफेसी कायदा अमलात आला. या कायद्यामुळे सहकारी बॅंकांसह सर्वच बॅंका व *आर्थिक संस्था* (फायनान्शिअल कंपनी) यांना थकबाकी वसूल करणे सोपे झाले आहे. एकूण विचार करता सरफेसी कायदा बॅंकांसाठी आर्थिक संस्था साठी वरदानच आहे व त्याचा जास्तीत जास्त फायदा घेणे बॅंकांसाठी व आर्थिक संस्थे साठी हितावह आहे.

दिवसेंदिवस बॅंकांच्या आर्थिक संस्थेच्या थकीत रकमेत वाढ दिसून येत होती,  एनपीएच्या प्रमाणातही मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली होती. वसुलीसंदर्भात असणाऱ्या उपाययोजनादेखील उपयोगी पडताना दिसत नव्हत्या. कायद्यातील पळवाटा शोधणे व कोर्ट कामातील दिरंगाई यामुळे कर्जदाराचे चांगले फावले होते. अशा परिस्थितीत बॅंकांची परिस्थिती बिघडत असतानाच रिझर्व्ह बॅंकेने डिसेंबर १९९९ मध्ये एक समिती नेमली. या समितीने सिक्‍युरिटायझेशनचे बिल तयार केले. हे बिल भारत सरकारकडे विचार करण्यासाठी पाठविले. राष्ट्रपतींनी २१ जून २००२ रोजी मान्यता दिल्यानंतर आर्थिक मालमत्तेचे तारणीकरण, पुनर्गठण व तारणांवरील हक्काची अंमलबजावणी कायदा २००२'' (Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 - SARFAESI Act) अस्तित्वात आला. कायदा अधिक प्रभावशील राहावा या दृष्टीने २००४ मध्ये काही बदल करण्यात आले. हा कायदा देशातील सर्वच बॅंकांना लागू करण्यात आला. सहकारी बॅंकाही सरफेसी कायद्याच्या कक्षेत येत असल्याचा नुकताच निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. या कायद्यामध्ये तीन वेगवेगळ्या उप-कायद्यांचा समावेश आहे. तसेच या अधिनियमान्वये भारतातील आर्थिक क्षेत्राला एक उभारी मिळाली आहे म्हणजेच एक जीवनदान मिळालेले आहे त्याला जवळ जवळच वरदान असे आपल्याला म्हणावे लागेल.या कायद्यानुसार बॅंक अथवा कर्ज देणाऱ्या संस्थेला (फायनान्शिअल कंपनी) कोर्टाच्या कोणत्याही हुकूमनाम्याशिवाय आपल्याकडील तारण मालमत्तेवर हक्क बजाविण्याकरिता अस्तित्व निर्माण करणारा कायदा अथवा तरतूद (एन्फोर्समेंट ऑफ सिक्‍युरिटी इंटरेस्ट).  कर्ज देणाऱ्या बॅंकेला तसेच कर्ज देणाऱ्या फायनान्शिअल कंपनीला आपले कर्ज सिक्‍युरिटायझेशन कंपनीला अथवा ॲसेट रिकन्स्ट्रक्‍शन कंपनीला विकण्याचा अधिकार.  सिक्‍युरिटायझेशन व ॲसेट रिकन्स्ट्रक्‍शन कंपनी स्थापन करण्याचा तसेच अधिकार व जबाबदारी यांची निश्‍चित व्याख्या ठरविण्याची तरतूद. संबंधित उपकायदे स्वतंत्र व अनिगडित असून, त्याला कोणत्याही कायद्यान्वये स्वतंत्र कारवाई अथवा एकत्रितरीत्या कारवाई बॅंक करू शकते. सरफेसी कायदा २००२ अन्वये कारवाई करताना खालील तरतुदी लक्षात घेणे क्रमप्राप्त आहे ः  कर्जखाते हे एनपीए असणे आवश्‍यक.    कर्जदाराला व जामीनदारांना कलम क्र. 13 (2) अन्वये मागणी नोटीस देणे अनिवार्य आहे.  