किनवट श. प्रतिनिधी:- स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,शंकर नगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अंतर महाविद्यालयीन 'क'झोन मुलींची खो-खो स्पर्धा पार पडली. या स्पर्धेमध्ये बळीराम पाटील महाविद्यालयातील मुलींनी सुवर्णपदक मिळविले. या यशाबद्दल किनवट शिक्षण संस्था, किनवट चे अध्यक्ष प्रफुल्ल राठोड, किनवट शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव सिडाम , गंगारेडी बैनमवार ,सचिव शंकरराव चाडावार, कोषाध्यक्ष जशवंत सिंग सोखी,प्राचार्य डॉ.शिवराज बेंबरेकर, संस्था समन्वयक प्रा.राजकुमार नेमानीवार,उपप्राचार्य डॉ. गजानन वानखेडे आदींनी सर्व विद्यार्थांचे अभिनंदन केले.संघ प्रमुख म्हणून डॉ. स्वाती कुरमे, डॉ. रचना हिपळगावकर यांनी काम पाहिले.
संपादक-राजेश पाटील (DJ/BA/MCJ/MJMS/CS) email- rajeshpatil502@gmail.com
Comments
Post a Comment