Skip to main content

मराठा सेवा संघाने समाजाला सकारात्मक दिशा दिली..

 


 मराठा सेवा संघ वर्धापन दिनानिमित्त...

 1 सप्टेंबर 1990 रोजी युगपुरुष, एडवोकेट पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी काही निवडक अधिकारी - कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अकोला येथे मराठा सेवा संघ या कर्मचाऱ्यांच्या सामाजिक, वैचारिक संघटनेची स्थापना केली. 1990 साली मराठा समाजाची परिस्थिती पाहता मराठा समाज अनिष्ट चालीरीती रूढी  प्रथा परंपरेमध्ये अडकून पडला होता . अज्ञान, अंधश्रद्धा, कर्मकांडामुळे मराठा समाजात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय मागासले पण आले होते. मराठा समाज  बऱ्याच प्रमाणात व्यसनाधीनतेच्या आहारी गेला होता. प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते आपला राजकीय स्वार्थ साधण्यासाठी मराठा तरुणांना जातीय - धार्मिक दंगली घडविण्यासाठी वापरत होते . मराठा समाजात कुणबी, कुणबी मराठा, मराठा, पाटील, देशमुख अशा प्रकारचा भेदभाव केला जात होता. हिंदू - मुस्लिम दंगली घडवून आणण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जात होता. अशा परिस्थितीत युगपुरुष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता, राजमाता जिजाऊ यांना प्रेरणास्थानी माणून, तथागत गौतम बुद्ध, वर्धमान महावीर, बळीराजा, संत चार्वाक, महात्मा बसवेश्वर, चक्रधर स्वामी, वारकरी संप्रदायातील संत नामदेव महाराज पासून ते संत तुकाराम महाराजां पर्यंत सर्व संत तसेच संत कबीर, संत रविदास , छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले , आरक्षणाचे जनक छत्रपती शाहूजी महाराज, विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांसारख्या महामानवांच्या समतावादी, मानवतावादी, विज्ञानवादी विचारावर आधारित समाज व्यवस्था निर्माण करण्यासाठी मराठा सेवा संघ या वैचारिक संघटनेची स्थापना केली. राजमाता जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेड राजा येथे 1993 पासून मोठ्या उत्साहात जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात येऊ लागला. या ठिकाणी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून लाखो समाज बांधव जिजामातेस अभिवादन करण्यासाठी येऊ लागले. हजारो पुस्तकांचे स्टॉल लागू लागले. मराठा समाज बांधव लाखो रुपयांच्या पुस्तकांची खरेदी विक्री लागले . पुस्तके वाचून मराठा समाजातील तरुणांचे मन, मनगट, मेंदू, मनका  सशक्त होऊ लागले. ऍड.पुरुषोत्तमजी खेडेकर साहेब, डॉ. आ.ह.साळुंखे सर, प्रा. मा.म. देशमुख सर, प्रा.जेमिनी कडू सर , चंद्रशेखर शिखरे सर, गंगाधर बनबरे, श्रीमंत कोकाटे, प्रदीप दादा साळुंखे , डॉ. बालाजी जाधव, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे, ह.भ.प.मधुकर महाराज बारूळकर, मनोरंजनातून प्रबोधन करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व गाडगेबाबा यांचा वैचारिक वारसा चालविणारे सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज व त्यांचे शिष्य संदीप पाल महाराज, शिवशाहीर राजेंद्र खुडुसकर, शिवशाहीर भगवान गावंडे यांसारख्या लेखक ,वक्ते व प्रबोधनकारांच्या माध्यमातून बहुजन महामानवांचा खरा इतिहास तुमच्या आमच्या पर्यंत पोहोचला. मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या तारखेचा वाद मिटला. 


