किनवट तालुका बातमीदार: ता.२०
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नियोजित स्थळी लवकरात लवकर बसवण्यात यावा यासाठी नगरपालिका किनवट समोर गजानन पाटील कोल्हे मा. उपसभापती पंचायत समिती किनवट, श्याम मगर पाटील, चंद्रकांत साळवे पाटील आमरण उपोषणास बसलेले आहेत . उपोषणाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस वैजनाथ करपुडे पाटील व गजानन कोल्हे पाटील यांच्या हस्ते अभिवादन करून करण्यात आली. तरी किनवट तालुक्यातील सर्व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अनुयायांना नम्र विनंती आहे आपण या मागणी संदर्भात सहकार्य करावे.
Comments
Post a Comment