Skip to main content

मांडवी येथे शनिवारी शासकिय सेवा व योजनांचा महा मेळावा:सकाळी ९ वाजता उद्घाटन सोहळा

 

 


किनवटदि.१२ : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त  जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने मांडवी (ता. किनवट) येथे शनिवारी(दि.१३) सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत "शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा",आयोजित करण्यात आला आहे.

    सकाळी ९ वाजता उद्घाटन सोहळा होईल.अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीकांत ल.आणेकर हे राहतील.प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर(घुगे),जिल्हा पोलिस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे व सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती किरण एच.पुजार हे उपस्थितीत राहतील.

   या महामेळाव्याची जय्यत तयारी तालुका प्रशासनाने केलेली आहे.शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्व सामान्यांपर्यंत पोहचावी व त्यांचा लाभ जनतेला मिळावा, त्यांच्यात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने या महा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

  या महामेळाव्यात शासनाच्या विविध कार्यालयांचे ७५ स्टाल राहणार आहेत.या स्टालवर त्या त्या कार्यालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध शासकीय सेवा व  योजनांचा लाभ मिळवून देण्याच्या अनुषंगाने जनतेकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येणार आहे व पूर्तता करणाऱ्या नागरिकांना त्वरीत लाभही देण्यात येणार आहे. या स्टाल मध्ये किनवट तालुका ग्राहक पंचायतीचा ५८ क्रमांकाचा स्टाल राहणार आहे.तेथे ग्राहकांना त्यांच्या तक्रारी विषयी मार्गदर्शन व सल्ला देण्यात येणार आहे.

   या महामेळाव्यास उपस्थित राहून सर्व योजनांच्या माहीतीचा लाभ घ्यावा,असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव राजेंद्र शां.रोटे यांच्यासह तालुका प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ.मृणाल जाधव व तालुका विधी सेवा समितीचे सचिव तथा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुभाष धनवे यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...