Skip to main content

Posts

Showing posts from May, 2024

अंबाडी येथे युवक व महिलेचा फावड्याने खुन कारण अद्याप अस्पष्ट .... मयतच्या भावाचे शांततेचे आवाहन

तालुका प्रतिनिधी किनवट  :-घराचे बांधकाम करणारा मिस्त्री व शेजारच्या महिलेच्या डोक्यात फावड्याने वार करून दोघांनाही निघृणपणे ठार मारल्याची घटना बुधवारी (दि. २९) दुपारी ४:३० वाजता किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपी उत्तम भरणे यास तत्काळ अटक केली आहे. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील मृतदेह घेऊन नातेवाईक पोलिस ठाण्यात आले. आरोपीला फाशी देण्यात यावी म्हणून घोषणाबाजी करत दुकाने बंद करण्यात आली. काहींनी दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मांडवी, इस्लापूर व सिंदखेड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. मृत मिस्त्री शेख वसीम शेख महेबूब कुरेशी (२९, रा. इस्लामपुरा, किनवट) यांच्या मारेकऱ्याला फाशी द्यावी, म्हणत घोषणाबाजी करत चक्क मृतदेह नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात आणला.दगडफेक करून गोकुंदा व शहरातील दुकाने बंद करण्यात आली. तणावपूर्ण शांतता प्रस्थापित झाल्याने भोकरचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे हे वेळीच किनवट शहरात दाखल झाले. बंदोबस्तासाठी मांडवी, सिंदखेड व इस्लापूर ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर तण

कु. वसुंधरा सत्यवंशचे दहावीत नेत्रदिपक यश

  किनवट :  कोठारी येथील मातोश्री कमलताई ठमके मधील इयत्ता दहावी शिकणारी कु. वसुंधरा आत्मानंद सत्यवंश हिने दहावीत नेत्रदिपक यश संपादन केले आहे . वसुंधरा ही किनवट येथील कोठारी/ गोकुंदा येथील शाळेची विद्यार्थिनी असुन नुकताच दहावी बोर्डीचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत वसुंधरा हिने ९०.६०% गुण घेतले आहेत . अथक परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अभ्यास करून हे  यश तिने संपादन केले आहे . गृहलक्ष्मी महिला ग्राम विकास संस्थेचे आत्मानंद सत्यवंश , संगिता पाटील( सत्यवंश) यांची ती कन्या आहे. या यशा बद्दल तिचे सर्व स्तरातुन कौतुक करण्यात येत आहे . यावेळी तिचे मार्गदर्शक चौधरी सर , गायकवाड सर व इतर शिक्षीका शिक्षकवृंद , परिवारातील सदस्य आजी राहीबाई पाटील इंद्राबाई ठमके, शिलरत्न पाटील , सिमा पाटील, राजेश पाटील, अंबर ठमके, वर्षा, प्रतिक्षा, मनोहर पाटील , गौतम पाटील, सर्व परिवारातील सदस्य नातेवाईक  मैत्रीणींनी  आदी मंडळीनी तिचे अभिनंदन केले आहे.

कु.मयुरी कुबडे हिचे दहावीत घवघवीत यश

नांदेड : येथील नेहरू इंग्लिश स्कूल मधील इयत्ता दहावी शिकणारी कु.मयुरी अशोक कुबडे हिने दहावी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. मयुरी कुबडे ही नांदेड येथील नेहरू इंग्लिश स्कूल सोमेश कॉलनी नांदेड या शाळेची विद्यार्थिनी असून नुकताच दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे.या परीक्षेत मयुरी कुबडे हिने ७५ % गुण घेतले आहेत. अथक परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अभ्यास करून हे यश मयुरी कुबडे हिने संपादन केले आहे. प्रसिद्ध साहित्यिक कादंबरीकार अशोक कुबडे यांची ही मुलगी आहे. इयत्ता दहावीत मिळालेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यावेळी  दत्ता डांगे,विजयकुमार चित्तरवाड,माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, जि.पण.सदस्य साहेबराव धनगे, पंडित पाटील,आनंद पुपलवाड,शितल शहाणे आदींनी तसेच आजोबा रामचंद्र कुबडे,अशोक कुबडे अर्चना कुबडे, सुनील कुबडे,वनिता कुबडे आदी परिवारातील मंडळींनी तिचे अभिनंदन केले आहे.

