गोकुंदा ग्रा.प्रतिनिधी:-
विद्यार्थ्यांना मानसीक व शारिरीक सर्वांगाने ते समृध्द व्हावे व त्यांचे स्वतःचे संरक्षण करता यावे त्यांना शिस्त लागावी त्यांची चंचलवृत्ती , स्मरणशक्ती वाढावी व सुप्त गुणांना वाव मिळावा या हेतूने किनवट तालुक्यातील गोकुंदा येथे इंडियन ड्रॅगन कुंग- फु मार्शल आर्ट अकॅडमी नांदेड यांच्या वतीने शांती निकेतन परीसर गोकुंदा येथे ११ नोव्हेंबर ते२५ नोव्हेंबर पर्यंत १५ दिवसीय मोफत कराटे प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन या सुवर्ण संधीचा लाभ शालेय विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन इंडियन ड्रॅगन कुंग- फु मार्शल आर्ट अकॅडमीचे मुख्य प्रशिक्षक भिमराव सर( ब्लॅक बेल्ट), सहायक प्रशिक्षक हुकुम ठाकुर सर, व राईज अकॅडमीचे लक्ष्मीकांत कापसे सर यांनी केले आहे
Comments
Post a Comment