Skip to main content

अमन कुंडगीर यांच्या प्रयत्नाला यश; किनवट ते शेगाव बस सुरू किनवट बसस्थानकावरून दररोज सुटेल सकाळी 6 वाजता शेगावसाठी बस

 


किनवट : प्रवाशांच्या गैरसोयी लक्षात घेता प्रवाशांच्या सोयीसाठी लांब पल्ल्याच्या बसगाड्या सुरू करण्यात याव्यात या मागणीचे निवेदन धनगर समाज संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्यचे युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी पद्मश्री मा.खा. डॉ.विकास महात्मे व किनवट माहूर चे आमदार भीमराव केराम तसेच किनवट बस आगार प्रमुखांना देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेऊन किनवट बस आगाराने किनवट ते शेगाव बससेवा सुरू केली आहे. यामुळे शेगावकडे प्रवास करणार्‍या प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे. 


   किनवट तालुक्यातील जनतेला धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांची अत्यंत गैरसोय होत होती. किनवट ते शेगाव बस सुरू झाल्याने अनेक धार्मिक स्थळाला भेट देणार्‍या प्रवाशांची गैरसोय दूर झाली आहे. धनगर समाज संघर्ष समिती, महाराष्ट्र राज्यचे युवक प्रदेशाध्यक्ष अमन कुंडगीर यांनी पद्मश्री मा.खा. डॉ.विकास महात्मे व आमदार भीमराव केराम यांना लेखी निवेदन देवून याबाबत पाठपुरावा करण्यासाठी त्यांना निवेदनाद्वारे कळविले होते. याची तात्काळ दखल घेवून मा.खा. डॉ.विकास महात्मे यांनी आगाराच्या वरिष्ठांना कळवून लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करण्याच्या सूचना दिल्या. तसेच किनवट वरुन नांदेड साठी सायंकाळ च्या वेळेत एक किनवट नांदेड अशी बस चालू करण्याची मागणी केली आहे.सायंकाळ ची अदिलाबाद पुर्णा ही रेल्वेगाडी गेल्या नंतर कोणते ही साधन नांदेड येथे जाण्यासाठी उपलब्ध नाही.ती पण लवकर चालू करू अशी ग्वाही किनवट बस आगार प्रमुखांनी दिली आहे. किनवट ते शेगाव ही लांब पल्ल्याची बस सेवा सुरू झाल्याने अमन कुंडगीर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री गिरीष महाजन, मा.खा.डॉ.विकास महात्मे व आमदार भीमराव केराम यांचे आभार व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...