Skip to main content

Posts

Showing posts from December, 2021

किनवट तालुका क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या- संभाजी ब्रिगेडची मागणी

  (किनवट प्रतिनिधी) किनवट: किनवट तालुका क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराजांचे नाव द्या अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण महाराष्ट्राची अस्मिता असून कधीही पराजित न झालेले लढवय्ये राजे होत.युवकांना सदैव प्रेरणा देणारे महापुरुष आहेत. अशा महापुरुषाचे नाव तालुका क्रीडा संकुलास देणे योग्य होईल.म्हणून किनवट शहरातील क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल असे नामकरण करावे.असे केल्यास युवकांसह सर्वांसाठी प्रेरणादायी व अभिमानास्पद बाब ठरणार आहे.तेव्हा संभाजी ब्रिगेड किनवट व जनमानसांच्या मागणीचा विचार करता किनवट तालुका क्रीडा संकुलास छत्रपती संभाजी महाराज हे नाव घ्यावे. अशा मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट यांना देण्यात आले. सदरील निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी पाटील सिरसाट तालुकाध्यक्ष सचिन पाटील कदम तालुका प्रसिद्धी प्रमुख आकाश पाटील इंगोले तालुका उपाध्यक्ष सुमित पाटील माने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मी ...तू... आणि शेकोटी... प्रसिद्ध लेखीका रुचिरा बेटकर यांचा वाचनीय लेख

सध्या थंडीने चांगलीच हुडहुडी भरवलीय...अशा थंडगार वातावरणात एकदा तरी शेकोटीची उब घेण्याचा अनुभव काही निराळाच ...हातावर हात चोळत शेकोटी च्या भोवती बसून गप्पांची एक मैफल रंगवून जाते...अंगावर येणार्या थंडगार वार्यांना परतून लावण्यासाठी पेटवली जाणारी शेकोटी म्हणजे..एक न्यारीच उब... आसमंतात अदृष्य गारव्याचा काहूरा कोंडलेला राहतोय आणि त्यामुळे दिवसाढवळ्या अंधार वाटु लागतोय.  गारेगार थंडीत गरमागरम पदार्थांवर ताव मारून शेकोटीभोवती रंगलेली गप्पांची मैफल, कानावर पडली... आणि मी कसलाही विचार न करता तिथे पोहचले...ईथे हॉररपासून म्युझिकपर्यंतच्या सगळ्या गोष्टी या अन्फरगॉटेबल ठरत होत्या. कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटल्यावर मनाचे सगळे कप्पे एक एक करून खुलत होते. गप्पां करत आठवणींचे  दारे उघडत होते फुल्ल नाइट गप्पांचा फड रंगणार होता. त्यात कोणताही विषय वर्ज्य नसणार होतो.अश्यात हातामध्ये गरमागरम वाफाळत्या कॉफी चे झुरके मारत केलेल्या गप्पा, गोष्टी त...मला तुझी आठवण येणं हे नक्कीच होतं...आता ही शेकोटी ची, धग हवीहवीशी वाटतं होती. एकूण काय तर आकाशात उडणाऱ्या शिकोटीच्या चिटोर्या सह स्वप्नरंजनाचे  आकर्षण होऊ लाग

शास्त्री महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा

  धर्माबाद प्रतिनिधी: येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जहिरूद्दीन पठाण यांनी अल्पसंख्यांकांचे हक्क आणि अधिकार या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.  सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. संभाजी मनूरकर यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अल्पसंख्यांकांचे हक्क व अधिकार या विषयी संवैधानिक तरतुदी सांगून त्यांचे हक्क,अधिकार,संस्कृती, भाषा, व वंशाचे संरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणा-या योजना व उपक्रमांची माहिती दिली.अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डाॅ. श्रीराम गव्हाणे यांनी महामानवांचे विचार व संवैधानिक कायदे व तरतुदी विषयी विद्यार्थ्यांनी  जागृत राहावे, असे मत व्यक्त केले.        या कार्यक्रमास  महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.राम शेवलीकर यांनी

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने PI श्री तायडे यांना निरोप तर PI श्री काइंगडे यांचे स्वागत

पाली,रायगड प्रतिनिधि :  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने सुधागड पालीचे पोलीस निरीक्षक श्री तायडे यांना निरोप देण्यात आला तर नवीन रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काइंगडे यांचे स्वागत यांचे स्वागत करण्यात आले.  दिनांक २३ डिसेंबर,२०२१ रोजी सुधागड पाली तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री तायडे यांचा निरोप समारंभ तथा नवनार्चित पोलीस निरीक्षक श्री विश्वजित काइंगडे यांच स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख दत्तात्रेय दळवी, सुधागड पालीचे तहसीलदार श्री रायन्नावर तसेच तालुक्यातील विविध क्षेत्रातील राजकीय नेते व पत्रकार उपस्थित होते याप्रसंगी पोलीस ठाणे पाली यांनी प्रेस संपादक पत्रकार संघाचे सुधागड तालुका अध्यक्ष राजू शेख यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. प्रेस संपादक व पत्रकार संघ महाराष्ट्र सुधागड तालुका अध्यक्ष म्हणून राजू शेख यांनी त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन या समारंभ मध्ये उपस्थित राहून श्री तायडे यांना निरोप देऊन नवनार्चित पोलीस निरीक्षक श्री काइंगडे यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी संघाचे रायगड जिल्

बळीराम पाटील महाविद्यालयाचे खो-खो स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक

किनवट श. प्रतिनिधी:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,शंकर नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन 'क'झोन मुलींची खो-खो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये बळीराम पाटील महाविद्यालयातील मुलींनी सुवर्णपदक मिळविले. या यशाबद्दल किनवट शिक्षण संस्था, किनवट चे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम , गंगारेडी बैनमवार ,सचिव शंकरराव चाडावार, कोषाध्यक्ष जशवंत सिंग सोखी,प्राचार्य डॉ.शिवराज बेंबरेकर, संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेमानीवार,उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे आदींनी  सर्व विद्यार्थांचे अभिनंदन केले.संघ प्रमुख म्हणून डॉ. स्वाती कुरमे, डॉ. रचना हिपळगावकर यांनी काम पाहिले.

"सखे थोडस समाधानाने जगुया विखुरलेल्या या समाजाकडे डोळसपणे बघुया" ...मार्गशिष पौर्णिमेच्या संध्येला काव्य मैफिल बहरली क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचा उपक्रम

  ता. प्र. किनवट : ता.१९ प्रत्येक पौणिमा काव्य पौर्णिमा उपक्रम अंतर्गत क्रांतिसुर्य प्रतिष्ठान आयोजित  कवि संमेलन श्रावस्ती बुध्द विहार गोकुंदा येथे पार पडले या कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सवित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्रा. शुभांगी ठमके ह्या होत्या कार्यक्रमाच्या सुरवातीस आदर्शाची पुजा करण्यात आली .  या कवि संमेलनास एकाहुन एक सरस कविता सादर करून कविंनी रसिकांची मने जिंकली. सुरवातीला  कवि सुभाष गडलिंग यांनी  - आंधळ्या परंपरेचे पिक या देशात काढले जात होते माणसाचे अवमुल्यंन शासन प्रमाण असुन तु विवेकाने पुकारले बंड  हि विद्रोही रचना सादर केली. कवयत्री वंदना तामगाडगे यांनी केले - भीमा तुझ्या शब्दांना भीमा तुझ्या शब्दांना हि वैचारिक मंथन घडवुन आणनारी कविता सादर केली. कवि (सांगावाकार)महेंद्र नरवाडे यांनी -हे शांती दुता तुझ्या ज्ञानाचा  कणातला कण मनातला पुढे रे हाक चारीत्र्याची खान तु नितीचे भांडार तु हि काव्य रचना सादर केली व प्रेक्षकांची वाहवा मिळवली. कवयत्री नंदाताई नगारे यांनी - उद्घाटक ठरली तु नारी जातीची माय माऊली सावित्रीमाई फुले अनंत संकटांना तोंड दिले तु ना डगमगले तुझे पा

श्रीनिवास आरपलीवार या युवकाचे अपघातात निधन किनवट मध्ये या दुःखद घटनेने हळहळ व्यक्त होत आहे

तालुका प्रतिनिधी किनवट:- किनवट येथील महात्मा फुले चौकात श्रीनिवास उर्फ शिनु या युवकाचे विनायका नावाचे मोबाईल गॅलिरीचे दुकान असुन तो मार्कण्डेय नगरचा रहीवाशी आहे तो आपल्या सासुरवाडी कडुन येतांना त्याचा अदीलाबाद रोडवरील महामार्गावर चारचाकी वाहनाने धडकेने अपघाती मृत्यू झाला इतक्या कमी वयात अपघाती मृत्युने सर्व किनवट परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे त्याच्या मृत्यू पश्चाच पत्नी मुले आई भाऊ बहिणी जावई असा मोठा परिवार आहे त्याच्या अचानक जाण्याने मित्र परीवारात समाजात व तालुक्यात शोककळा पसरली आहे

