Skip to main content

Posts

Showing posts from August, 2024

कवी कट्टा च्या पाऊसधारा कविसंमेलनात बरसल्यास शब्दांच्या सरी..

 नांदेड: _______________________________ • नांदेड जिल्ह्यातून कवींची उपस्थिती. • मान्यवरांनी केले अनमोल असे मार्गदर्शन ________________________________ आज नांदेडमध्ये कवी कट्टा समुहाच्या वतीने पाऊसधारा ऑनलाइन कवी संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रसिद्ध कवयित्री अशा पैठणी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ईसापुर प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे सर प्रसिद्ध कवी शंकर वाडेवाले प्रसिद्ध साहित्यिक पंडित पाटील प्रसिद्ध उद्योजक बालाजी इमितदार तसेच प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर माधव विभुते सर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तर नांदेड जिल्हा उद्घाटकीय कार्यक्रमाचे संचालन माननीय राजश्री विभूते-हिमगिरे यांनी केले तर कवी संमेलनाचा सूत्रसंचालन माननीय रुचिरा बेटकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार कट्टा समूहाचे संचालक अशोक कुबडे यांनी मानले..यावेळी नांदेड आणि परिसरातील अनेक कवी या कवी संमेलनात सहभागी झाले होते.. सदरील कार्यक्रम एमपीएस इंग्लिश स्कूल बाबा नगर नांदेड येथे पार पडला! ________________________________

मराठा सेवा संघाने समाजाला सकारात्मक दिशा दिली..

   मराठा सेवा संघ वर्धापन दिनानिमित्त...  1 सप्टेंबर 1990 रोजी युगपुरुष, एडवोकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी काही निवडक अधिकारी - कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अकोला येथे मराठा सेवा संघ या कर्मचाऱ्यांच्या सामाजिक, वैचारिक संघटनेची स्थापना केली. 1990 साली मराठा समाजाची परिस्थिती पाहता मराठा समाज अनिष्ट चालीरीती रूढी  प्रथा परंपरेमध्ये अडकून पडला होता . अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांडामुळे मराठा समाजात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय मागासले पण आले होते. मराठा समाज  बऱ्याच प्रमाणात व्यसनाधीनतेच्या आहारी गेला होता. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मराठा तरुणांना जातीय - धार्मिक दंगली घडविण्यासाठी वापरत होते . मराठा समाजात कुणबी, कुणबी मराठा, मराठा, पाटील, देशमुख अशा प्रकारचा भेदभाव केला जात होता. हिंदू - मुस्लिम दंगली घडवून आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जात होता. अशा परिस्थितीत युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांना प्रेरणास्थानी माणून, तथागत गौतम बु...

गुरुकुल आश्रम शाळेत कृष्णाष्टमी निमित्त गोपाळकाला घेण्यात आला

किनवट: येथील गुरुकुल आश्रम प्राथमिक शाळेत कृष्ण जन्माष्टमी निमित्त गोपळकाला हा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती सुकले एम.एन,.सहशिक्षिका श्रीमती नेम्मानिवार एस.वाय. श्रीमती दडगेलवार ए.एन.,श्रीमती नेम्मानिवार एस.वाय. श्री.गोडे डि.बी.(सहशिक्षक)श्री. पोंचानिवार आर.ए.(स.शि.)श्री.राठोड ए.जे.,श्री.कुमरे डि.एन. विशाल भंडारे श्रीमती दासरवार ए.आर आदी मान्यवर उपस्थित होते

आदर्श गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने ३१ ऑगस्ट ला सेवानिवृत्त

  जिल्हास्तरीय आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्काराने सन्मानित; (किनवट तालुका प्रतिनिधी )  किनवट तालुक्यातील शैक्षणिक भौतिक तसेच गुणवत्ता वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे विद्यार्थीप्रिय तसेच तालुक्यातील सर्वच शिक्षकांच्या मनामध्ये एक आपुलकीची जागा निर्माण करणारे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष आदर्श गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने हे वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.  नांदेड जिल्हापासून जवळपास १५० किमी असणारा किनवट तालुका हा अतिशय दुर्गम डोंगरी आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो अश्या ठिकाणी बहुदा कर्मचारी अधिकारी नौकरीसाठी येणास तयार नसतात परंतु अश्या परिस्थितीत ज्ञानोबा बने यांची जिल्हा परिषद हायस्कुल चाकूर जिल्हा लातूर येथून अराजपात्रित मुख्याध्यापक पदावरून  पदोन्नती मिळवून गटशिक्षणाधिकारी पंस किनवट म्हणून बढती मिळाली.        मूळचे ढाळेगाव ता.अहमदपूर जि.लातूर चे रहिवाशी असलेले ज्ञानोबा बने यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मूळ गावीच झाले त्यानंतर पदवीचे शिक्षण दयानंद महाविद्यालय लातूर तर बिएड शासकीय महाविद्यालय परभणी येथे झाले.शिक्षण ...

