नांदेड:
_______________________________
• नांदेड जिल्ह्यातून कवींची उपस्थिती.
• मान्यवरांनी केले अनमोल असे मार्गदर्शन
________________________________
आज नांदेडमध्ये कवी कट्टा समुहाच्या वतीने पाऊसधारा ऑनलाइन कवी संमेलन कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रसिद्ध कवयित्री अशा पैठणी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ईसापुर प्रकाशनाचे संचालक दत्ता डांगे सर प्रसिद्ध कवी शंकर वाडेवाले प्रसिद्ध साहित्यिक पंडित पाटील प्रसिद्ध उद्योजक बालाजी इमितदार तसेच प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ डॉक्टर माधव विभुते सर आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती तर नांदेड जिल्हा उद्घाटकीय कार्यक्रमाचे संचालन माननीय राजश्री विभूते-हिमगिरे यांनी केले तर कवी संमेलनाचा सूत्रसंचालन माननीय रुचिरा बेटकर यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार कट्टा समूहाचे संचालक अशोक कुबडे यांनी मानले..यावेळी नांदेड आणि परिसरातील अनेक कवी या कवी संमेलनात सहभागी झाले होते.. सदरील कार्यक्रम एमपीएस इंग्लिश स्कूल बाबा नगर नांदेड येथे पार पडला!
________________________________

Comments
Post a Comment