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे आणण

सामुहिक विवाह मेळाव्यात २४ जोडपी विवाहबद्ध झाली

सत्यशोधक न्युज किनवट ता. १९ : अजिंक्य सेवाभावी संस्थेच्या वतीने कलावती गार्डन येथे रविवार दि.२६ मे रोजी दुपारी १२.३० वाजता १८ व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्यात एकुण २४ जोडपी विवाहबध्द झाली अशी माहिती आयोजक माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी दिली.मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे हे तर निमंत्रक म्हणून दत्ता कसबे व मार्गदर्शक म्हणून अॅड. सभाष ताजने हे होते. यावेळी अनेक मान्यवर, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. मेळावायशस्वीतेसाठी संजय गुरनले, सधाकर हलवले, सुशील रणवीर, राहुल वाढे इत्यादींनी परिश्रम घेतले. सामुहिक विवाह मेळाव्यात महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका सुशमा देवी यांचा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला

उज्वल यशाची परपंरा कायम

किनवट ता. प्र. :- विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळ किनवट किनवट द्वारा संचालित इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय गोकुंदा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ सेमी व मराठी माध्यम शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण २३ विद्यार्थी विशेष प्राविण्य उत्तीर्ण प्रथम श्रेणी १५विद्यार्थी तर द्वितीय श्रेणी मध्ये दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत शाळेतून प्रथम अभिनव प्रकाश राठोड ९५.४०% द्वितीयआदिल राजू चव्हाण ९४.४०% तृतीय रोहित उल्हास राठोड ९१.४०% असे विद्यार्थ्यांचे नावे आहेत संस्थेचे अध्यक्ष माननीय एडवोकेट सचिन राठोड मुख्याध्यापक अरविंद राठोड व सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

वैशाखी बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी

     किनवट,ता.२३(बातमीदार): शहरातील सिद्धार्थ नगरातील जेतवन बुद्ध विहारात आज(ता .२३) वैशाखी बौद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली.    प्रारंभी पंचरंगी ध्वजाचे रोहण झाल्यानंतर सामुहिक त्रिशरण पंचशिलेसह बुद्ध,धम्म व संघ वंदना प्रा. सुबोध  सर्पे  यांनी घेतली.उपस्थित बांधवांना विशाखा महिला मंडळाच्या वतीने खिर दानानंतर नंतर कार्यक्रमाची सांगता झाली. अर्चना स्थुल यांनी बुद्ध धम्मा विषयी विस्तृत माहिती दिली. यावेळी गंगुबाई नगराळे, कांताताई सर्पे, मैनाबाई पाटील, कमलबाई भरणे, राहीबाई पाटील, मालाबाई नगारे, सागर नगारे, शेशीकला कावळे, जयमाला आळणे, चांगोनाबाई कावळे, सुधाबाई परेकार, सुशिला ठमके, योजना पाटील, वाठोरे मॅडम, भगत मॅडम, वंदना भवरे, ॲड दिव्या सर्पे, रुपाली कावळे, पल्लवी कावळे, सिमा पाटील, शुभांगी , पुजा सर्पे, मेघा सर्पे, कांबळे बाई, धोटे बाई, शोभा भवरे,दिक्षा पाटील, आम्रपाली कावळे, सुजाता कावळे ललीता मुनेश्वर, करूना पवार, अनु आळणे, काजल भवरे, सुजाता भरणे, सविता भरणे,  ॲड मिलींद सर्पे, राजेश पाटील, गौतम पाटील, आकाश आळणे, रवी कांबळे, सम्यक सर्पे, कामेश मुनेश्वर, ॲड सम्राट सर्पे  बौध्द उ

@युद्ध नको, बुद्ध हवे.....