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परीसरात होत असलेल्या कामाची पाहणी

  किनवट- २७ आगस्ट  किनवट शहरात साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ परिसरात सुशोभिकरण कामाची पाहणी करताना मातंग समाज तालुकाध्यक्ष शिवन्ना कलगोटूवार याप्रसंगी ॲड.हरीभाऊ दर्शनवाड,मातंग समाज कोअर कमीटी अध्यक्ष गंगाधर मुकनेपेल्लीवार,काँग्रेसचे माधवराव खेडकर,माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार व पोशराव सावनपेल्लीवार मुंबई आदी उपस्थित होते....!!!

अमन कुंडगीर यांच्या प्रयत्नाला यश; किनवट ते शेगाव बस सुरू किनवट बसस्थानकावरून दररोज सुटेल सकाळी 6 वाजता शेगावसाठी बस

  किनवट : प्रवाशांच्या गैरसोयी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या बसगाड्या सुरू करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन धनगर समाज संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्यचे युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी पद्मश्री मा.खा. डॉ.विकास महात्मे व किनवट माहूर चे आमदार भीमराव केराम तसेच किनवट बस आगार प्रमुखांना देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेऊन किनवट बस आगाराने किनवट ते शेगाव बससेवा सुरू केली आहे. यामुळे शेगावकडे प्रवास करणार्‍या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.     किनवट तालुक्यातील जनतेला धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत होती. किनवट ते शेगाव बस सुरू झाल्याने अनेक धार्मिक स्थळाला भेट देणार्‍या प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. धनगर समाज संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्यचे युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी पद्मश्री मा.खा. डॉ.विकास महात्मे व आमदार भीमराव केराम यांना लेखी निवेदन देवून याबाबत पाठपुरावा करण्यासाठी त्यांना निवेदनाद्वारे कळविले होते. याची तात्काळ दखल घेवून मा.खा. डॉ.विकास महात्मे य...

नीचपुर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराच चव्हाट्यावर.! जिल्हा स्तरिय समिती मार्फत चौकशीची मागणी.!

  किनवट प्रतिनिधी:- सध्या संपूर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या किनवट तालुक्यातील नीचपुर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा नांदेड जिल्हा परिषद कार्यालय समोर मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते, उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील व जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक यांनी उपोषणाला बसत तर काहींनी पाठींबा देत  मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांचा कडे दाद मागितली आहे परंतु आजपर्यंत सदरील प्रकरणी चौकशी होवून योग्य अहवाल प्रसिद्ध करन्यात आलेला नाही आहे.जसे वन विभाग कार्यालय समोर उपोषण कर्त्याचा मृत्यू झाला होता तसा कोणाचा मृत्यू झाल्यावरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाग येईल का.?असा भाबडा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे.न्याय न मिळाल्यास गावातील महिला त्यांचा हातातील बांगड्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांचा दालनात फोडून निषेध व्यक्त करणारं असे आंदोलनातील महिलांनी बोलून दाखवले आहे.   जिल्ह्याचा ठिकाणापासून 150 किमी दूर अंतरावर असलेल्या आदिवासी बहुल किनवट तालुका विकासापासून कायमचं मागास राहिलेला आहे किंबहुना राजकारण्यांचा दबावाने ठेवलेला आहे.जो नाममात्र नि...

खासदार वसंत चव्हाण यांचं निधन; नांदेड जिल्ह्यावर शोककळा

नांदेड:- नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचं निधन झालं आहे. वयाच्या 64 व्या वर्षी वसंत चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला. हैदराबादमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. उपचारांदरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे. वाचा...