मागणी नोटीसमध्ये कर्जदाराला दिलेल्या प्रत्येक कर्जखात्याच्या खात्यानुसार सविस्तर तपशील येणे आवश्‍यक आहे.  कर्ज खाते एनपीए झाले आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा.  सर्व रक्कम परतफेडीसाठी ६० दिवसांची मुदत देण्यात येत आहे याची नोंद असणे आवश्‍यक. मागणी नोटीसमध्ये तारण मालमत्तेचा सविस्तर तपशील असणे अनिवार्य. दिलेल्या मुदतीत म्हणजेच ६० दिवसांत येणे बाकीची रक्कम संपूर्ण व्याजासह न फेडल्यास बॅंक सरफेसी कायद्यातील कलम १३ (४) अन्वये कारवाई करू शकते याचा उल्लेख नोटीसमध्ये असणे अभिप्रेत आहे व सदर कलमान्वये बॅंकेला असणाऱ्या अधिकारांचा थोडक्‍यात उल्लेख असणे गरजेचे आहे.  या कायद्यान्वये बॅंकेस प्राप्त विविध अधिकारांचा उल्लेखसुद्धा अनिवार्य.  तारणाचा ताबा बॅंकेने घेतल्यानंतर बॅंकेने व बॅंकेच्या वतीने तिच्या प्रतिनिधीने मालमत्ता हस्तांतर केल्यास ते तारण मालकानेच विकली आहे, असे समजण्यात येईल. कारवाईसाठी आलेला खर्च बॅंक वसूल करू शकेल. तारण मालमत्तेची विक्री केल्यानंतर हस्तांतरणापूर्वी जर कर्जदाराने कर्जाची परतफेड केल्यास सदर कर्जदारास त्याची मालमत्ता परत करणे आवश्‍यक व पुढील कार्यवाही करता येणार नाही. तारण मालमत्तेच्या विक्रीतून जर कर्जाची परतफेड न झाल्यास बॅंक डीआरटी (Debts Recovery Tribunal) कडे कर्जदाराविरुद्ध उर्वरित रकमेसाठी दावा दाखल करू शकेल. सहकारी बॅंका उर्वरित रकमेच्या वसुलीसाठी सहकार न्यायालयात महाराष्ट्र राज्य सहकार कायद्यातील 6 कलम 91 अंतर्गत वा उपनिबंधकाकडे कलम 101 अंतर्गत दावा दाखल करू शकतात.  या कायद्यातील तरतुदीनुसार बॅंकेला एक अथवा अधिक अधिकृत अधिकाऱ्यांची नेमणूक करणे क्रमप्राप्त. सहकारी बॅंकेला अशा अधिकृत अधिकाऱ्याची नेमणूक करताना संचालक मंडळाचा ठराव पास करून घ्यावा लागेल व सदर नेमणूक केलेल्या अधिकारी/अधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करावे लागतील. एकदा सदर कायद्यानुसार 13 (2) ची नोटीस दिल्यानंतर कर्जदाराला तारण मालमत्ता हस्तांतर करता येणार नाही. तारण मालमत्तेचा ताबा घेताना शांततेने ताबा न मिळाल्यास बॅंकेला ताबा घेण्यासाठी जिल्हा मॅजिस्ट्रेट वा मेट्रोपोलिटन मॅजिस्ट्रेट यांच्याकडे लेखी विनंती करू शकते. बॅंकेने नेमलेल्या प्राधिकृत अधिकाऱ्याच्या कारवाईविरुद्ध कर्जदाराला दाद मागावयाची असल्यास मालमत्तेचा ताबा घेतल्यानंतर 45 दिवसांत डीआरटी यांच्याकडे अर्ज दाखल करावा लागतो. जर डीआरटी अथवा ॲपिलेट डीआरटी यांनी बॅंकेच्या विरोधात म्हणजेच तारणाचा ताबा अवैधरीत्या वा बेकायदा घेतला आहे असा निर्णय दिल्यास बॅंकेला कर्जदारास मालमत्तेचा ताबा पुन्हा द्यावा लागतो. 