जगभरात १९ फेब्रुवारी या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येऊ लागली. जय जिजाऊ जय शिवराय म्हणून मराठा समाज बांधव एकमेकास अभिवादन करू लागले. 1996 पासून 19 तारखेस शिवनेरीवर शिवजन्मोत्सव  व 6 जून रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येऊ लागला. मराठा समाजातील तरुणांना सकारात्मक दिशा देण्यासाठी संभाजी ब्रिगेड ही संघटना स्थापन केली. सामाजिक कार्यात महिलांचा सहभाग असावा यासाठी जिजाऊ ब्रिगेड ही महिलांची संघटना स्थापन केली. विद्यार्थ्यांसाठी वीर भगतसिंग ही संघटना स्थापन केली. पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद, राजर्षी शाहू महाराज शिक्षण परिषद, पद्मश्री  विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद, तानुबाई बिरजे पत्रकार परिषद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व्यसनमुक्ती कक्ष , राष्ट्रसंत गाडगेबाबा प्रबोधन कक्ष  यासारख्या 33 कक्षाच्या माध्यमातून समाजाला गतिशील करण्याचे काम मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष युगपुरुष पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी केले आहे. मराठा समाजास विकसित करायचे असेल तर पुढील पाच सत्ता आपल्या ताब्यात असल्या पाहिजे असे मराठा सेवा संघाचे मत आहे. पहिली शिक्षण सत्ता आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर त्यांनी आपल्या हातात ढाल तलवार देण्याच्या ऐवजी पेन आणि पुस्तक दिले असते. गड किल्ले जिंकण्याच्या आणि बांधण्याच्या ऐवजी एमपीएससी, यूपीएससी स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केली असती. इंजीनियरिंग, मेडिकल, आयआयटी, आय आय एम सारख्या संस्था उभारल्या असत्या. आज शैक्षणिक संस्था आपल्या आहेत शिकवणारे शिक्षक आपले आहेत शिकणारी विद्यार्थी आपले आहेत पण त्यांना शिकविला जाणारा अभ्यासक्रम हा सदाशिव पेठेतील आहे. त्यामुळे बहुजन समाजातील विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होईल अशा स्वरूपांचा अभ्यासक्रम असावा. त्यासाठी अभ्यासक्रम नियोजन मंडळात आपल्या बहुजनांचे विचारवंत, शिक्षण तज्ञ  असावेत. प्रशासनात मोठ्या पदावर मराठा समाजातील तरुण असावेत. यासाठी शिक्षण सत्ता ही आपल्या हातात पाहिजे. दुसरी सत्ता ही राजसत्ता आहे. सर्वच लोक म्हणतात आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रात मंत्री हे मराठा समाजातील आहेत. मराठा समाजाच्या हातात सत्ता आहे. खरेच असे असते तर आज 2024 साली गरजवंत मराठा समाजास ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मागण्याची वेळ आली नसती. १९९४ सालीच मराठा समाजास आरक्षण मिळाले असते. पण तसे झाले नाही याचा अर्थ हे सर्व आमदार खासदार मंत्री हे पक्षाचे आहेत गोरगरीब मराठा समाजाचे नाहीत. त्यामुळे गोरगरीब समाजातून ज्याच्याकडे सामाजिक दायित्वाची भावना आहे, सर्व समाजाच्या, राष्ट्राच्या हिताचे निर्णय घेऊ शकतो, शेतकऱ्यांचे प्रश्न सोडू शकतो ,माता भगिनींच्या इज्जतींचे संरक्षण करू शकतो, तरुणांना मोठ्या प्रमाणात रोजगार देऊ शकतो  , जातीय - धार्मिक सलोखा निर्माण करून  राष्ट्रीय एकात्मता निर्माण करू शकतो अशा व्यक्तींनाच सत्तेमध्ये पाठवले पाहिजे. त्यामुळे सामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेले सामान्यातून नेतृत्व निर्माण झाले पाहिजे ही मराठा सेवा संघाची भूमिका आहे. तिसरी सत्ता ही अर्थसत्ता आहे. अर्थाशिवाय आपल्या जीवनाला अर्थ नाही. त्यामुळे बुटाच्या पॉलीस पासून तर डोक्याच्या मालिश पर्यंत हाताला मिळेल ते काम मराठा तरुणांनी केले पाहिजे. गाव सोडून शहराकडे गेलो पाहिजे. शिक्षण - व्यवसाय - नोकरीसाठी देश विदेशात गेलो पाहिजे. शेतात काय पिकते यापेक्षा बाजारात काय विकते यानुसार आपण उत्पादन केले पाहिजे हे विचार मराठा सेवा संघाने दिले. आज किती उद्योग - व्यवसायात मराठा समाज बांधव आहेत त्याचा विचार करावा. काही मूठभर मराठा समाज बांधवांकडे  कारखाने आहेत म्हणून सर्व मराठा समाज श्रीमंत होत नाही. गरिबीत जन्म घेणे हा गुन्हा नाही पण गरिबीत मरणे हा मात्र गुन्हा आहे असे खेडेकर साहेब म्हणतात. चौथी सत्ता आहे ती धर्मसत्ता. पूजा पाठ होम हवन उपवास यज्ञ यात गुरफुटून न बसता प्रयत्नवादी झालो पाहिजे. आपली श्रद्धा असेल तर मध्यस्थ्याशिवाय आपण स्वतः पूजा अर्चा करू शकतो. समतेवर आधारित शिवधर्माची स्थापना करण्यात आली. शिवधर्मानुसार आपण आपले विधी संपन्न केले पाहिजे. असे केल्यास लाखो करोडो रुपयांची मराठा समाजाची बचत होईल. हा विचार मराठा सेवा संघाने दिला. पाचवी सत्ता आहे ती प्रचार प्रसार माध्यमांची. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया मराठा समाजाकडे असावा . मनुवाद्याकडे असलेल्या प्रचारप्रसार माध्यमातून राईचा पर्वत करतात आणि पर्वताची राई करतात. आपली विचारधारा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचार प्रसार माध्यमे ही आपल्याकडे असले पाहिजे. आपल्याला सामाजिक सांस्कृतिक बदल घडवून आणायचा असेल तर या पाच सत्ता आपल्याकडे असाव्यात अशी मराठा सेवा संघाची भूमिका आहे. महापुरुषांच्या जयंतीनिमित्त डीजेच्या तालावर नाचण्यापेक्षा वैचारिक प्रबोधन पर कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड मुळेच केले जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा लढा हा मुस्लिम धर्माच्या विरोधात नसून अन्याय अत्याचाराच्या विरोधात न्याय समता प्रस्थापित करण्यासाठीचा होता. छत्रपती शिवरायांच्या मावळ्यात अंगरक्षक सिद्धी इब्राहिम, वकील काझी हैदर, आरमाराचा सुभेदार दर्यासारंग, आरमार प्रमुख दौलत खान ,तोफखाना प्रमुख इब्राहिम खान, अफजल खान भेटीच्या वेळी वाघ नखे तयार करून देणारा रणदुल्ला खानचा मुलगा रुस्तुमे जमान, आग्रा भेटीच्या वेळी आपल्या जीवाची परवा न करता छत्रपती शिवाजी महाराजांची सुटका करण्यासाठी मदत करणारा मदारी मेहतर , छत्रपती शिवाजी महाराजांचे 1668 साली चित्र काढणारा मीर महंमद हे  मुस्लिम मावळे होते हा खरा इतिहास जगासमोर आणला. शेतकऱ्यांच्या पिकाचे रक्षण, माता भगिनीच्या इज्जतीचे संरक्षण भिन्न जाती धर्मीयांचा आदर ही छत्रपती शिवरायांची त्रिसूत्री होती. तसेच बहुजन महामानवांच्या विचारांची पेरणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचे हजारो लेखक, वक्ते प्रबोधन पर कार्यक्रमाच्या माध्यमातून करू लागले. त्यामुळे सामाजिक सलोखा निर्माण करण्यास मदत झाली. आज मराठा हा कुणबी मराठा असल्याने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन सुरू आहे . या मागणीची मूळ सुरुवात मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तमजी खेडेकर साहेबांनी 1990 पासून केली होती. त्यासाठी आंदोलने केली, निवेदने दिली. मराठा समाजातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सामाजिक व राष्ट्रीयत्वाची भावना जोपासत समाज व राष्ट्र विकासासाठी पाठीमागे वळून बघितले पाहिजे. समाजाला व राष्ट्राला सकारात्मक व विधायक दिशा देण्याचं काम करावे. तसेच समाज व राष्ट्रसमोरील ज्या समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नरत असावे. संततीसाठी संपत्ती मिळवण्यापेक्षा संपत्ती निर्माण करणारी सुसंस्कारित संतती घडवावी. तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत. पर्यावरणाचा समतोल टिकून ठेवण्यासाठी वृक्ष लागवड करून त्याचे संरक्षण संवर्धन करावे. जातीय - धार्मिक सलोखा निर्माण करून दंगल मुक्त देश करावा. बहुजन महामानवांच्या विचाराने बहुजन समाजाला जोडण्याचे काम करावे. ही विचारधारा मराठा सेवा संघाची असल्याने आपण सर्व एकत्र येऊन समृद्ध आणि संपन्न भारत निर्माण करण्याचा प्रयत्न करूया.