अवैध देशी दारू विक्री विरोधात उपोषणास का बसले म्हणून एकाने जिवे मारण्याची धमकी व शिविगाळ दिली*

  (प्रतिनिधी ता. किनवट) मौ.अवैध धंदया विरुद्ध उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर उपोषणास बसले असता एका इसमाने जिवे मारण्याची धमकी व शिवागीळ केली सदरील सविस्तर वृत्त असे की मौजे कमठाला येथील   अवैध धंदे व अवैध दारू विक्री विरोधात आकाश व्यंकट तिरमले, मारोती विठ्ठल मन्ने, शिवम पांडुरंग कऱ्हाळे, सुनिल देवराव उईके, उमेश नारायण भोयर, मारोती एकनाथ देवकते या नवयुवक तरुणांनी मिळून कमठाला येथील अवैध दारू विक्री विरोधात उपविभागीय अधिकारी कार्यालय समोर अमरण उपोषणास बसले होते. त्या मधील फिर्यादी उपोषणकर्ते मारोती देवकते यांना आरोपी किसन प्रसराम भरकड यांनी आमच्या विरोधात उपोषणास बसता का म्हणून अश्लील शिवागिळ करत अंगावर विळा घेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला त्यामुळे उपोषण कर्त्यांनी जिवित्वास धोका आहे म्हणून किनवट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली या प्रकरणी किनवट ठाणे अमलदार हे तपास करीत आहेत.

प्रेषीत मोहम्मद पैगबंर यांच्या बद्दल आपत्तीजनक वक्तव्य केल्या बद्दल रामगीरी गंगातीरी महाराज यांच्यावर कायदेशीर कारवाई करा- टिपु सुलतान ब्रिगेड

  किनवट तालुका प्रतिनिधी:- रामगीरी महाराज यांनी मौजे पंचाळे ता. सिन्नर जि. नाशिक येथील अखंड हरीनाम सप्ताह कार्यक्रमात लाईव्ह प्रक्षेपण असतांना मुस्लीम धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेले मोहम्मद पैगंबर यांच्या बद्दल आक्षेपार्ह तसेच आपत्ती जनक वक्तव्य केल्या बद्दल मुस्लीम धर्मीयांच्या भावना दुखावल्या बद्दल यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी किनवट टिपु सुलतान ब्रिगेड यांच्या वतीने करण्यात आली आहे रामगीरी महाराज यांनी मो. पैगंबर हे पन्नासाव्या वर्षी सहा वर्षीय मुली सोबत विवाह केला असा आरोप त्यांनी केला तसेच इथेच न थांबता स्त्रिया वरती जे अत्याचार होतात त्यांचे आदर्शच अत्याचारी होते दहा हजार मुस्लीमा मध्ये शंभर हिंदु सुरक्षीत नाहीत असे सामाजिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य रामगिरी महाराज यांनी केले त्या बद्दल पोलीस प्रशासनाने कठोर पाऊले उचलावीत असे किनवट येथील दिलेल्या उपविभागिय अधिकारी कार्यालयास सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे या निवेदनावर टिपु सुलतान बिग्रेड जिल्हाध्यक्ष सय्यद नदिम , तालुका उपाध्यक्ष शेख जुबेर, राजेंद्र विठ्ठलराव शेळके, अज्जु शेख, अकनीर खान, अमीर ...

गुरुकुल आश्रम प्राथमिक शाळेत रक्षाबंधन साजरा

किनवट ता. बातमीदार: शिक्षणा सोबत सामजिक बांधिलकी जपली जावी म्हणून भाऊ बहीणीचे अतुट नाते सांगणारा सण रक्षाबंधन गुरुकुल आश्रम प्राथमिक शाळा रामनगर किनवट येथे नुकताच साजरा करण्यात आला . यावेळी मुलींनी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राखी बांधली व तोंड गोड केले. यावेळी मुख्याध्यापिका श्रीमती सुकले एम.एन,.सहशिक्षिका श्रीमती नेम्मानिवार एस.वाय. श्रीमती दडगेलवार ए.एन.,श्रीमती नेम्मानिवार एस.वाय. श्री.गोडे डि.बी.(सहशिक्षक)श्री. पोंचानिवार आर.ए.(स.शि.)श्री.राठोड ए.जे.,श्री.कुमरे डि.एन. विशाल भंडारे श्रीमती दासरवार ए.आर आदी शिक्षक वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा नियोजित जागी बसवण्यात यावा यासाठी आमरण उपोषण

किनवट तालुका बातमीदार: ता.२०  छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित स्थळी लवकरात लवकर बसवण्यात यावा यासाठी नगरपालिका किनवट समोर गजानन पाटील कोल्हे मा. उपसभापती पंचायत समिती किनवट, श्याम मगर पाटील, चंद्रकांत साळवे पाटील आमरण उपोषणास बसलेले आहेत . उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वैजनाथ करपुडे पाटील व गजानन कोल्हे पाटील यांच्या हस्ते अभिवादन करून करण्यात आली. तरी किनवट तालुक्यातील सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनुयायांना नम्र विनंती आहे आपण या मागणी संदर्भात सहकार्य करावे.