सामाजिक उपक्रमांनी खासदार हेमंत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा ; कार्डियाक रुग्णवाहिकेची केले लोकार्पण

  हिंगोली /नांदेड : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांचा वाढदिवस नांदेड,हिंगोली  आणि यवतमाळ जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.हिंगोली ,नांदेड , वसमत , किनवट,उमरखेड,कुरुंदा,औंढा नागनाथ   येथे  रक्तदान शिबिर ,रुग्णाना फळे वाटप,नेत्र तपासणी ,महाआरोग्य शिबीर , शालेय साहित्य वाटप,  कीर्तन सोहळा ,ब्लँकेट वाटप , महिलांना साडीचे वाटप स्पर्धा परीक्षेचे आयोजन , महाभिषेक, अन्नदान अश्या विविध उपक्रमाचे आयोजन   शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करून सामाजिक बांधिलकी जपली.तर खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्याची रुग्णसेवेची गरज लक्षात घेता  स्वतःच्या खासदार निधीतून रुग्णसेवेसाठी कार्डियाक रुग्णवाहिका हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाला लोकार्पित केली  तसेच हिंगोली येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन यावेळी  करण्यात आले                  खासदार हेमंत पाटील यांचा  वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो  यावर्षी पारंपरिक सत्काराला बगल देत खासदार हेमंत पाटील यांनीच  हार तुरे, फटाके, बॅनर होर्डिंग यावर होणारा अनाठ

शेतकऱ्यांची विज तोडून त्रास दिल्यास अधिका-यांना घेराव घालू ; किसान सभेचे अर्जुन आडे यांचा इशारा

  *किनवट*, दि. १६  : नैसर्गिक आपत्तीच्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे ऐन रब्बी हंगामात  विज कनेक्शन तोडू नये अन्यथा विज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिका-यांना घेराव घालू, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे  यांंनी सर्व संबंधितांना एका निवेदनाद्वारे नुकताच  दिला आहे. अगोदरच अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकाला लागणारी विज खंडीत करून त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम हे सरकार करत आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा ज्वारी गहू शेंगा या पिकांना पाणी देण्याचा मौसम असताना थकित विज बिलाच्या वसूली पोटी विज वितरण कडून शेतीपंपाचे कोणतीही पूर्व सूचना न देता गावागावातील विज कनेक्शन तोडून ट्रान्सफार्मर बंद केले जात आहेत,यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून रब्बी हंगामातील पीके वाळून जात आहेत. एकीकडे गावातील शेती पंपाच्या थकीत   विज बिलापैकी ६७% विजबिल माफ केल्याची घोषणा राज्य सरकारकडून केली असली तरी त्याची अमलबजावणी होत नाही. त्यातच उर्वरीत ३३ % विजबिल  भरणा करावा, असे परीपत्रक असताना सक्तीची वसूली करत असून नाही भरणा-या शे

शासनाच्या विरोधात ग्रंथालय कर्मचारी आंदोलन छेडण्याच्या तयारीत

  किनवट,दि.१५  : राज्यातील १२ हजार १६७ सार्वजनिक ग्रंथालये आणि त्यात काम करणारे तब्बल २४ हजार कर्मचार्‍यांची  इ.स. १९६७ च्या ग्रंथालय कायद्याने पुरती वाट लावली आहे. त्यात बदल करण्याची गरज आहे. राज्य शासनाकडून मिळणार्‍या अनुदानावरच या सार्वजनिक ग्रंथालयांचा कारभार सुरू असून त्या ग्रंथालयांचे प्रश्न ५४ वर्षापासून प्रलंबितच आहेत.ते त्वरीत सोडवावेत,अशी मागणी किनवट-माहूर तालुका ग्रंथालय संघाचे कार्याध्यक्ष उध्वराव रामतिर्थकर व सचिव प्रा. दगडू भरकड यांनि एका निवेदनाद्वारे सर्व संबंधिताकडे नुकतीच केली आहे.   निवेदनात म्हटले आहे की,       वाचन संस्कृतीचे जतन आणि संवर्धन करण्याचे काम राज्यातील सार्वजनिक ग्रंथालये करीत आहेत. त्यांना आणखी उभारी देण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालये सक्षम करणे अत्यंत गरजेचे आहे. सार्वजनिक ग्रंथालयांसाठी इ.स. १९६७ मध्ये केलेल्या कायद्यात आजतागायत बदल किंवा सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. महाराष्ट्रात सुमारे १२ हजार सार्वजनिक ग्रंथालये असून, त्यात २४ हजार कर्मचारी काम करीत आहेत. ग्रंथालयांना शिक्षण विभागाकडून निधी मिळतो. त्यांच्यासाठी वेगळे अंदाजपत्रक नाही. सार्वजनिक ग्रंथा

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघास 'समाजरत्न' पुरस्कार जाहीर

लातूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महाराष्ट्र राज्य या संघाचे महाराष्ट्रातील पत्रकार, त्यांचे कुटुंब व  सामान्य जनतेसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन सप्तफेरे वधू वर सूचक केंद्र या संस्थेने हा पुरस्कार जाहीर केला आहे. सदर संस्थेचे संस्थापक व कालपरिवर्तन या वृत्तपत्राचे संपादक श्री संजय राजुळे व त्यांच्या टीमने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांची भेट घेऊन निमंत्रण पत्र दिले आहे. सप्तफेरे वधू-वर सूचक आयोजित सप्तफेरे गुणगौरव पुरस्कार सोहळा २०२१ साठी निवड समितीने प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन समाजरत्न पुरस्कारासाठी निवड केली आहे. सदर पुरस्कार सोहळा दि. ३० डिसेंबर,२०२१ रोजी अष्टविनायक मंदिर हॉल, नारायण नगर, लातूर येथे सायंकाळी ६.०० वाजता दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सर्व पदाधिकार्‍यांनी उपस्थित राहून हा बहुमान स्विकारावा असे सप्तफेरे वधू-वर सूचक केंद्राचे संस्थापक श्री संजय राजुळे यांनी आवाहन केले आहे. प्रेस संपादक व पत्रकार सेवा

प्रेस संपादक व पत्रकार सेवासंघ किनवट संघटने तर्फे संपादक नसीर तगाले यांचा सत्कार

  किनवट/प्रतिनिधी: आज कि न्यूजचे संपादक नसीर तगाले यांना बालीवूड लिजेड आवर्ड २०२१ने सन्मानित करण्यात आले   बॉलीवुड फिल्म निदर्शक डॉक्टर कृष्णा चव्हाण यांनी जुहू मुंबई येथील मेयर हॉलमध्ये १२ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या शानदार अवार्ड २०२१ च्या कार्यक्रमात किनवट येथील किनवट आज की न्यूजचे संपादक नसिर तगाले  यांना बॉलिवूड लीजेंड अवार्ड २०२१ ने लगातार तिसऱ्या वर्षीही सन्मानित केले आहे.     त्यामुळे नासिर तगाले यांच्यावर चहात्या कडून शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.    या कार्यक्रमात संगीतकार अनु मलिक, आमदार भारती लव्हेकर, दीपा नारायण झा, एहसान कुरैशी, रज़ा मुराद, अरुण बख्शी, ऋतु पाठक अशा अनेक दिग्गजांना सन्मानित करण्यात आले. सदरील सदरील सन्मान मिळाल्याबद्दल या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर कृष्णा चव्हाण यांचे नसीर तगाले. यांनी आभार मानले     त्यांना मिळालेल्या पुरस्कारा बद्दल प्रे. स. प. से. स. महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड, जिल्हा संघटक आनंद पाटील यांनी फोन वरून शुभेच्छा दिल्या  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघातर्फे आज कि न्यूज

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा 'राष्ट्रीय जीवन गौरव' पुरस्काराने सन्मान

   नागपूर : 'जागतिक मानवाधिकार दिनी' प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्लीच्या वतीने नागपूर येथे जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या वतीने१० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन साई सभागृह व्होकार्ट हॉस्पिटल नागपूर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य अतिथी मा. न्यायाधिस अभिजित देशमुख, मा. संजय पांडे (वरिष्ठ पोलीस अधीक्षक), डॉ. मिलिंद दहिवले (राष्ट्रीय अध्यक्ष), डॉ. कुमेश्वर भगत (राष्ट्रीय उपाध्यक्ष), डॉ. दिपक कदम (फिल्म निर्माते),  डॉ. प्रकाश भागवत (सिने अभिनेता), मा. अश्विनी चंद्रिकापुरे (सिने अभिनेत्री), ब्रह्मकुमारी मनिषादिदी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना 'राष्ट्रीय जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने,भंडारा जिल्हा कोष्याध्

आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना बालीवूड लिजेंड आवर्ड २०२१ ने सन्मानित

  किनवट/प्रतिनिधी: आज कि न्यूज चे संपादक नसीर तगाले यांना बालीवूड लिजेंड आवर्ड २०२१ने सन्मानित करण्यात आले   बॉलीवुड फिल्म निदर्शक डॉक्टर कृष्णा चव्हाण यांनी जुहू मुंबई येथील मेयर हॉलमध्ये १२ रोजी आयोजित केलेल्या शानदार अवार्ड २०२१ च्या कार्यक्रमात किनवट येथील किनवट आज की न्यूज चे संपादक नासिर तगाले  यांना बॉलिवूड लीजेंड अवार्ड २०२१ ने लगातार तिसऱ्या वर्षीही सन्मानित केले आहे.     त्यामुळे नासिर तगाले यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट शाखेच्या वतीने जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव, ता. अध्यक्ष आशिष शेळके, सय्यद नदीम, राजेश पाटील, शेख अतीफ, गौतम कांबळे, राज माहुरकर, विशाल गिमेकर, गंगाधर कदम, इंद्रपाल कांबळे, प्रणय कोवे, अरविंद सुर्यवंशी, प्रज्वल कारले, मारोती देवकते,रमेश परचाके, शे. सईद, विकास वाघमारे, गणेश यमजलवाड, विनोद कांबळे आदी संघटनेच्य सदस्य पदाधिकार्यांनी शुभेच्छा दिल्या  तसेच चहात्या कडून शुभेच्छांचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.    या कार्यक्रमात संगीतकार अनु मलिक, आमदार भारती लव्हेकर, दीपा नारायण झा, एहसान कुरैशी, रज़ा मुराद, अरुण बख्शी, ऋतु पाठक अशा अनेक दिग्गजांना

पिंपरफोडी ता किनवट येथे वारकऱ्यांचा यांचा मेळावा संपन्न

  किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर) बोधडी परिसरातील पिंपरफोडी येथे काल दि 12 डिसेंबर 2021 रोजी वारकरी संप्रदायातील वैष्णव पंथीय भक्तगणांचा मेळावा घेण्यात आला होता या मेळाव्याचे अध्यक्ष गावच्या सरपंच अनुसया डाके ह्या होत्या तर मेळाव्याचे उदघाटन कोंडबा महाराज तोटेवाड सावरीकर अध्यक्ष किनवट तालुका यांनी भगवान विष्णूच्या प्रतिमेचे पूजन करून श्रीफळ फोडून उद्घाटन केले. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महेश महाराज बोधडी कर, बळीराम तर्फे वाड, अंकुश महाराज बोधडी कर, सलाम महाराज दहेगावकर, मारुती महाराज बोधडी कर, तुकाराम लाखाडे बोधडी कर यांच्यासह आढावा समितीचे माजी अध्यक्ष भगवान हुरदुके, मारुती दिवसे पाटील, कॉ अडेलू बोनगीर, गंगाधर तोट्रे ,अंकुश साबळे, माजी सरपंच कोकाटे, दत्ता झिंगरे, चंद्रकांत गारोळे, यांच्यासह मेळाव्यासाठी जलधारा व बोधडी परिसरातील नंदगाव, जलधरा, सावरगाव, कोल्हारी, धानोरा, पिंपरी, सावरी, थारा, डोंगरगाव, सोमागुडा, सुंगागुडा, सिंगारवाडी, इंजेगाव, बोधडी बु , सिंदगी इत्यादी गावांसह इतर अनेक गावातील जवळपास चारशे ते पाचशे वारकरी उपस्थित होते. याप्रसंगी तोटेवाड मह

मानव आधिकार, न्याय, निवाऱ्याच्या शोधात गांधी नगर……. ॲड . सचिन भिमराव दारवंडे यांचा गांधी नगरच्या परीस्थितीवर विशेष लेख ,सदरील लेखक लेखक औरंगाबाद उच्च न्यायालयात वकील म्हणून काम पाहीले आहे तसेचडॉ. बाबासाहेब अंबेडकर विद्यापिठात संविधान या विषयात सुवर्णपदक प्राप्त् आहे

 नांदेड जिल्हातील किनवट तालूक्यात गांधीनगर जेथे होते, तीथे कधी काळी बेशरमाची झुडपे व काटेरी  झाडामध्ये पोसलेली डुक्करे आपला संसार करून घाणीचे साम्राज्य् पसरवीत होती.  स्म्‌शानभुमी शेजारीच असल्यामुळे आपला सुशिक्षित आणि पुढारलेला समाज तिकडे अंधारात तर सोडा दिवसासुध्दा जाणे टाळायचा. त्या ठिकाणी गावातला भंगार जमा करणारा, मिस्त्री काम करणारा, हमाल लोकानी वस्ती केली. त्याच्या बायकानी दिवसभर शेत मजुरी करून परत आल्यानंतर बेशरमाची रोपे ऊपटून, काटेरी झाडे  तोडून, मातीचा भर टाकून थोडी-थेाडी जागा राहण्यायोग्य् केली. असाच निरंतर प्रवास त्यालोकानी पन्नास वर्ष केला, काटेरी झाडाच्या जखमाचे व्रण्  आजही त्यांच्या शरीरावर असतीलच. स्वत:च्या पन्नास वर्ष अंगमेहनतीतून त्यांनी राहण्यायोग्य् वस्ती निर्माण केली त्याला भारतमातेच्या साक्षीने देशाच्या बापाचे नाव दिले.  ज्यामुलांना काखेत घेउन त्याच्या आईने घाण्‍ काढली ती मुले तीथेच मोठी झाली, त्यामुलांची लग्न तेथेच येणाऱ्या – जाणाऱ्या रेल्वे गाडीच्या साक्षीने झाली. आणि तिथेच त्यांनी नातवंडाना जन्म् दिला. एकून पन्नास वर्ष प्रवास त्यांच्या तीन पिडयानी गांधीनगर येथे क

किनवट येथे मा.शरद पवार यांचा वाढदिवस विविध सामजिक उपक्रमांनी साजरा

  किनवट तालुका प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वार्थ संस्थापक अध्यक्ष आदरणिय पद्मविभूषण मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस किनवट तर्फे मा.आ.प्रदिपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२/१२/२०२१ रोजी रविवार,उपजिल्हा रुग्णालय,गोकुंदा येथे फळ वाटपाचा कार्यक्रम,मौजे.कोल्हारी ता.किनवट येथे टेनिस बॉल क्रिकेट खुले सामन्याचे उद्घाटन सोहळा व संथागार वृद्धाश्रम,किनवट येथे वृद्धाकरीता ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम असे विविध सामजिक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व किनवट/इस्लापुर परिसरातील असंख्य युवकांच्या उपस्थितीत सदरील कार्यक्रमाचे आयोजक म्हणुन श्री.बालाजी बामणे यांच्या प्रयत्नाने विविध सामजिक उपक्रम राबविण्यात आले.

साहित्य संमेलनात प्राचार्य डॉ. राजू मोतेराव यांचे काव्यवाचन -

   किनवट- सरस्वती अध्यापक महाविद्यालय किनवट येथील प्राचार्य डॉ. राजू मोतेराव यांचे 'मराठी बोली साहित्य संमेलन' दानापूर जि. अकोला येथील साहित्य संमेलनात दिनांक 12 डिसेंबर 2021 रोजी  मराठवाडी कविता यासाठी निमंत्रित कवी म्हणून त्यांचा सन्मान करतांना.

राज माहुरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

किनवट ता. प्रतिनिधी:- प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ किनवट चे तालुका संघटक तथा अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेचे तालुका सचिव राज माहुरकर यांचा वाढदिवस प्रेस संपादक व पत्रकार संघ या संघटनेच्या वतीने आज की न्युज कार्यालय येथे केक  कापून व पुष्पगुच्छ देऊन आनंदात व उत्साहात साजरा करण्यात आला या वेळी पत्रकार संघाचे आशिष शेळके, सय्यद नदीम, नसीर तगाले, विजय वाघमारे, पदमाकर महेंद, राजु मेश्राम, विशाल गिमेकर ,मारोती देवकते, संतोष कनाके, पदाधिकारी व सदस्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा झाला तर प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख आनंद भालेराव व ता. उ. राजेश पाटील यांनी भ्रमणध्वनी वरून राज माहुरकर यांना शुभेच्छा दिल्या .

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांचा आदर्श वाढदिवस

  सातारा : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रणजीत मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त कराड शहरातील आशा स्वयंसेविकांना साड्या वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष महेश जाधव व पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पदाधिकारी आपला वाढदिवस सामाजिक, शैक्षणिक उपक्रम,आरोग्य शिबीर, फळं वाटप, अन्नधान्य वाटप, दिव्यांग मुलांना विविध वस्तू भेट, अनाथ मुलांना आवश्यक साहित्य, वृद्धाश्रमातील परिवाराना कुटुंबाचा आधार देत वाढदिवस साजरा करतात ही संघटनेची कौतुकास्पद बाब आहे.  संघटनेची परंपरा कायम ठेवत पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्ष रणजित मोरे यांनी कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कराड शहरातील आशा स्वयंसेविकांना साडी वाटप करून आपला अनोखा वाढदिवस साजरा केला आहे.  या विशेष व उल्लेखनीय वाढदिवसाबद्दल संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे, राज्य संपर्कप्रमुख रमेश मोपकर, राज्य संघटक नरेंद्र जमादार, मंत्रालय व विधिमंडळ प्रमुख पंडित मोहिते- पाटील राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुध

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या६५ व्या महापरिनिर्वाण दिनी ६५ जणांनी केले रक्तदान एक वही एक पेन अभियान राबिवण्यात आले

किनवट, दि.६ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व २६/११ च्या आंतकी हल्यात शहीद झालेल्या पोलिस विर जवानांना ६५ च्यावर रक्तदात्यांनी आज(दि.६) सकाळी १० वाजता रक्तदान करुन अभिवादन केले.तसेच एक वही एक पेन अभियानालाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे संयोजक एड.सम्राट सर्पे व निखिल कावळे यांनी सांगितले.रक्तदान शिबिराचे हे चवथे वर्ष आहे.     प्रारंभी उपस्थित मान्यवर भारतीय बौद्ध महासभेचे ता. अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके, सह पोलिस निरीक्षक विशाल वाठोरे, नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नप उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानिवार,   अखिल भारतीय बौद्ध उपासक संघाचे राज्यसचिव ॲड. मिलींद सर्पे , डॉ. यु बी मोरे ,प्राचार्य आनंद भंडारे, माजी नगराध्यक्ष के. मुर्ती, वंचीत बहुजन आघाडीचे ता. अध्यक्ष किशन राठोड , दादाराव कयापाक, दिपक ओंकार, विवेक ओंकार, सुरेश जाधव, प्रा,. आनंद भालेराव, शिवा आंधळे, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, माधव कावळे, वसंत सर्पे, प्रा.सुबोध सर्पे, राजेश पाटील, गंगाधर कदम, सभांजी ब्रिगेडचे सचीन कदम, माजी नगरसेविका आशाताई कदम, गोंडवाना ब्रिगेडचे गजानन गुहाडे, संतोष प

दिपकभाई केदार यांच्या वरील खोटे गुन्हे तात्काळ मागे घ्या - ऑल इंडिया पँथर सेना

   नांदेड : ऑल इंडिया पँथर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्षनायक मा. दिपकभाई केदार व सहकारी यांच्या वरील खोटे गुन्हे मागे घेण्याबाबत,  निवासी उपजिल्हाधिकारी प्रदीप कुलकर्णी  सर यांच्या मार्फत मुख्यमंत्री ,  मा.उद्धव ठाकरे साहेब यांना निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. समाजाचा घटक म्हणून केदार यांची भूमिका ही  त्याठिकाणी असलेल्या गैरसोय व इंदुमिलच्या ठिकाणी होणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठीचा आक्रोश होता. पण पोलीस प्रशासनाने त्यांना ताब्यात घेऊन विविध कलमाखाली गुन्हे दाखल केले ते मागे घेण्यात यावे. यामागणीचे निवेदन देण्यात आले . गुन्हे मागे नाही घेतल्यास महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष भिमराव बुक्तरे ,नांदेड ता.अध्यक्ष सतीश हिंगोले, अर्धापूर ता. अध्यक्ष गणेश कांबळे, नांदेड ता.उपाध्यक्ष आनंद पाटील, शुद्दोधन कांबळे व इतर जण उपस्थित होते.

तुळसाबाई सदाशिव रायबोळे यांचे वृद्धापकाळाने निधन

  किनवट : किनवट तालुक्यातील दाभाडी येथील तुळसाबाई सदाशिव रायबोळे यांचे दि 5 डिसेंम्बर रोजी निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुले,दोन मुली, नातू, नातवंडे असा परिवार असून ऍड. जी. एस. रायबोळे यांची आई व प्राचार्य डॉ.राजू मोतेराव यांची आजी सासू असून त्यांचा अंत्यविधी उद्या दि 6 डिसेंम्बर रोजी दुपारी  1 वाजता मौजे दाभाडी येथे होणार आहे.