 दगडू भरकड तालुका अध्यक्ष मराठा सेवा संघ किनवट जि. नांदेड

मो. क्र. 9623670212

Comments

Popular posts from this blog

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रकार संघाचे माजी ता

.. महाराष्ट्रातील निवडणुका बॅलेट पेपरवर होणार; निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांची माहिती

 महाराष्ट्र:- देशातील लोकसभा निवडणूक 2024 चा कार्यक्रम केंद्रीय निवडणूक आयोगाद्वारे जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे या कालावधीत एकूण पाच टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता शनिवारपासून लागू झाली आहे. महाराष्ट्रात यंदाची निवडणूक विविध मुद्द्यांनी गाजणार आहे. यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांना आपली ताकद दाखवून देण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्व ४८ मतदारसंघांत समाजातील तरुणांनी शेकडो उमेदवारी अर्ज दाखल करावेत, असं आवाहन केलं आहे. उमेदवारांची संख्या प्रचंड प्रमाणात असेल तर ईव्हीएमवर निवडणुका घेणं कठीण होणार आहे. अशातच आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ईव्हीएमच्या क्षमतेबाबत माहिती दिली आहे. ईव्हीएमसंदर्भात विचारण्यात आलेल्या प्रश्नावर बोलताना एस. चोक्कलिंगम म्हणाले की, "एका मतदारसंघात ४०० उमेदवारांहून अधिक उमेदवारांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केल्यास आपल्याला बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी ला