त्रिपुरा राज्यात झालेल्या मस्जीद मदरसा जळीत हल्ला प्रकरणी मुस्लीम समुदायाचा उपविभागीय कार्यालयावर मोर्चा
किनवट ता. प्रतिनिधी:
त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजाचे धार्मिक श्रद्धास्थान असलेल्या मस्जीद व मदरशांवर योजनाबद्ध पद्धतीने हल्ले झाले या विरोधात त्रीपुरा सरकारने च्या विरोधात आज १२ नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजता नमाज पठण करून किनवट येथे जामा मस्जीद ते उपविभागिय अधिकारी कार्यालय पर्यंत रॅली चे आयोजन करण्यात आले होते या रॅलीत मुस्लिम मौलवी , सामाजीक संघटना , टिपु सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सय्यद नदीम, तालुका अध्यक्ष शेख शाकीर व राजकीय पक्ष, कम्युनीष्ट पार्टी ऑफ इंडिया चे अर्जुन आडे, गब्बर काजी,वंचीत ब. स. आ. एम आय एम, रॉ. कॉ. , एस अहमद अली, साजीद आदी विविध पक्षांचे नेते पदाधिकारी सहभागी झाले होते त्यांनी उपविभागिय अधिकारी यांना निवेदन दिले व त्रीपुरा प्रकरणी कठोरत कठोर कारवाई करण्याची विनंती केली .
Comments
Post a Comment