भारत देश हा असा देश आहे ईथे वैराला उत्तर मैत्री आणि प्रेम आहे. माणूस नावाचा प्राणी विभिन्न जाती-धर्मात जन्माला आलेल्या 'माणसाचा' मानव म्हणून संवेदनशील व हृदयस्पर्शी जीवन जगणे हा त्याचा मूलाधार आहे. वेळोवेळी संपूर्ण जगाला अहिंसा, करुणा व मैत्रीचा संदेश देणारी बुद्धांची ती स्थितप्रज्ञ मूर्ती सांगत असते. पण  तोफगोळय़ांचा मारा करून क्षणार्धात त्या मूर्तीची नासधूस केली जाते.  मार्च २००१ मध्येच नव्हे तर अनेक वेळा बुद्धमूर्ती तोडण्यात आल्या.पण त्यानंतर काय घडलं नि आजला काय घडतयं, हे उभे जग पाहत आहे. द्वेषाने पेटलेला 'माणूस' नावाचा दहशतवाद अवघ्या जगासाठी धोक्याची घंटा ठरतो आहे. हा माणूस येत्या काळात काय विद्ध्वंस घडवेल, याचा काहीही नेम राहिलेला नाही. हा माणूस माणसाचा वैरी का झाला? एकमेकांच्या रक्ताची होळी खेळण्याइतपत तो हिंस्त्र व पशू का झाला? ‘माणूस’ नावाच्या जगातील सर्वात मोठय़ा धर्माला त्याचे उत्तर सापडत नाही वा त्याला ते समजून घेण्याची गरजही वाटत नसावी का?. बुद्धत्वाची, प्रज्ञेची प्राप्ती जगातील कोणतीही व्यक्ती करू शकते का?. त्याला धर्म, भाषा, प्रांत व जातीचे कोणतेही बंधन आडव

बळीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयाचे बारावी परीक्षेत घवघवीत यश!

  किनवट, येथील बळीराम पाटील कनिष्ठ महाविद्यालयाने बारावी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.बारावी वाणिज्य शाखेचा शंभर टक्के निकाल लागलेला आहे.बारावी विज्ञान शाखेचा ९८ टक्के तर कला शाखेचा ७० टक्के   निकाल लागलेला आहे. विज्ञान शाखेतील सिरमनवार तनुश्री नरेंद्र   या विद्यार्थीनिने ८७.३३ ,बारापात्रे प्रियंका राजू  ८३.६७ ,बंडे शिवम जयराम ८१ टक्के  तर बारावी कला शाखेतून तरटे मोहन प्रकाश ६४ टक्के, आडे सोना बंडू  ६३.६७ टक्के, गिनगुले मनिषा मधुकर ६२.१७ टक्के, वाणिज्य शाखेतून  जाधव चंद्रशेखर विश्वनाथ ९०.६७, पवार तन्मय मदन ८८.०० टक्के, दराडे रुद्राक्ष माधव  ८१.३३ टक्के  घेऊन महाविद्यालयातून प्रथम,व्दित्तीय ,तृत्तीय क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाले आहेत.  यासह २० विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले तर एकुण ७४ विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले.दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाविद्यालयाने गुणवंता सिद्ध करुन शैक्षणिक क्षेत्रातील या गंगणझेपीमुळे किनवट परिसरातील नामांकित महाविद्यालयाने आपले नांव लौकिक केले आहे.बारावी परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे किनवट शिक्षण संस्थेचे सर्व सदस्य, प्राचार्य डॉ.एस

महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा ची उज्वल यशाची परंपरा याही वर्षी कायम!

      किनवट प्रतिनिधी:-    बारावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत किनवट सारख्या दुर्गम भागातील महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयाने यावर्षीही उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे . विज्ञान शाखेचा 99.5% तर कला शाखेचा 88.44% निकाल लागलाअसून विशेष म्हणजे गुणवत्तेत मुलापेक्षा मुलींनी बाजी मारली आहे. विज्ञान शाखेतुन कु. येरेकार आराध्या अनिलकुमार या विद्यार्थिनीने 89.33% व कला शाखेतून कु सुंकरवार रेणुका राजू  हिने 89.83 %   गुण घेऊन विज्ञान व कला शाखेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला आहे. उच्च माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालाअसून या परीक्षेत गोकुंदा येथील मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडीद्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यावर्षीही घवघवीत यश संपादन केले आहे. विज्ञान शाखेतील एकूण 422 विद्यार्थ्यांपैकी 418 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 54 विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य तर 255 विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीची गुणवत्ता प्राप्त केली आहे व कला शाखेतील 199 विद्यार्थ्यांपैकी 176 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.यापैकी 11विद्यार्

