Skip to main content

"सखे थोडस समाधानाने जगुया विखुरलेल्या या समाजाकडे डोळसपणे बघुया" ...मार्गशिष पौर्णिमेच्या संध्येला काव्य मैफिल बहरली क्रांतिसूर्य प्रतिष्ठानचा उपक्रम

 




ता. प्र. किनवट :

ता.१९

प्रत्येक पौणिमा काव्य पौर्णिमा उपक्रम अंतर्गत क्रांतिसुर्य प्रतिष्ठान आयोजित  कवि संमेलन श्रावस्ती बुध्द विहार गोकुंदा येथे पार पडले

या कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सवित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्रा. शुभांगी ठमके ह्या होत्या कार्यक्रमाच्या सुरवातीस आदर्शाची पुजा करण्यात आली . 

या कवि संमेलनास एकाहुन एक सरस कविता सादर करून कविंनी रसिकांची मने जिंकली.

सुरवातीला  कवि सुभाष गडलिंग यांनी 

- आंधळ्या परंपरेचे पिक या देशात काढले जात होते

माणसाचे अवमुल्यंन शासन प्रमाण असुन तु विवेकाने पुकारले बंड 

हि विद्रोही रचना सादर केली.


कवयत्री वंदना तामगाडगे यांनी

केले

- भीमा तुझ्या शब्दांना

भीमा तुझ्या शब्दांना हि वैचारिक मंथन घडवुन आणनारी कविता सादर केली.



कवि (सांगावाकार)महेंद्र नरवाडे यांनी

-हे शांती दुता तुझ्या ज्ञानाचा 

कणातला कण मनातला पुढे रे हाक

चारीत्र्याची खान तु नितीचे भांडार तु

हि काव्य रचना सादर केली व प्रेक्षकांची वाहवा मिळवली.


कवयत्री नंदाताई नगारे यांनी

- उद्घाटक ठरली तु नारी जातीची

माय माऊली सावित्रीमाई फुले अनंत संकटांना तोंड दिले तु ना डगमगले तुझे पाऊल.


कवि पाडुंरंग भालेराव यांनी दररोज घ्या हो वंदना इथे

या बोध विहारी विहारी इथे हि गेय कविता गाऊन सादर केली.


कवयत्री  सिमा नरवाडे यांनी

- चल ग सखे थोडस समाधानाने जगुया 

विखुरलेल्या या समाजाला डोळसपणे बघुया हि रचना सादर करून उपस्थितांची दाद मिळवली.


युवाकवी राजेश पाटील यांनी 

- शाळा सुटली पाटी फुटली 

घे शिक्षण तु जगभर

लेक तु सावित्रीची शुर

लेक तु सवित्रीची शुर हि कविता सादर करुन प्रेक्षकांचा उत्साह वाढवला


या नंतर शिला सेलुकर यांनी 

-ये भिमराया तुझ्या पासुनी वेला माझे तरा मानवा घे आमुची वंदना हि सुंदर रचना सादर केली.


विश्वास पाटील या नवोदीत कवींनी 

- जागरे पुन्हा भीवा 

तु धाव घे पुन्हा भीवा

हि काव्य रचना सादर केली व प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या .


कवी रुपेश मुनेश्वर यांनी 

- झुकला इथेच माथा चरणी तुझ्याच आलो

बुद्घा तुझ्या पायाने जाण्यास मी निघालो हि कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.


कवि अनिल उमरे यांनी

- निवग क्षणास नेहमी पैशाचे

मुल्य नाही

ओटीत घ्या मनाला हा सुखाचा काळ नाही हि जीवनाचा अर्थ सांगणारी कविता सादर केली.


कवयत्री माया सर्पे यांनी शुभेच्छा देतांना वाढदिवसाच्या मन येते गहीवरुन हि छानशी रचना मांडली.


तर कवि समेंलनाच्या अध्यक्षा प्रा. शुभांगी ठमके यांनी  

- सुंदर सृष्टी, सुंदर मानव, सुंदर जीवन सारा

सद्धम्माच्या प्रजन्यांने बहरून टाकु सारा हि मानवी विचार सांगणारी प्रेरणादायी कविता सादर केली.

या कार्यक्रमात कविंना सावित्रीबाई फुले विचार मंचाच्या अध्यक्षा प्रा. शुंभागी ठमके यांच्या वाढदिवसा प्रसंगी त्यांच्या हस्ते क्रांतीसुर्य जोतीबा पुस्तकाचे वाटप करण्यात आले


या कवि संमेलनाचे उत्कृष्ट असे सुत्र संचालन कवी रुपेश मुनेश्वर यांनी केले

या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती संजय सेलुकर, रमेश नगारे, शालीनी दिलीप धोंगडे, द मुमेंट स्टुडीओचे अजिंक्य आळणे, ललिता कयापाक, काजल संभाजी भरणे, अर्चना ठमके, माधुरी मुनेश्वर, अनिता बनसोड, किशन कयापाक, आश्वत घुले यांची उपस्थिती लाभली  हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकर नगर येथील श्रावस्ती बुद्ध विहार समितिच्या उपासकांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.