Skip to main content

मी ...तू... आणि शेकोटी... प्रसिद्ध लेखीका रुचिरा बेटकर यांचा वाचनीय लेख



सध्या थंडीने चांगलीच हुडहुडी भरवलीय...अशा थंडगार वातावरणात एकदा तरी शेकोटीची उब घेण्याचा अनुभव काही निराळाच ...हातावर हात चोळत शेकोटी च्या भोवती बसून गप्पांची एक मैफल रंगवून जाते...अंगावर येणार्या थंडगार वार्यांना परतून लावण्यासाठी पेटवली जाणारी शेकोटी म्हणजे..एक न्यारीच उब...

आसमंतात अदृष्य गारव्याचा काहूरा कोंडलेला राहतोय आणि त्यामुळे दिवसाढवळ्या अंधार वाटु लागतोय. 

गारेगार थंडीत गरमागरम पदार्थांवर ताव मारून शेकोटीभोवती रंगलेली गप्पांची मैफल, कानावर पडली... आणि मी कसलाही विचार न करता तिथे पोहचले...ईथे

हॉररपासून म्युझिकपर्यंतच्या सगळ्या गोष्टी या अन्फरगॉटेबल ठरत होत्या. कडाक्याच्या थंडीत शेकोटी पेटल्यावर मनाचे सगळे कप्पे एक एक करून खुलत होते. गप्पां करत आठवणींचे  दारे उघडत होते फुल्ल नाइट गप्पांचा फड रंगणार होता. त्यात कोणताही विषय वर्ज्य नसणार होतो.अश्यात हातामध्ये

गरमागरम वाफाळत्या कॉफी चे झुरके मारत केलेल्या गप्पा, गोष्टी त...मला तुझी आठवण येणं हे नक्कीच होतं...आता ही शेकोटी ची, धग हवीहवीशी वाटतं होती. एकूण काय तर

आकाशात उडणाऱ्या शिकोटीच्या चिटोर्या सह स्वप्नरंजनाचे  आकर्षण होऊ लागले....अश्याच एका आठवणीत माझं मन तुझ्यात रंगल....

पश्चिमेला सूर्य मावळत असताना सूर्याची किरणे अंगावर घेताना आपण नितांतसुंदर वाहणार्या एखाद्या नदीच्या काठावर बसलो होतो... सोबतीला तू होतास..अर्थात तु हवाच होतास सोबतीला ....

त्या गुलाबी थंडी मध्ये आपण होतो...आणि समोर होती धगधगती शेकोटी...धगधगत मन...

पण तिथे आपल्या आपण असण्यामध्ये मी संपून गेले होते आणि तू देखील... चांगल्या वाईट व्यवहाराच्या पलीकडे फक्त भावनांची अभिव्यक्ती उरली होती...या भावनांना शब्दच उरले नव्हते... उरले होतं फक्त कुतूहल, उत्कंठा ,एक अनामिक पीडा ते कधी ही संपणार नसल्याचे भासतं होते... अशा स्थितीत एक वेळ अशी होती की हे क्षण संपणार तर नाहीत ना याची भिंती वाटायला लागली होती... मग नकळत एका अलौकिक प्रवासावर आपण दोघे निघालो होतो... हा प्रवास कुठेही जाण्यासाठीचा नव्हता ... तर स्वतः मधली पोकळी बाजूला सारून एकरूप होण्याचा प्रवास... समरूप होण्याचा प्रवास... या प्रवासात वेदना आहे,.. दुःख आहे... तरीही सहप्रवासी म्हणून दोघे खूप खुश होतो.. शेवटी कुठेतरी भावविभोर होऊन अश्रूंना वाट मोकळी करून दिली होतीच...जे या मनःपटलावर गुलाबी थंडी मुळे चे सुखद व हव्याहव्याश्या वाटणार्या अनुभूतीची अभिव्यक्ती देत होते... म्हणजे ते अश्रू नव्हते तर सुखद ,समाधानाच प्रतिक होतं...आता तू व मी असे दोघे नसून...आता एक झाले होतो...आपण ... तिथे कायमचं राहणार होतो एका आठवणींच्या पांघरुणात गुंडाळून... खरतर आपल्याला आपण असण्यासाठी शरीर व किंबहूना या मनाची देखील गरज नव्हती. या गुलाबी थंडी मुळे आपण म्हणजे तू... मी आणि मी ...तू... म्हणून उरले होतो... पुन्हा असं वाटतं की चल जाऊ त्या गुलाबी थंडी मध्ये जिथे मी मी राहणार नाही... तेथे तु...तू राहणार नाही... अश्या आठवणींच्या प्रवासावर...

रात्र कधी...? कशी...? संपली हे कळलंच नाही...

दिवस उजाडलेला होता...दिवस आणि मी आठवणीत गोठलेलेच राहिलोत असंच वाटतयं...आकाशात मळभ ही दाटून आलेलं.भर दिवसादेखील अंगावर सूर्यप्रकाश पडला तरी तो तापदायक वाटत नाही या सूर्याची किरणे अगदी सोनेरी वाटू लागतायत आणि अंगावर येणारी वाऱ्याची झुळूक .... माझ्यातल्या तु ची आणि तुझ्यातल्या मी ची आठवण करून देऊ लागली होती...


सौ.रूचिरा बेटकर नांदेड.

9970774211


Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...