किनवट:
किनवट तालुक्यातील घोटी या गावी
सेवार्थ फाऊंडेशन तर्फे आज सम्राट अशोक महिला बचत गटास लघु उद्योग प्रशिक्षण देण्यात आले. सेवार्थ फाऊंडेशन तर्फे विविध क्षेत्रात काम करत असून सेवार्थ फाऊंडेशन हे महिला व बालविकास यासाठी पण काम करत असून याचाच एक भाग म्हणजे महिला सक्षमीकरण करण्यासाठी आज सेवार्थ फाउंडेशने सम्राट अशोक महिला बचत गटास आज लघु उद्योग प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी सम्राट अशोक महिला बचत गटाच्या अध्यक्ष इंदुबाई लढे तसेच सचिव पंचफुलाबाई कानिंदे तसेच सयाबाई पाटील, निर्मलाबाई कावळे, शिल्पा पाटील, सुमनबाई कयापाक, जनाबाई पाटील, पुष्पाबाई पाटील, सीमा भवरे, धम्मदीक्षा पाटील सर्व सभासद उपस्थित होते तसेच सेवार्थ फाऊंडेशन तर्फे ऋषिकेश लढे तसेच त्यांचे सहकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment