Skip to main content

सामाजिक उपक्रमांनी खासदार हेमंत पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा ; कार्डियाक रुग्णवाहिकेची केले लोकार्पण

 


हिंगोली /नांदेड : हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांचा वाढदिवस नांदेड,हिंगोली  आणि यवतमाळ जिल्ह्यात विविध सामाजिक उपक्रम आणि कोरोनाच्या नियमांचे पालन करून साजरा करण्यात आला.हिंगोली ,नांदेड , वसमत , किनवट,उमरखेड,कुरुंदा,औंढा नागनाथ   येथे  रक्तदान शिबिर ,रुग्णाना फळे वाटप,नेत्र तपासणी ,महाआरोग्य शिबीर , शालेय साहित्य वाटप,  कीर्तन सोहळा ,ब्लँकेट वाटप , महिलांना साडीचे वाटप स्पर्धा परीक्षेचे आयोजन , महाभिषेक, अन्नदान अश्या विविध उपक्रमाचे आयोजन   शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी करून सामाजिक बांधिलकी जपली.तर खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्याची रुग्णसेवेची गरज लक्षात घेता  स्वतःच्या खासदार निधीतून रुग्णसेवेसाठी कार्डियाक रुग्णवाहिका हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयाला लोकार्पित केली  तसेच हिंगोली येथे शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन यावेळी  करण्यात आले 




                खासदार हेमंत पाटील यांचा  वाढदिवस दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो  यावर्षी पारंपरिक सत्काराला बगल देत खासदार हेमंत पाटील यांनीच  हार तुरे, फटाके, बॅनर होर्डिंग यावर होणारा अनाठायी खर्च टाळून आणि कोरोनाचे सावट लक्षात घेऊन सामाजिक उपक्रम आयोजित करून साजरा करण्याचे आवाहन केले होते त्यास प्रचंड प्रतिसाद देऊन शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सामाजिक उपक्रम आयोजित केले होते . गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुल आणि बालसदन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बालगोपाळांचा कार्यक्रमाला खासदार हेमंत पाटील यांनी आवर्जून उपस्थिती लावली आणि बालमित्रांनी स्व हस्ते बनविलेल्या शुभेच्छया पत्रांचा बालमनाने स्वीकार केला . यासोबतच नांदेड,हिंगोली आणि  यवतमाळ जिल्ह्यात भरगच्च सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. जिल्हा प्रमुख आनंद तिडके पाटील बोंढारकर यांनी जिल्हा रुग्णालयात रुग्णांना, रेल्वे स्थानक, साईबाबा मंदिर शनी मंदिर येथे ब्लॅंकेट चे वाटप करून मायेची उब दिली यावेळी सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील तालुका प्रमुख उद्धव पाटील शिंदे श्याम पाटील वानखेडे यांची उपस्थिती होती. तर जिल्हा प्रमुख दत्ता पाटील कोकाटे यांनी सुमन बालगृहात विद्यार्थ्यांना अन्नदान दिले तसेच तालुका अध्यक्ष जयवंत कदम, यांनी नेर्ली येथील कुष्ठधाम मध्ये रुग्णांना भोजनदान दिले .  कामगार सेना जिल्हाध्यक्ष सुरेश लोट यांनी शैक्षणिक साहित्याचे तुलदान करून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप केले , मुस्लीम आघाडीचे प्रा. शेख यांच्यामार्फत कामगारांना लेबर किट चे वाटप करण्यात आले , वाजेगाव येथे वडगाव येथील माजी सरपंच नामदेव पुयड यांच्या वतीने आरोग्य शिबीर आयोजित करून रुग्णसेवा देण्यात आली. वसमत येथे सोपं नेव्हल पाटील यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली . किनवट येथे शिवसेना आजी माजी पदाधिकारी , कार्यकर्त्यांच्या वतीने स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले.  तसेच युवासेना नांदेड उपजिल्हा प्रमुख प्रशांत कोरडे यांनी रक्तदान शिबीर आयोजित केले होते.   यामध्ये २०० रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. गोदावरी इंटरनॅशनल पब्लिक स्कुलच्या वतीने बालसदन येथील विद्यार्थ्यांना मास्क आणि सॅनिटायझर वाटप करून कोरोनाची जनजागृती करण्यात आली. औंढा तालुक्यातील पुराजळ सर्कल येथील शिवसेना व युवासेना पदाधिकारी यांच्या वतीने भव्य  कीर्तन सोहळा आणि नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते तर उमरखेड युवासेना तालुका प्रमुख कपिल पाटील यांच्या वतीने ३ हजार ९०० विद्यार्थ्यांना एकाचवेळी शालेय साहित्याचे वाटप करून विक्रम करण्यात आला.  

                 वसमत येथे गवळी हनुमान मंदिरात वसमत शिवसेनेच्या वतीने महाभिषेक  आयोजित करण्यात आला होता . औंढा नागनाथ येथे नेत्र तपासणी करण्यात येऊन गरजूना चष्म्याचे वाटप करण्यात आले , करुंदा येथे लाडू तुला करण्यात येऊन रक्तदान शिबीर घेण्यात आले. हिंगोली येथील महावीर भवन येथे खासदार हेमंत पाटील यांनी दुपारपासून शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते , नागरिकांच्या शुभेच्यांचा मनोभावे स्वीकार केला यावेळी  जि. प. अध्यक्ष गणाजी बेले , माजी खासदार शिवाजी माने , आ. संतोष बांगर ,सहसंपर्क प्रमुख डॉ. रमेश शिंदे , उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे , उपजिल्हाप्रमुख संदेश देशमुख , युवासेना जिल्हाप्रमुख राम कदम , माजी जि. प. उपाध्यक्ष उद्धव गायकवाड , तालुका प्रमुख आनंद जगताप, भानुदास जाधव ,सखाराम उबाळे ,जि. प. महिला बालकल्याण सभापती रुपालीताई  गोरेगावकर गटनेते श्रीराम बांगर , सुभाष बांगर , जि. प. सदस्य बाळासाहेब मगर, नंदकिशोर खिल्लारे, शहरप्रमुख अशोक नाईक , किशोर मास्ट, माजी उपसभापती गोपू पाटील, महिला आघाडी जिल्हा प्रमुख रेखाताई देवकते ,  पांडुरंग गुजर ,  यांच्यासह आदी उपस्थित होते. तर नांदेड दक्षिण तालुका संघटक बालाजी पाटील भायेगावकर  यांच्या वतीने बालसदन मधील विद्यार्थ्यांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले यावेळी उपतालुका प्रमुख अशोक पाटील वांगीकर, सिडको विभागप्रमुख संदीप जिल्हेवाड,सोनखेड सर्कल तालुका संघटक सुदाम पाटील बुद्रुक , रवी जाधव यांची उपस्थिती होती. तसेच नांदेड दक्षिण शहरप्रमुख तुलजेश यादव यांच्या वतीने महिलांना साडीचे वाटप करण्यात आले . तर खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली जिल्ह्याची आरोग्यसेवेची बाब लक्षात घेऊन स्वतःच्या खासदार निधीमधून सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांनी सज्ज असलेली कार्डियाक रुग्णवाहिका हिंगोली जिल्हा सामान्य रुग्णालयालास लोकार्पित केली. आणि रुग्णांना अन्नदान करण्यात आले . यावेळी  संपर्कप्रमुख आनंदराव जाधव,आ. बालाजी कल्याणकर ,  जिल्हाप्रमुख दत्ता कोकाटे,  उमेश मुंडे,  आनंदराव पाटील तिडके,  माजी आमदार रोहिदास चव्हाण, सहसंपर्कप्रमुख मनोज भंडारी, प्रकाश मारावार, युवा सेना जिल्हाध्यक्ष माधव पावडे,  तालुका अध्यक्ष जयवंत कदम, अवतारसिंग पहरेदार बालाजी परदेशी, गजानन राजुरवार, पत्रकार पंढरीनाथ बोकारे, विजय जोशी, अभयकुमार दांडगे, श्रीनिवास भोसले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...