मातंग सामुहीक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध

किनवट ता. प्रतिनिधी / रवी दिसलवार ता.१९  साहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेचे वतीने दिनांक १९ मे २०२४ रोजी लहूजी साळवे नगरी (कलावती गार्डन) झालेल्या मातंग सामुहिक विवाह सोहळ्यात सात जोडपे विवाहबद्ध झाले.यावेळी आमदार भिमराव केराम,माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार,शिवसेनेचे विधानसभा मतदारसंघ प्रमुख ज्योतीबा खराटे,माजी उपाध्यक्ष श्रीनिवास नेम्मानीवार,नारायराव सिडाम,ॲड.हरी दर्शनावाड,उपाध्यक्ष अभय महाजन,प्रार्चाय आनंद भंडारे,माजी नगराध्यक्ष अरुण आळणे,प्रा.डाॅ.सुरेद्र शिंदे,ॲड.मिलिंद सर्पे,पत्रकार,दादाराव कयापाक,माजी नगराध्यक्ष के.मुर्ती,शेख.परविन मॅडम,उषाताई धात्रक,राजु शिंदे,पत्रकार जयपाल जाधव,पत्रकार गरड पाटील,पत्रकार किरण ठाकरे,पत्रकार प्रमोद पोहरकर,सुभाषबाबू नायक राठोड,पत्रकार दत्ता जायभाये,पत्रकार अनिल भंडारे,दिलीप स्वामी,डाॅ.पवन मोरे,विकास कुडमते,पत्रकार राजेश पाटील,कृष्णा पाटील,नारायण माडपेल्लीवार रामा उईके,शेकन्ना गुडावार,डि.एन.बटुर,गिरीष नेम्मानीवार,आनंद भालेराव सर,शेख.सरफाराज,आदी मान्यवरांची उपस्थिती होती.आयोजन समितीचे अध्यक्ष मारोती सुंकलवाड,संयोजक भगवान मारपवा

संस्कृती चे जतन करण्यासाठी जीवन भर समाज प्रबोधन करणारे:- किर्तनकार सत्यपाल महाराज..

किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रातील तमाम वाचक बांधवांनो आज वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती प्रत्येक भारतीयाच्या अंगी यावी यासाठी सतत प्रयत्न करणारे तथा कीर्तनातून प्रबोधन करणारे आदरणीय सत्यपाल महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या समाजप्रबोधन कार्या विषयी आज लेखक त्यांच्या शब्दरूपी भावनेतून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे जर वाचकाच्या जीवनात या लेखाच्या माध्यमातून आपल्या भारतीय  संस्कृतीच्या वारसाचे जतन करण्याची मनोवृत्ती निर्माण झाल्यास त्या मनोवृत्ती मध्ये लेखकाचा फक्त आणि फक्त खारीचा वाटा असेल हे मात्र निश्चित मित्रांनो आज आपण अशा महा प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांच्या विषयी जाणून घेणार आहोत सत्यपाल महाराज यांनी  महामानवांच्या विचार आणि कार्याचा वारसा चालविणारे ,पंधरा हजार पेक्षा जास्त किर्तनातून लोकांच्या वर्तनात परिवर्तन घडून आणणारे , समाजप्रबोधनकार मा.सत्यपाल महाराज प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे पालन करावे संविधानातील आदर्शाचा सन्मान करावा हे आपल्या कीर्तनातून समाजाला सांगणारे आदरणीय सत्यपाल महाराज.  मानवाची प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहि

नगरपालिकेने मालमत्ताधारकांना कराची पावती संगणकीय द्यावी - ॲडव्होकेट सम्राट सर्पे

  किनवट ( प्रतिनिधी ) : डिजिटल इंडिया होत असताना आजही किनवट नगरपालिकेकडून मालमत्ताधारकांना घर कर, पाणी कर, इतर टॅक्स पावती हाताने जीर्ण झालेल्या कागदावर लिहून देत आहेत. परिणामी मालमत्ता धारकांना नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.           मालमत्ता धारकांनाच वर्षानुवर्ष टॅक्स पावत्या सांभाळून ठेवावे लागते. नोंद घेतलेल्या रजिस्टरवर हवा तशा नोंदी घेतल्या जातात. जास्तीचे कर लिहून पुन्हा त्यात खडाखोड झाल्याचा प्रकार पाहावयास मिळतो. जुनी कर पावती जर हरवले तर मग काही सोयच नाही. जुनी पावती आणा दुरुस्त करून देतो असे सर्रास चाललेले आहे. यावर आळा बसायचा असेल तर संगणकीय कर पावत्या द्याव्यात आणि रजिस्टर वर नोंद न ठेवता संगणकीय नोंदी ठेवाव्यात यामुळे कामात पारदर्शकता येईल आणि मालमत्ता धारकांची गैरसोय होणार नाही.         अशा आशयाचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते एडवोकेट सम्राट मिलिंद सर्पे यांनी नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