सर्वसामान्यांसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले "जैसे थे ठेवण्याचा स्टे ऑर्डर", "तात्पुरता स्टे ऑर्डर" आणि "कायमचा स्टे ऑर्डर" किंवा "मनाई हुकूम" या संदर्भात महत्त्वाची माहिती

  माझ्या महाराष्ट्रातील तमाम भांडवलदार, शेतकरी, नोकरदार वर्ग, व्यापारी वर्ग, तसेच माझ्या बंधू भगिनींनो आज एक नवीन आणि सर्वात महत्त्वाचा असा सर्वसामान्यांसाठी असलेला विषय म्हणजे ज्या ज्या वेळेस आपल्यावर अन्याय होण्याची शक्यता असते त्या त्या वेळेस फार वेळ लागणार या न्यायप्रक्रियेत आपण बळी होऊ नये यासाठी आपल्याला असे काही सहाय्य मिळते की जणू आपल्यावर तर अन्याय होतच नाही परंतु एक नवीन  सुशिक्षित व सुरक्षित समाजाची निर्मिती होण्यास मदत होत असते ते आदेश म्हणजे कोणते हे आपण पाहणार आहोत मित्रांनो आज आपण स्टे ऑर्डर किंवा मनाई हुकूम या संदर्भात थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती पाहुयात. आता सर्व साधारण कोणत्याही दिवाणी दाव्यामध्ये स्टे ऑर्डर ही मुख्यतः तीन प्रकारचे असते. पहिला आहे स्टेटस-को ज्याला आपण परिस्थिती जैसे थे ठेवण्याचा आदेश म्हणतो. दुसरा आहे तात्पुरता मनाई हुकूम. आणि तिसरा आहे कायमचा मनाईहुकूम.आता या तीनही गोष्टींची माहिती घेण्यापूर्वी मुळात स्टेट्स-को किंवा स्टे ऑर्डर ची गरज का असते? हे आधी जाणून घेतला पाहिजे. आता बरेचदा जेव्हा एखाद्या मालमत्ते संदर्भात किंवा दाव्याचा जो काही विषय असेल,

अखिल भारतीय अपंग कामगार संघटना किनवट च्या वतीने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा

  किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्यावतीने किनवट साईबाबा मंगल कार्यालयामध्ये दिनांक 03/12/2021 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास माजी आमदार प्रदीप जी नाईक, सहाय्यक जिल्हा अधिकारी किर्तिकुमार एच पुजार व आरोग्य विभागाचे कोरोना प्रतिबंधक लस देणारी टीम व विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. किनवट येथील साई बाबा मंगल कार्यालय येथे दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 03/12/2021 रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त माजी आमदार प्रदीप जी नाईक यांनी उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात केली उद्घाटन पर बोलताना म्हणाले की मी पदावर नसताना माझा एवढा मानपान करत आहात खरोखरच आपण दिव्यांग असून जागृत आहात यापुढे मी आपल्या सर्व हक्कासाठी सदैव तुमच्या सोबत आहोत असे म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे घोषित केले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिव्यांगांना शासन स्तरावरील सर्व लाभ मि

महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिर व एक वही एक पेन अभियान

  *किनवट*,दि.१: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६५ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त व २६/११ च्या आंतकी हल्यात शहीद झालेल्या पोलिस विर जवानांना रक्तदान करुन अभिवादन करण्यासाठी येत्या रविवारी(दि.६) सकाळी दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ रक्तदान  शिबिराचे व एक वही एक पेन अभियानाचे  आयोजन करण्यात आल्याचे संयोजक एड.सम्राट सर्पे व निखिल कावळे यांनी सांगितले आहे.शिबिराचे हे चवथे वर्ष आहे.          गुरुगोविंदसिंगजी ब्लड बँक, नांदेड च्या सौजन्याने घेण्यात येणार असलेल्या या रक्तदाबन  शिबिरात    रक्तदात्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे,असे.आवाहन आयोजक अॅड सम्राट सर्पे व निखिल कावळे यांनी केले आहे. रक्तदात्यांनी खालिल मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून नाव नोंदणी करावी :८६६८७००७४८ व ८६०००६३३२५