किनवट काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची घोषणा

  किनवट : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या किनवट तालुकाध्यक्षपदी के. सूर्यकांतरेड्डी माधवरेड्डी यांची फेरनिवड तर किनवट शहराध्यक्षपदी गिरीश नेम्मानीवार यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी वरील नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह असून, लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा व स्थानिक निवडणुकांतही महाविकास आघाडीला यश मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही शहराध्यक्ष गिरीश नेम्मानीवार यांनी नियुक्तीनंतर दिली.

आज देशभरातील सर्व दवाखाने राहणार बंद; आयएमएचे निषेध आंदोलन

  मुंबई : कोलकात्यात आरजी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे संपूर्ण देश हादरला आहे. या घटनेच्या निषेधार्थ   इंडियन मेडिकल असोसिएशनने(IMA) 17 ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच आयएमएने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे देशातील वैद्यकीय सेवेवर याचा मोठा परिणाम दिसून येणार आहे. तसेच आजपासून  देशभरातील डॉक्टरांकडून आंदोलन तीव्र करण्याचे संकेत देण्यात आले आहे.   आयएमएने एक पत्रक काढून 17 ऑगस्ट रोजी बंद पुकारण्यात येत असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे  सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा  17 ऑगस्ट सकाळी 6 ते 18 ऑगस्ट सकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. तब्बल 24 तास सेवा बंद राहणार आहे. या दरम्यान अत्यावश्यत  सेवा सुरू राहणार आहे. आयसीयू, अपघात विभाग आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे. अत्यावश्यक आरोग्य सेवा, अतिदक्षता कक्ष, सीसीयू, अत्यावश्यक शस्रक्रिया सुरु राहणार आहेत. शनिवारी सकाळी 6 ते र...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...

गोकुंदा येथील महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयात हर घर तिरंगा अभियान

गोकुंदा/ प्रतिनिधी: दिनांक 14 महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा येथे हरघर तिरंगा अभियानांतर्गत मुख्याध्यापक तथा प्राचार्य अंबादास जुनगरे यांच्या हस्ते तिरंगी झेंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळेस प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक रवी भालेराव मातोश्री कमलताई ठमके कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा येथील प्राचार्या स्वाती बनसोडे मॅडम, विद्यालयाचे उपप्राचार्य राधेश्याम जाधव, पर्यवेक्षक प्रा.रघुनाथ इंगळे, प्रा.संतोष बैसठाकूर तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी हे बहुसंख्येने उपस्थित होते. (छाया- वी. जी. फोटोग्राफी गोकुंदा)

तुलसीदास जयंतीचे औचित्य साधून वृक्षारोपण

  किनवट (तालुका प्रतिनिधी )पर्यावरणाचे संवर्धन म्हणजे धर्माचे पालन हा उदात हेतू ठेऊन आज 11 ऑगस्ट आदरणीय संत श्री नारायण महाराज माधापूरकर तेलंगणा यांचे शिवसंकल्प व मार्गदर्शनानुसार संत श्री गोस्वामी तुलसीदास जयंतीचे औचित्य साधून मारेगाव खालचे  वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी ओमकार शिंदे, अजय पवार ,विठ्ठल शिंदे, शिदेश्वर नरवाडे ,सुशील शिंदे इत्यादी धर्म संरक्षक मित्र मंडळ उपस्थित होते.. या अद्वितीय कार्यक्रमाची सर्वच स्तरातून स्तुती तथा अभिनंदन करण्यात येत आहे..

लिंगी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहत

( ता. प्रतिनिधी किनवट / लिंगी)  दि.१० आगस्ट २०२४ रोजी किनवट तालुक्यातील लिंगी येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची १०४ वी जयंती साजरी करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांचे तैलचित्राला पुष्पहार अर्पन करुन अभिवादन करताना मातंग समाज कोर कमीटी अध्यक्ष गंगाधर मुकनपेल्लीवार याप्रसंगी माजी नगरसेवक लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,कपिल कोवे,शंकर कुंटलवार,देवन्ना पालेवार,तुकाराम कुंटलवार,अशोक कोरटवार,सुखदेव पेधिटीवार,हनमलु कुंटलवार,रवि दिसलवार,नरेश पेंटावार,राजु दिसलवार,आशन्ना कुंटलवार,अशोक वानखेडे,पंजु दिसलवार,अमोल कुंटलवार व देवन्ना कुंटलवार आदी उपस्थित होते..!

