Skip to main content

नीचपुर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराच चव्हाट्यावर.! जिल्हा स्तरिय समिती मार्फत चौकशीची मागणी.!

 


किनवट प्रतिनिधी:- सध्या संपूर्ण जिल्ह्यात गाजत असलेल्या किनवट तालुक्यातील नीचपुर ग्रामपंचायत मधील भ्रष्टाचाराचा मुद्दा नांदेड जिल्हा परिषद कार्यालय समोर मागील 8 दिवसांपासून सुरू असलेल्या गावातील सामाजिक कार्यकर्ते, उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील व जिल्ह्यातील प्रतिष्ठित नागरिक यांनी उपोषणाला बसत तर काहींनी पाठींबा देत  मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांचा कडे दाद मागितली आहे परंतु आजपर्यंत सदरील प्रकरणी चौकशी होवून योग्य अहवाल प्रसिद्ध करन्यात आलेला नाही आहे.जसे वन विभाग कार्यालय समोर उपोषण कर्त्याचा मृत्यू झाला होता तसा कोणाचा मृत्यू झाल्यावरच मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जाग येईल का.?असा भाबडा प्रश्न जनतेत चर्चिला जात आहे.न्याय न मिळाल्यास गावातील महिला त्यांचा हातातील बांगड्या मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम यांचा दालनात फोडून निषेध व्यक्त करणारं असे आंदोलनातील महिलांनी बोलून दाखवले आहे.

  जिल्ह्याचा ठिकाणापासून 150 किमी दूर अंतरावर असलेल्या आदिवासी बहुल किनवट तालुका विकासापासून कायमचं मागास राहिलेला आहे किंबहुना राजकारण्यांचा दबावाने ठेवलेला आहे.जो नाममात्र निधी गावाचा विकास कामांसाठी येतो त्यातही 70 टक्के निधी भ्रष्टाचार करून लाटला जातो आणि उर्वरित 30 टक्के निधीत कामाचा दर्जा ढासळतो.आणि या दर्जाहीन कामावर आम्हीच विकास केला असा तोरा मिरवला जातो आहे.

  तालुक्यातील नीचपुर ग्रामपंचायत अंतर्गत भ्रष्टाचार झाला असा आरोप करत गावातील सामाजिक कार्यकर्ते, उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य दोन तीन महिन्यापूर्वी पंचायत समिती कार्यालय किनवट समोर आमरण उपोषणाला बसले होते.तेव्हा गट विकास अधिकारी यांनी ग्रामसेवकला तात्काळ माहिती देण्यास लावत चौकशी करण्याचे म्हंटले होते.परंतु सदरील प्रकरणी चौकशी आजपर्यंत कोणीही केली नसल्याने आणि ग्रामसेवकांने अपूर्ण माहिती देत ग्रामस्थांची दिशाभूल केल्याने सदरील भ्रष्टाचाराचा चौकशीचा मागणी साठी गावातील सामाजिक कार्यकर्ते,उप सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांनी मागील 8 दिवसांपासून जिल्हा परिषद कार्यालय नांदेड समोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.सदरील माहिती दिलेल्या बँक स्टेटमेंट मधे चेक हा व्यक्तिशः देता येत नसतानाही कोणत्याही एजन्सीला चेक न देता गावातील महेश्वर मुंढे या नावाने चेक नंबर 998925 प्रमाणे 7 लक्ष,चेक नंबर 998931 प्रमाणे 5 लक्ष 38 हजार,चेक नंबर 998948 प्रमाणे 2 लक्ष 50 हजार,रामदास राठोड चेक नंबर 998937 प्रमाणे 5 लक्ष,चेक नंबर 998942 प्रमाणे 4 लक्ष,चेक नंबर 998950 प्रमाणे 2 लक्ष 74 हजार,चेक नंबर 998951 प्रमाणे 2 लक्ष 80 हजार,रामेश्वर विनायक चेक नंबर 998952 प्रमाणे 2 लक्ष 75 हजार,विजय मंगु राठोड चेक नंबर 998953 प्रमाणे 60 हजार,चेक नंबर 998947 प्रमाणे 

1 लक्ष 60 हजार, वैजनाथ रघुनाथ मुंढे चेक नंबर 998949 प्रमाणे 3 लक्ष 49 हजार,अमोल मच्छिंद्र चेक नंबर 998943 प्रमाणे 4 लक्ष,चेक नंबर 998934 प्रमाणे 5 लक्ष,चेक नंबर 998928 प्रमाणे 5 लक्ष,गजानन मच्छिंद्र 998927 प्रमाणे 10 लक्ष,चेक नंबर 998930 प्रमाणे 5 लक्ष 38 हजार,शिवकुमार रामा मुंढे 998936 प्रमाणे 4 लक्ष 35 हजार,मारोती दत्ता मुंढे चेक नंबर 998923 प्रमाणे 5 लक्ष आणि ग्रामसेवक राठोड व गट विकास अधिकारी यांचा संयुक्त खात्यातून   स्वतः दिनांक 04/11/2023 रोजी एकाच दिवशी उचल झालेली रक्कम चेक नंबर 998938 प्रमाणे 1 लक्ष 35 हजार,चेक नंबर 998939 प्रमाणे 3 लक्ष, चेक नंबर 998940 प्रमाणे 5 लक्ष, चेक नंबर 998941 प्रमाणे 5 लक्ष, चेक नंबर 998944 प्रमाणे 1 लक्ष 56 हजार रुपयांचा चेक इतरही काही चेक खाजगी व्यक्तींचा नावाने उचल करण्यात आलेले आहेत. या सर्वच खाजगी व्यक्तींचा नावाने आमचा गावाचा विकासाचा निधी उचलून भ्रष्टाचार केला असल्याचे उपोषण कर्त्यानी बँक स्टेटमेंटचा प्रति देत बोलून दाखवले आहे.सदरील प्रकरणी जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यानं मार्फत आमचा समक्ष चौकशी न झाल्यास विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद समोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी बोलून दाखवले.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...