पत्नीला भर बाजारात पेट्रोल टाकुन पेटवण्याचा प्रयत्न, पती फरार

  किनवट ता. प्र:-  किनवट शहरालगतच्या गोकुंदा परिसरातील दत्तनगरातील एका युवकाने स्वतःच्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली आहे. किनवट पालिकेच्या भाजी मार्केटमध्ये आज शनिवारी दि. ११ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. दत्तनगर गोकुंदा येथील रहिवाशी असलेली ३५ वर्षीय महिला शनिवारी सायंकाळी ७ च्या दरम्यान गोकुंदा येथून भाजीपाला खरेदीसाठी किनवट पालिकेच्या भाजी मार्केटमध्ये आली होती. भाजीपाला, मसाले व अन्य दुकानांनी गजबजलेल्या मार्केटमधून ती महिला भाजीपाला घेवून घराकडे परतत होती. इतक्यात तिच्या मागावर असलेला तिचा पती अर्जुन सातपुते हा सोनपापडीच्या डब्यात पेट्रोल घेवून आला. आणि त्याने भर बाजारातच पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत ती महिला गंभीररित्या भाजली आहे. प्रसंगावधान दाखवत व्यापाऱ्यांनी पाणी ओतून महिलेला लागलेली आग विझविण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर आरोपी अर्जुन फरार झाला. व्यापारी व नागरिकांनी पोलिसांना फोन केल्यानंतर बऱ्याच वेळाने पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णवाहिका वेळेवर उपलब्ध

शहरवासियांनी उद्यानांचा जास्‍तीत जास्‍त उपयोग करुन घ्‍यावा. - मुख्‍याधिकारी श्री. काकडे

  (नगरपरिषद किनवट च्‍या वतीने वसंतराव नाईक बाल उद्यान परीसरात श्रमदान व स्‍वच्‍छता अभियान संपन्‍न) किनवट:- माझी वसुंधरा व स्‍वच्‍छ सर्वेक्षण २०२४ अंतर्गत नगरपरिषद किनवट च्‍या वतीने मुख्‍याधिकारी श्री.मुगाजी काकडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली वसंतराव नाईक बाल उद्यान साईनगर येथे दि.८/०५/२०२४ रोजी श्रमदान व स्‍वच्‍छता अभियान राबविण्‍यात आले. पावसाळयापुर्वी उद्यानात वाढलेली झुडपे, गवत, झाडांच्‍या फांद्या इत्‍यादींची छटाई करण्‍यात येऊन झाडांचा पाला-पाचोळा संकलीत करण्‍यात आले. सकाळी 7.00 वाजता सुरु करण्‍यात आलेल्‍या अभियानात नगर परिषद किनवट चे सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, सफाई कामगार, साईनगर येथील सामाजिक कार्यकर्ते अॅड.सुनील येरेकार, श्री. अजय कदम श्री. संजय धोबे माहेर दवाखान्याचे डॉ. अनिल राठोड यांच्‍या टिमने सहभाग नोंदिवला.  श्रमदान अभियानाच्‍या प्रसंगी मुख्‍याधिकारी श्री.काकडे यांनी शहरवासियांना अहवान करत शहरात असलेल्‍या साईनगर व सुभाषनगर येथील असलेल्‍या उद्यानांचा नागरीकांनी व्यायाम, मनोरंजन, इत्‍यादी कार्यक्रमासाठी जास्‍तीत जास्‍त उपयोग करुन घ्‍यावा असे मत व्‍यक्‍त केले. सदरील उपक्रम

ॲड सुनिल येरेकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

ॲड सुनिल येरेकार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करतांनाचे क्षणचित्र किनवट:- सामाजिक, शैक्षणीक, पर्यावरण व विधी अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असलेले ॲड सुनिल येरेकार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात  साजरा करण्यात आला. किनवटचे प्रसिद्ध माहेर हॉस्पिटल येथे डॉ. अनिल राठोड, डॉ. प्रियंका राठोड यांच्यासह संपूर्ण स्टाफ तर्फे वाढदिवस साजरा करण्यात आला व तसेच त्यांचे उत्तमराव राठोड उद्याना समोरील ऑफीस मध्ये सुद्धा वंचितचे ता. अध्यक्ष वाघमारे, दया पाटील, आदिवासी विद्यार्थी संघटनेचे विकास कुडमेते ,प्रा. सागर शिलेवार ,टिपु सुलतान ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष पत्रकार सय्यद नदीम, पत्रकार समाजिक कार्यकर्ते राजेश पाटिल अशा विविध मान्यवरांनी भेटून शुभेच्छा दिल्या.

उन्हाचा पारा ४२ ° अंशावर रस्ते झाले निर्मणुष्य त्यात बत्ती गूल

  प्रतिनिधी किनवट:- ०६ सध्या मराठवाड्यात व नांदेड जिल्ह्यात कडाक्याचे उन्ह वाढले असून सकाळी १० वाजल्या पासुन उन्हाची प्रचीती येते आहे दुपारच्या वेळी तर रस्त्यावर सगळा शुकशुकाट दिसुन येत आहे दुपार पासुन सहा वाजे पर्यंत एकही माणूस दिसेनासा झाला आहे व्यापारी दुकानदार देखील उन्हामुळे ग्राहक ग्रामीण भागातील लोक नसल्याने भवनी सुद्धा होत नसल्याचे एकावयास मिळत आहे या कडाक्याचे उन्हामुळे उकाडा वाढला असून करंट देखील जात असल्याने लोक महावितरण कार्यालयात वांरवार फोन लावून विचारना करत आहेत सध्या ४२ ° अंशावर पार गेला असून वेग वेगळे आजार जसे उन्ह लागने चक्कर येणे असे आजार उद्भवताना दिसून येते आहे उन्हाच्या तिव्रतेने लोक शितपेयाची मागणी वाढली आहे तर दुसरीकडे किनवट मध्ये एकही पानपोई नसल्याने ग्रामीण भागातील लोकांची गैरसोय होत आहे.

किनवट राष्ट्रीय राज्यमहामार्ग तात्काळ दुरुस्त करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू

  किनवट/प्रतिनीधी:- किनवट शहरातून रस्ता रुंदी करण्याच्या नावावर मागील पाच वर्षापासून शहरांमधील चुंगी नाका ते डॉ. आंबेडकर चौक रस्त्याची दयनिय अवस्था असल्यामुळे या रस्त्यावर वाहन चालकांना व व्यापाऱ्यांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरण जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु तात्काळ सदरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू असा इशारा किनवट तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात देण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की भोकरपाटा ते धनोड्यापर्यंत 161 राष्ट्रीय माहामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू झाले परंतु काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने या रस्त्यावर अनेक अपघातही घडले तर शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या नावावर या रस्त्याकडे शासनाचे व लोकप्रतिनीधीचे लक्ष नाही. शिवाय पाच वर्षापासून शहर विशीयांना या रस्त्या व वरुन चालतांना जिव मुठीत धरुन चालावे लागत आहे हीवाळा उन्हाळा धुळच धुळ तर पावसाळ्यात चिखल पाण्याचा जीव घेणा ञास रस्त्याची कोणतेही डागडूगी नसल्यामुळे संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झाला आहे. अरुंद रस्ता त्यातल्या त्यात न्यायाची देवता मानली जाणारी न्यायालय य

सेवापुर्ति निमित्त महात्मा ज्योतीबा फुले विद्यालयात कार्यक्रम संपन्न

   किनवट,दि.३: मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी(ता.किनवट व्दारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा( किनवट) येथिल सेवानिवृत्त मुख्याध्यापक, उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक,पर्यवेक्षक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सेवापुर्ती सोहळा महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिनी(दि.१) रात्री आठ वाजता मातोश्री कमलताई ठमके शैक्षणिक संकुल, कोठारी( ता.किनवट) येथे उत्साहात साजरा झाला.  कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आमदार भीमराव केराम हे होते. प्रमुख पाहुणे आनंदराव वाढे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी,नांदेड, अनिल महामुने, अधिक्षक, शालेय पोषण आहार,किनवट, सौ.शुभांगीताई ठमके, प्राचार्या म.ज्यो.फुले क.म.वि.घोटी,म.ज्यो.फुले.मा.व.उमावि.गोकुंदा, किनवट संस्थेचे सचिव तथा मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गोकुंदा, किनवट चे अध्यक्ष अभि.प्रशांत ठमके,आनंद मच्छेवार,माजी नगराध्यक्ष,किनवट आदी विचारमंचावर उपस्थित होते.      सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमांचे पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. अतिथी देवो भव्य ! या भारतीय संस्कृतीला जपत आलेल्या मान्यवर