किनवट तालुका प्रतिनिधी:
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वार्थ संस्थापक अध्यक्ष आदरणिय पद्मविभूषण मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या 82 व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस किनवट तर्फे मा.आ.प्रदिपजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक १२/१२/२०२१ रोजी रविवार,उपजिल्हा रुग्णालय,गोकुंदा येथे फळ वाटपाचा कार्यक्रम,मौजे.कोल्हारी ता.किनवट येथे टेनिस बॉल क्रिकेट खुले सामन्याचे उद्घाटन सोहळा व संथागार वृद्धाश्रम,किनवट येथे वृद्धाकरीता ब्लँकेट वाटपाचा कार्यक्रम असे विविध सामजिक उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व किनवट/इस्लापुर परिसरातील असंख्य युवकांच्या उपस्थितीत सदरील कार्यक्रमाचे आयोजक म्हणुन श्री.बालाजी बामणे यांच्या प्रयत्नाने विविध सामजिक उपक्रम राबविण्यात आले.
Comments
Post a Comment