Skip to main content

आदर्श गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने ३१ ऑगस्ट ला सेवानिवृत्त

 


जिल्हास्तरीय आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्काराने सन्मानित;


(किनवट तालुका प्रतिनिधी )


 किनवट तालुक्यातील शैक्षणिक भौतिक तसेच गुणवत्ता वाढीसाठी अहोरात्र प्रयत्न करणारे विद्यार्थीप्रिय तसेच तालुक्यातील सर्वच शिक्षकांच्या मनामध्ये एक आपुलकीची जागा निर्माण करणारे कार्यतत्पर कर्तव्यदक्ष आदर्श गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने हे वयोमानानुसार ३१ ऑगस्ट २०२४ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.

 नांदेड जिल्हापासून जवळपास १५० किमी असणारा किनवट तालुका हा अतिशय दुर्गम डोंगरी आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो अश्या ठिकाणी बहुदा कर्मचारी अधिकारी नौकरीसाठी येणास तयार नसतात परंतु अश्या परिस्थितीत ज्ञानोबा बने यांची जिल्हा परिषद हायस्कुल चाकूर जिल्हा लातूर येथून अराजपात्रित मुख्याध्यापक पदावरून  पदोन्नती मिळवून गटशिक्षणाधिकारी पंस किनवट म्हणून बढती मिळाली.

       मूळचे ढाळेगाव ता.अहमदपूर जि.लातूर चे रहिवाशी असलेले ज्ञानोबा बने यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मूळ गावीच झाले त्यानंतर पदवीचे शिक्षण दयानंद महाविद्यालय लातूर तर बिएड शासकीय महाविद्यालय परभणी येथे झाले.शिक्षण पूर्ण होतच सन १९९२ साली जिल्हा परिषद हायस्कूल अंदुरी या शाळेतून त्यांच्या नौकरीची सुरुवात झाली.सन १९९२ ते २००६ पर्यंत त्यांनी सदर शाळेवर माध्यमिक शिक्षक म्हणून कर्तव्य बजावल्यानंतर त्यांची सन २००६ साली जिल्हा परिषद हायस्कूल चाकूर ता चाकूर जि.लातूर येथे अराजपत्रित मुख्याध्यापक म्हणून पदोन्नती मिळाली याच शाळेवर त्यांनी २००६ ते १६ जानेवारी २०२३ पर्यंत एक कार्यतत्पर कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक म्हणून कर्तव्य पार पाडले.आणि १७ जानेवारी २०२३ रोजी ते किनवट तालुक्यात गटशिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.किनवट तालुक्यातील शिवणी बिटाचे शिक्षणविस्ताराधिकारी संजय कराड यांनी गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने  यांना सोबती सारथी बनून मोलाचे सहकार्य केले.

गटशिक्षणाधिकारी ज्ञानोबा रामनाथ बने यांच्या कार्याबद्दल व्यक्तीमत्वाबद्दल लिहावे बोलावे तेवढं कमीच आहेत शब्दालासुद्धा कोडे पडावे असे व्यक्तीमत्व गणिताचे गाढे अभ्यासक राष्ट्रीय कबड्डी,हॉलिबाल खेळाडू नेहमीच प्रसन्न मुद्रा,शांत संयमी कार्यतत्पर कर्तव्यदक्ष विद्यार्थीप्रिय तसेच अल्प काळात सर्व शिक्षक केंद्रप्रमुख शिक्षणविस्तार अधिकारी तसेच पं.स शिक्षण विभागातील सर्व कर्मचारी यांच्या मनावर अधिराज्य मिळवले.विद्यार्थी गुणवत्ता वाढीसाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले त्यांनी आपल्या गटशिक्षणाधिकारी कार्यकाळात शिक्षण विभागात निःस्वार्थ,प्रामाणिक व स्वच्छ चरित्र अबाधित ठेऊन कार्य केले.त्यांनी तालुक्यातील अनेक दुर्गम भागातील प्राथमिक माध्यमिक शाळेना भेटी देऊन तेथील विद्यार्थी शिक्षक पालक यांचे प्रश्न जाणून घेऊन ते प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले.सेवानिवृत्त कालावधी कमी असताना सुद्धा आपल्या कुटूंबासह गोकुंदा किनवट येथे राहून शिक्षकांच्या निःस्वार्थ सेवेसाठी १४ ते १६ तास उपलब्ध राहत असत.यामुळेच ते सर्व तालुक्यातील शिक्षकांचे शिक्षकप्रिय गटशिक्षणाधिकारी ठरले.त्यांच्या कार्याची दखल घेऊन जिल्हा परिषद नांदेड यांच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी मीनल करणवाल यांनी जिल्हास्तरीय आदर्श गटशिक्षणाधिकारी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.त्यांच्या भावी सेवानिवृत्तीचा काळ निरोगी आनंददायी राहण्यासाठी प्राथमिक शिक्षक मारोती भोसले व सर्व शिक्षकवृंद यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.