जागतिक आदिवासी दिन तथा ॲड. केराम यांच्या वाढदिवसानिमत्त शालेय साहित्य वाटप

किनवट, ता. ९ (बातमीदार) : जागतिक आदिवासी दिन आणि युवा नेते ॲड. प्रतिक भीमराव केराम यांच्या वाढदिवसानिमत्त एज्यू‘ट्री’च्या विद्यार्थ्यांना संतोष मरस्कोल्हे मित्रमंडळ यांच्या वतिने शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिर्वाद वासरके, प्रमुख उपस्थिती संदेश भीमराव केराम प्रमुख पाहुणे माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, संतोष मरस्कोल्हे, प्रा. सुशिल कदम, गजानन मादेवार,  राजश्री अंकमवार, नारायन चव्हाण, राजु दिसेवार, पल्लवी मोदुकवार, ऋतुजा ताटे, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थीत होते. *शालेय साहित्य विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी* आजकाल मित्र- मैत्रिनींचा वाढदिवस साजरा करण्याची तरुणाईमध्ये प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. हॉटेल, रिसोर्ट, चौक, घरी आणि गावाच्या पारावर वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करताना तरुणाई दिसत आहे. परंतु, हा अनावश्यक खर्च टाळून तरुण सामाजिक कार्यकर्ते संतोष मरस्कोल्हे व त्यांच्या मित्रांनी एकत्र येवून युवा नेते ॲड. प्रतीक भीमराव केराम या जिवलग मित्राच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला. एज्यू‘ट्री’ शैक्षणिक केंद...

तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा पार पडली

(किनवट ता. प्र.)  क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्राचे पुणे अंतर्गत. नांदेड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने.तालुकास्तर कुस्ती क्रीडा स्पर्धेचा आयोजन केले होते त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले मुकुंद तिरमनवार सर व प्रमुख पाहुणे संदीप येशीमोड तालुका क्रीडा संयोजक किनवट  व शिंदे सर, आनंतवार सर ,तांदळे सर ,जाधव सर व या स्पर्धेसाठी प्रमुख पंच म्हणून लाभलेले सूर्यवंशी एम एस सर व ज्ञानेश्वर चटलेवाड सर व प्रमुख मार्गदर्शक जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेबंरे सर व व तालुका क्रीडा अधिकारी शिवकांता देशमुखे मॅडम आज पार पडलेल्या तालुका स्तर कुस्ती क्रीडा स्पर्धेत 1) साई ज्ञानेश्वर चटलावाड वजन गट 48 किलो प्रथम  व 2) विठ्ठल बालाजी काळे वजन गट 44 किलो  प्रथम   वजन गट 57 किलो प्रथम तपनकुमार शिंदे 17 मुली  1.वजन गट 57 kg मध्ये कू. राठोड सुप्रिया अरविंद तालुका स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. 2.वजन गट 49 मध्ये कू. वैष्णवी संजय राठोड हिने प्रथम क्रमांक पटकावला आहे. 3.वजन गट 61kg. मध्ये कू.जाधव सपना नारायण हिने प्रथम क्रमांक ...

प्रा. शिवदास बोकडे राज्यशास्त्र विषयात सेट उत्तीर्ण

किनवट ता. प्रतिनिधी;- बळीराम पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मुक्त विद्यापीठाचे केंद्र संयोजक प्रा. शिवदास बोकडे हे राज्यशास्त्र विषयात नुकत्याच संपन्न झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्यावतीने घेण्यात आलेल्या  राज्य पात्रता परीक्षेत यश संपादन केले आहे. सेट या महत्त्वाच्या परीक्षेत यश मिळविल्याने किनवट आणि किनवट परिसरात त्यांचे कौतूक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल किनवट शिक्षण संस्था किनवट चे अध्यक्ष मा.प्रफुल राठोड, सचिव शंकरराव चाडावार, उपाध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार, उपाध्यक्ष नारायणराव सिडाम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.के. बेंबरेकर, प्रा. राजकुमार नेम्मानिवार,डॉ.आनंद भालेराव, पर्यवेक्षक प्रा. अनिल पाटील, प्रा. किशन मिराशे, प्रा.विजय खूपसे, प्रा. ममता जोनपेल्लीवार, डॉ. प्रज्ञा घोडवाडीकर,डॉ. योगेश सोमवंशी,डॉ. गजानन वानखेडे, प्रा. आम्रपाली हाटकर, प्रा मंदाकिनी राठोड, डॉ. लता पेंडलवाड, प्रा. पुरुषोत्तम येरडलावार, प्रा. डि. टी. चाटे, श्री रेणुका देवी महाविद्यालय माहूरचे प्राचार्य डॉ. टी.एम गुरणुले,डॉ. लोणे, ycm चे केंद्र संयोजक प्रा. बाबासाहेब राठोड, प्रा...