Skip to main content

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या भंडारा जिल्हा पदाधिकाऱ्यांचा 'राष्ट्रीय जीवन गौरव' पुरस्काराने सन्मान

 



 नागपूर : 'जागतिक मानवाधिकार दिनी' प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ भंडारा जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्रीय मानवाधिकार संगठन नवी दिल्लीच्या वतीने नागपूर येथे जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्ली च्या वतीने१० डिसेंबर जागतिक मानवाधिकार दिन साई सभागृह व्होकार्ट हॉस्पिटल नागपूर येथे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास मुख्य अतिथी मा. न्यायाधिस अभिजित देशमुख, मा. संजय पांडे (वरिष्ठ पोलीस अधीक्षक), डॉ. मिलिंद दहिवले (राष्ट्रीय अध्यक्ष), डॉ. कुमेश्वर भगत (राष्ट्रीय उपाध्यक्ष), डॉ. दिपक कदम (फिल्म निर्माते),  डॉ. प्रकाश भागवत (सिने अभिनेता), मा. अश्विनी चंद्रिकापुरे (सिने अभिनेत्री), ब्रह्मकुमारी मनिषादिदी आदिंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांना 'राष्ट्रीय जीवन गौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 


प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ. देवानंद नंदागवळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रा. सुरज गोंडाने,भंडारा जिल्हा कोष्याध्यक्ष सैनपाल वासनीक, यांना मान्यवरांच्या हस्ते समाजभूषण पुरस्काराने सम्मानीत करण्यात आले.  कार्यक्रमास देशातुन प्रत्येक राज्यातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन केंद्रीय मानवाधिकार संगठन नई दिल्लीकडून करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी शासनाच्या व आरोग्य विभागाच्या सर्व सुचनांचे काटेकोर पणे पालन करुनच कार्यक्रम पार पाडण्यात आले. प्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष माननीय प्राध्यापक डी.टी. आंबेगावे , महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष माननीय पंकज वानखेडे, राज्य सरचिटणीस संजीव जी भांबोरे विदर्भ सरचिटणीस प्रा. शेखर बोरकर, पत्रकार प्रवीण भोंदे, पत्रकार रामलाल शहारे, पत्रकार प्रशांत शहारे, भंडारा जिल्हा पदाधिकारी तसेच कास्ट्राईब कल्याण महासंघ पुणे चे राज्य उपमहासचिव मा. सुर्यकांत हुमणे, जिल्हा सचिव धांडेजी, व जिल्ह्यातील अनेक समाज बांधवांनी पुरस्कार प्राप्त कर्त्यांचे अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...