Skip to main content

लोकनेते माजी आमदार नाईक साहेब यांचा वाढदिवस राजू सुरोशे यांच्या नेतृत्वात साजरा

 



किनवट ( तालुका प्रतिनिधी)

किनवट/ माहूर तालुक्याचे लोकनेते माजी आमदार प्रदीप नाईक यांचा वाढदिवस किनवट/ माहूर व तमाम महाराष्ट्रामध्ये साजरा करण्यात आला त्यामध्ये किनवट शहरा जवळच असलेल्या घोटी येथे राजू सुरोशे पाटील यांच्या नेतृत्वाने समस्त गावकऱ्यांच्या  पुढाकाराने लोकनेते माननीय प्रदीप जी नाईक साहेब यांचा वाढदिवस फुलाजी बाबा सिद्धेश्वर संस्थान घोटी फाटा तालुका किनवट जिल्हा नांदेड येथे मोठ्या धुमधडाक्यात व श्रद्धेने स्नेहाने तसेच प्रेमापोटी व विकासात्मक दृष्टिकोनाच्या आशे पोटी समस्त गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने साजरा केला. लोकनेते प्रदीप नाईक यांच्याकडून  घोटी येथील रहिवाशांच्या फार मोठ्या अपेक्षा आहेत कारण विकासात्मक दृष्टिकोन हा केवळ लोकनेते प्रदीप नाईक यांच्याकडेच आहे ही जबाबदारी प्रदीप नाईक साहेबच पेलू शकतात त्यामुळे सर्वसामान्य जनता पुनश्च नाईक साहेबांनीच किनवट /माहूर विकासाचा धुरा सांभाळावा असे मनोमनी पटलावर आशा ठेवून आहे. म्हणूनच की काय आगामी जिल्हा परिषद निवडणुकीचा एक भाग म्हणून राजू सुरोशे व समस्त घोटी येथील गावकऱ्यांनी वाढदिवस साजरा केला सदर वाढदिवसाला



सत्कार मूर्ती आमदार प्रदीप नाईक, अनिल पाटील कराळे, प्रविण म्याकलवार, करपुडे पाटील, आनंदराव सुरोशे, जगदीश गरड पाटील, हिरामण पाटील, प्रकाश गरड पाटील, गौतम पाटील, पदमाकर भवरे, राम गरड पाटील, पुरुषोत्तम शेंडे, अशोक सुरोशे, संतोष मिराशे, संजय गरड, गणेश सुरोशे, गणपत पवार, गजानन महादुरे, देवरता मुनेश्वर, विनायक गरड, साहेबराव गरड, हमित शेख, अहमद शेख, बालाजी , रामदास वाढ इ, किसना गरड, बालाजी जकणेवार, अनिल कदम, राजूलिंगू पिल्लेवार, अशा अनेक लोकांची उपस्थिती होती तसेच गावातील सर्व तरुण युवकांचा सहभाग होता.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...