किनवट : भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या किनवट
तालुकाध्यक्षपदी के. सूर्यकांतरेड्डी माधवरेड्डी यांची फेरनिवड तर किनवट शहराध्यक्षपदी गिरीश नेम्मानीवार यांची नियुक्ती करण्यात आली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम यांनी वरील नियुक्ती केली आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या यशामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह असून, लोकसभेप्रमाणेच आगामी विधानसभा व स्थानिक निवडणुकांतही महाविकास आघाडीला यश मिळण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही शहराध्यक्ष गिरीश नेम्मानीवार यांनी नियुक्तीनंतर दिली.
Comments
Post a Comment