कर्जदाराला नोटीस कशी पाठवाल?   अर्जदार जेथे राहतो अथवा जिथे व्यवसाय आहे त्या ठिकाणी रजिस्टर पोस्टाने पोचसहीत कुरिअर, फॅक्‍स, ई-मेलनेसुद्धा पाठविता येते. जर कर्जदाराने नोटीस स्वीकारली नाही तर घराच्या दर्शनी भागावर तारण मालमत्ता असल्यास तिच्या दर्शनी भागावर चिकटविण्यात येते. दोन स्थानिक वृत्तपत्रांत (त्यातील एक स्थानिक भाषेत असावे) ही नोटीस छापून प्रसिद्ध करता येईल.  तारण जप्त मालमत्ता विक्रीसंदर्भातील नियम ः  कर्जदाराची तारण मालमत्ता जप्त करताना पंचनामा करणे आवश्‍यक. जंगम मालमत्तेचा ताबा घेतल्यानंतर सदर मालमत्तेची यादी दोन प्रतींमध्ये तयार करावी लागते. त्यातील एक प्रत कर्जदाराला वा तेथे उपस्थित कर्जदाराच्या नातेवाईक अथवा प्रतिनिधीला द्यावी. जप्त मालमत्तेची योग्य ती काळजी घेणे बॅंकेला अथवा तिच्या प्रतिनिधीला आवश्‍यक. जप्त मालमत्ता नाशवंत असल्यास बॅंक तिची त्वरित विक्री करू शकेल.  बॅंकेने तारण मालमत्ता विक्री होईपर्यंत तिचे संरक्षण, काळजी व निगा राखणे बंधनकारक. कर्जदाराची येणीसुद्धा जप्त करण्याचा बॅंकेला अधिकार.  जंगम/स्थावर मालमत्तेची विक्री करण्यापूर्वी त्याची अंदाजित किंमत ठरविणे बंधनकारक व विक्री करण्यापूर्वी कमीत कमी अपेक्षित किंमत निश्‍चित करावी लागते.  जप्त केलेल्या तारणी जंगम मालमत्तेची विक्री कोटेशन घेऊन, टेंडर स्वीकारून, जाहीर लिलाव करून, खासगी विक्री करून करता येते. जप्त मालाची विक्री करण्यापूर्वी 30 दिवसांची आगाऊ नोटीस देणे बंधनकारक, तसेच टेंडर मागविताना वा जाहीर लिलाव करताना दोन स्थानिक वृत्तपत्रांत (त्यातील एक वृत्तपत्र स्थानिक भाषेत आवश्‍यक) प्रसिद्ध करणे आवश्‍यक. एकूण विचार करता सरफेसी कायदा बॅंकांसाठी वरदानच आहे व त्याचा जास्तीत जास्त फायदा घेणे बॅंकांसाठी हितावह आहे. जेणेकरून तारण गहाण थकीत कर्ज खात्यांची वसुली करून बॅंकेची स्थिती अधिक बलवान होईल व एनपीएचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. सदर अधिनियम हा आपल्या देशातील आर्थिक क्षेत्राला उभारी देण्यासाठी निर्माण झालेला आहे म्हणजे तो सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठीच निर्माण झालेला आहे सदर अधिनियमाची ज्यावेळेस तंतोतंत अंमलबजावणी होईल त्यावेळेस भारतात अर्थव्यवस्था ही जागतिक महासत्तेकडे वळल्या जाईल म्हणजेच सर्वसामान्यांचा उत्पनाचे स्त्रोत्र वाढल्या जाईल म्हणजेच सर्वसामान्य हा कुणीही आर्थिक बाबींमध्ये हा मागास अथवा गरीब राहणार नाही तसेच हा  संपूर्ण लेख  तमाम वाचकाला समजेल अशा सोप्या भाषेमध्ये लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे ज्यावेळेस हा लेख संपूर्णपणे वाचकाला समजेल व त्याची अंमलबजावणी करणारे वाचक हे स्त्रोत्र होतील त्यावेळेस या लेखाचा पवित्र उद्देश साध्य होईल हे मात्र खरे आहे..


:- विलास संभाजी सूर्यवंशी किनवट ता. किनवट जि. नांदेड

मो.9922910080

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला