Skip to main content

शास्त्री महाविद्यालयात अल्पसंख्यांक हक्क दिवस साजरा

 


धर्माबाद प्रतिनिधी:

येथील लाल बहादुर शास्त्री महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते म्हणून डॉ. जहिरूद्दीन पठाण यांनी अल्पसंख्यांकांचे हक्क आणि अधिकार या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले.

 सुरुवातीला राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. संभाजी मनूरकर यांनी प्रास्ताविक करताना कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. डॉ. पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अल्पसंख्यांकांचे हक्क व अधिकार या विषयी संवैधानिक तरतुदी सांगून त्यांचे हक्क,अधिकार,संस्कृती, भाषा, व वंशाचे संरक्षणासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने राबविण्यात येणा-या योजना व उपक्रमांची माहिती दिली.अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डाॅ. श्रीराम गव्हाणे यांनी महामानवांचे विचार व संवैधानिक कायदे व तरतुदी विषयी विद्यार्थ्यांनी  जागृत राहावे, असे मत व्यक्त केले.

       या कार्यक्रमास  महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.राम शेवलीकर यांनी तर आभार डाॅ. नागनाथ वारले यांनी मानले.



Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

सेवा फाऊंडेशन तर्फे आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात 70 रक्तदात्यांनी केले रक्तदान

  अदिलाबाद:- सेवा फाऊंडेशन यांच्या तर्फे ता.१ ऑक्टोबर रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजक सिराज भाई आदिलाबाद कर यांच्यातर्फे आयोजन करण्यात आले होते यावेळी टिपू सुलतान ब्रिगेडचे नांदेड जिल्हा अध्यक्ष सय्यद नदीम आसिफ भाई लाईफ सेल क्लिनिकल लॅब किनवट यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सेवा फाऊंडेशन आदिलाबाद जिल्हा टीमनी उत्कृष्ट असे रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केले यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी  जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम यांनी स्वतः रक्तदान केले व युवकांना प्रोत्साहन दिले यावेळी  रिम्स डायरेक्टर डॉक्टर जयसिंग राठोड,डॉक्टर नरेंद्र राठोड ऍडिशनल डी एम एच ओ डॉक्टर गजानंद लॅब,मेडिकल ऑफिसर डॉक्टर पारसनाथ सेवा फाऊंडेशन प्रेसिडेंट खाजा सिराजुद्दीन ,शफिक अहमद ,अथेर इमरान , असलम खान शेख इस्माईल ,तबरेज खान , अहमद हाफिज समीर मोहम्मद नावेद रिजवान खॉन, मो. समीर खॉन मोहमद सलीम, खान मोहमद, असीफ इच्चोडा, सामाजिक कार्यकर्ता इकबाल पटेल, अबु तल्हा, शेख मशीर, शेख मेहबूब तसेच सेवा फाऊंडेशनचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते