प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्रचे संस्थापक डी. टी. आंबेगावे यांचा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालय, संथागार वृद्धाश्रमात फळ व बिस्कीटे वाटुन साजरा
✍🏻राजेश पाटील
( ता. प्र. किनवट )
शासन मान्य प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक, अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांचा वाढदिवस उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना व संथागार वृध्दाश्रमात वृध्दांनाफळ व बिस्कीटे वाटप करून साजरा करण्यात आला तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून पदाधिकारी सदस्यांना नियुक्ती पत्र ओळखपत्र देण्यात आले यावेळी रुग्णालयात परीचारीका, व डॉक्टर यांनी सहकार्य केले तसेच संथागार वृद्धाश्रमात संचालक तथा माजी नगराध्यक्ष अरुण आळणे , माजी न. प. सेवीका करूणाताई आळणे , अधिक्षीका आकांक्षा आळणे, संघटनेचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला या वेळी आशिष शेळके, नसीर तगाले ,सय्यद नदीम,राजेश पाटील ,शेख अतीफ, शेख राजीक शे. शब्बीर,प्रणय कोवे , विशाल गिमेकर,गंगाधर कदम,राज माहुरकर ,रमेश परचाके , बापुराव वावळे, लखन जाधव आदी पत्रकार मंडळी उपस्थित होती या वेळी सर्व पदाधिकारी सदस्यांनी मा. डी . टी.आंबेगावे यांना फोन करून व समाज माध्यमाद्वारे शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment