Skip to main content

गंधकुटीत कार्तिक पौर्णिमेनिमित्त प्रबोधनात्मक 'काव्यपौर्णिमा' रंगली. प्रत्येक पौर्णिमा काव्यपौर्णिमा : क्रांतीसूर्य प्रतिष्ठान उपक्रम !

 



किनवट ( प्रतिनिधी ) :

गंधकुटी बुद्धविहार सिद्धार्थनगर गोकुंदा येथे कार्तिक पौर्णिमेनिमित्त क्रांतीसूर्य प्रतिष्ठानच्या वतीने 'काव्यपौर्णिमा' घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक तथा साहित्यिक रमेश मुनेश्वर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून साहित्यिक प्रा. गजानन सोनोने, सांगावाकार महेंद्र नरवाडे, कवी रुपेश मुनेश्वर, गायक सुरेश पाटील, कवी प्रकाश सोनवणे उपस्थित होते. उपस्थितांच्या बहारदार काव्य प्रबोधनाने  कवी संमेलनात रंगत आणली.




प्रारंभी वामनदादा कर्डक संगीत अकादमीचे संचालक  सुरेश पाटील यांनी वंदनगीत गाऊन कार्यक्रमास सुरवात केली. त्यानंतर राणीसाकार प्रा.गजानन सोनवणे यांनी.. 

" गातो मी गाणे निळ्या नभाचे

 आहे तराने नव्या दमाचे ... "

ही रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळविली.


सांगावाकार महेंद्र नरवाडे यांनी -

 " घटनेच्या पानातून प्रतिष्ठा ही मिळतांना

रुढीवादी ग्रंथ मग चाळता कशाला "

ही रचना सादर करून संविधान जागृती केली.



कवी रुपेश मुनेश्वर यांनी - 

" इतिहासाचे पान पहा जगी ठरलया महान ,

माझ्या भिमरायाचं देनं भारताच संविधान"

 

संविधानचा गौरव करणारी रचना सादर करून दाद मिळविली.


बौध्दाचार्य अनिल उमरे यांनी -

" अंधारलेली वाट माझी मी प्रकाशित होताना पाहिले 

तू लाविलास दिवा क्रांतिबा ! क्रांतीची मशाल होतांना पाहिली "

ज्योतिरावाच्या कार्याची सुंदर रचना सादर करून उपस्थितांच्या टाळ्या मिळविल्या.



कवी प्रकाश सोनवणे यांनी -

" भिमाच्या जन्माने  जीवनाचे सोने झाले ,

भाग्य उजळले आता संपला अंधार "

ही सुंदर रचना  सादर केली.



सुनिता उमरे या कवयित्रीने 'आरक्षण ' नावाची रचना सादर केली तर कवयित्री सत्यभामा भगत (महामुने) ह्याने 'सावित्री ' या नावाची रचना सादर करून टाळ्या मिळविल्या. निवृत्ती नगराळे आणि भगवान घुले यांनी गीते सादर केली.



काव्य पौर्णिमेचा अध्यक्षीय समारोप करताना कवी रमेश मुनेश्वर यांनी -

"पोर्णिमेसम सुंदर असावे आयुष्य 

पौर्णिमेसम तेजोमय व्हावे आयुष्य "

 असा आयुष्यातील आशावाद निर्माण करणारी रचना सादर केली.

बौद्धाचार्य अनिल उमरे यांनी कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन करून उपस्थितांचे आभार मानले.


या कार्यक्रमास रंजीत वाठोरे, अनिल कानिंदे, सुधीर पाटील, दिनेश खिल्लारे, छत्रपती रिंगणमोडे, राहुल घुले, जनार्दन भगत, सुमेध वाघमारे, सुखदेव कांबळे, प्रशांत शेरे, अनमोल गायकवाड, सुखदेव खिल्लारे, भोसले सर, रवी भालेराव, बालाजी वाढवे यांच्यासह महिला मंडळाच्या अध्यक्षा गोदावरी रिंगनमोडे, केवळाबाई कानिंदे, अरूणाबाई धोटे, रुक्‍मीना गिमेकार, शिल्पा खिल्लारे, इंदूताई कानिंदे, विजयमाला कावळे, निर्मला घुले, छाया खिलारे आदी काव्य रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...