Skip to main content

शेतकऱ्यांची विज तोडून त्रास दिल्यास अधिका-यांना घेराव घालू ; किसान सभेचे अर्जुन आडे यांचा इशारा

 



*किनवट*, दि. १६  : नैसर्गिक आपत्तीच्या अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे ऐन रब्बी हंगामात  विज कनेक्शन तोडू नये अन्यथा विज वितरण कंपनीच्या कार्यालयातील अधिका-यांना घेराव घालू, असा इशारा अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कार्याध्यक्ष अर्जुन आडे  यांंनी सर्व संबंधितांना एका निवेदनाद्वारे नुकताच  दिला आहे.

अगोदरच अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिकाला लागणारी विज खंडीत करून त्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचे काम हे सरकार करत आहे. सध्या रब्बी हंगामातील हरभरा ज्वारी गहू शेंगा या पिकांना पाणी देण्याचा मौसम असताना थकित विज बिलाच्या वसूली पोटी विज वितरण कडून शेतीपंपाचे कोणतीही पूर्व सूचना न देता गावागावातील विज कनेक्शन तोडून ट्रान्सफार्मर बंद केले जात आहेत,यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला असून रब्बी हंगामातील पीके वाळून जात आहेत. एकीकडे गावातील शेती पंपाच्या थकीत   विज बिलापैकी ६७% विजबिल माफ केल्याची घोषणा राज्य सरकारकडून केली असली तरी त्याची अमलबजावणी होत नाही. त्यातच उर्वरीत ३३ % विजबिल  भरणा करावा, असे परीपत्रक असताना सक्तीची वसूली करत असून नाही भरणा-या शेतकऱ्यांचे विज कनेक्शन तोडल्याने शेतकऱ्यांची संपूर्ण पिके वाळून जात आहेत.

सक्तीची वसूली आणि राज्य शासनाची रोज बदलत असलेली विज जोडणी  संदर्भातील नियम यावरही आडे यानी टीका केली आहे. विज वितरण कर्मचारी सरसकट शेतकऱ्यांचे ट्रान्सफार्मर बंद करून सक्तीची वसूली करत आहेत.यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान तर होत आहे.  यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याचे कामही हे जुलमी सरकार करत आहे, अशी टीका आडे यानी केली आहे.  विज वितरण अधिकारी  शेतकऱ्यांचे विज कनेकूशन तोडून त्रास देत असतील तर विज वितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारू व अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देऊ ,असा इशारा आडे यानी निवेदनातून दिला आहे. सध्या विजकंपनीकडून राजरोसपणे शेतीचे कनेक्शन शेतकऱ्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता तोडला जात असल्याने राज्य शासनाच्या विरोधात शेतकऱ्यांतून असंतोष निर्माण झाला आहे. शिवाय खारिप हंगाम अतिवृष्टीने गेला तर रब्बी हंगाम शासनाच्या जुलमी वसूलीमुळे हातचा जाणार आहे. एकंदरीत शेतकऱ्यांच्या जखमेवर मिठ चोळण्याचा प्रकार सुरू आहे. या बाबीचा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीकडून धिक्कार करण्यात येत आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...