Skip to main content

अखिल भारतीय अपंग कामगार संघटना किनवट च्या वतीने आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन साजरा

 


किनवट शहर प्रतिनिधी (राज माहुरकर

आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्यावतीने किनवट साईबाबा मंगल कार्यालयामध्ये दिनांक 03/12/2021 रोजी सकाळी 11 ते 5 वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमास माजी आमदार प्रदीप जी नाईक, सहाय्यक जिल्हा अधिकारी किर्तिकुमार एच पुजार व आरोग्य विभागाचे कोरोना प्रतिबंधक लस देणारी टीम व विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

किनवट येथील साई बाबा मंगल कार्यालय येथे दरवर्षीप्रमाणे अखिल भारतीय अपंग कामगार संघटनेच्या वतीने दिनांक 03/12/2021 रोजी आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिनानिमित्त माजी आमदार प्रदीप जी नाईक यांनी उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात केली उद्घाटन पर बोलताना म्हणाले की मी पदावर नसताना माझा एवढा मानपान करत आहात खरोखरच आपण दिव्यांग असून जागृत आहात यापुढे मी आपल्या सर्व हक्कासाठी सदैव तुमच्या सोबत आहोत असे म्हणून कार्यक्रमाचे उद्घाटन झाल्याचे घोषित केले यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजारी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दिव्यांगांना शासन स्तरावरील सर्व लाभ मिळवून देण्यासाठी लवकरच सर्व विभाग प्रमुखांची बैठक बोलावून निर्णय घेण्यात येईल यापुढे एकही दिव्यांग शासनाच्या लाभापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेतली जाईल असे अध्यक्षीय भाषणात म्हणाले यावेळी विशेष बाब म्हणून आरोग्य विभागाची एक टीम कार्यक्रमस्थळी कारोणा विषाणू प्रतिबंधक लस घेऊन उपस्थित होते तर उपस्थित दिव्यांनी चांगला प्रतिसाद देत जवळपास 20 ते 30 दिव्यांगांनी कोरोना लस घेतली यावेळी विचार मंचावर माजी नगराध्यक्ष के मूर्ती, माजी नगराध्यक्ष साजिद खान, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, शिवसेना उपप्रमुख अतुल दर्शन वाढ, शिवसेना उपसंघटक सुरेश घुम्माडवार, मजूर फेडरेशन संस्थेचे संचालक स्वामी स्वामी नुतपेलीवार, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गजानन मुंडे, राष्ट्रवादीचे युवा कार्यकर्ते बालाजी बामणे, भाजपाचे आदिवासी युवा नेते जितेंद्र कुलसंगे हे उपस्थित होते यावेळी कोरोना कर्म योद्धा म्हणून संघटनेच्यावतीने सहाय्यक जिल्हाधिकारी किर्ती कुमार एच पुजार यांना सन्मानपत्र देण्यात आले तर सूत्रसंचालन कॉम्रेड अडेलु बोंगिरवार यांनी केले तर आभार प्रदर्शन संघटनेचे सचिव राज माहुरकर यांनी आभार व्यक्त करताना सर्वप्रथम साईबाबा मंगल कार्यालयाचे संचालक गुरुस्वामी पवार यांचे आभार मानले यानंतर वेळातला वेळ काढून माजी आमदार प्रदीप जी नाईक व किर्तिकुमार  पुजारी यांनी उपस्थित होऊन दिव्यांगांना मार्गदर्शन केले यामुळे त्यांचे विशेष आभार मानून कार्यक्रमाचे आयोजक राज माहुरकर यांनी दिव्यांगांच्या कार्यक्रमाला निमंत्रित करूनही काही मान्यवर उपस्थित न झाल्याने खंत व्यक्त केली व सर्व दिव्यांगांना व उपस्थितांना सुरुची भोजनाचा आनंद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये असे सांगून सर्वांचे आभार व्यक्त केले

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...