Skip to main content

संस्कृती चे जतन करण्यासाठी जीवन भर समाज प्रबोधन करणारे:- किर्तनकार सत्यपाल महाराज..


किनवट (तालुका प्रतिनिधी) माझ्या महाराष्ट्रातील तमाम वाचक बांधवांनो आज वैज्ञानिक दृष्टिकोन मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती प्रत्येक भारतीयाच्या अंगी यावी यासाठी सतत प्रयत्न करणारे तथा कीर्तनातून प्रबोधन करणारे आदरणीय सत्यपाल महाराज यांच्या जयंती निमित्त त्यांच्या समाजप्रबोधन कार्या विषयी आज लेखक त्यांच्या शब्दरूपी भावनेतून प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे जर वाचकाच्या जीवनात या लेखाच्या माध्यमातून आपल्या भारतीय  संस्कृतीच्या वारसाचे जतन करण्याची मनोवृत्ती निर्माण झाल्यास त्या मनोवृत्ती मध्ये लेखकाचा फक्त आणि फक्त खारीचा वाटा असेल हे मात्र निश्चित मित्रांनो आज आपण अशा महा प्रबोधनकार श्री सत्यपाल महाराज यांच्या विषयी जाणून घेणार आहोत सत्यपाल महाराज यांनी 

महामानवांच्या विचार आणि कार्याचा वारसा चालविणारे ,पंधरा हजार पेक्षा जास्त किर्तनातून लोकांच्या वर्तनात परिवर्तन घडून आणणारे , समाजप्रबोधनकार मा.सत्यपाल महाराज प्रत्येक नागरिकांनी संविधानाचे पालन करावे संविधानातील आदर्शाचा सन्मान करावा हे आपल्या कीर्तनातून समाजाला सांगणारे आदरणीय सत्यपाल महाराज. 

मानवाची प्रगती होण्यासाठी व्यक्तिगत व सामूहिक कार्यात उच्चत्वाची पातळी गाठण्याचा प्रयत्न समाजाने करावा हे सांगणारे सत्यपाल महाराज. आपल्या पाल्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्या व ती सर्व पालकांनी करून दिलीच पाहिजे ही भावना जनसामान्यात निर्माण करणारे आदरणीय सत्यपाल महाराज. ज्या ज्या महामानवाने गुलामगिरीतून मानवाला स्वातंत्र्याकडे परावर्तन केले त्यांची महिमा आपल्या शब्दरूपी भावनेतून समाजापर्यंत पोहोचवणारे आदरणीय सत्यपाल महाराज. देशाचे तथा समाजाचे अखंडत्व कसे राहील यांची काळजी घेऊन समाज प्रबोधन करणारे आदरणीय सत्यपाल महाराज. सर्व प्रकारचे भेद विसरून समाजामध्ये एकोपा वाढवावा व बंधुत्वाची भावना निर्माण व्हावी तसा निर्माण झालेली भावना जोपासण्यात यावी तथा समाजातील स्त्रियांचा प्रतिष्ठेला कुठेही कमीपणा येणार नाही या दृष्टिकोनातून समाजाचे प्रबोधन करणारे आदरणीय सत्यपाल महाराज. देशामध्ये लाभलेल्या नैसर्गिक साधन संपत्ती तथा पर्यावरणाचे सर्वच मानवाने संरक्षण केले पाहिजे या दृष्टिकोनातून समाजामध्ये प्रबोधन करणारे आदरणीय सत्यपाल महाराज. आपल्या कीर्तनातून समाजामध्ये सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण समाज कसा करेल ही परिस्थिती तथा मत निर्माण करणारे आदरणीय सत्यपाल महाराज. सत्यपाल महाराज यांचा जन्म १६ मे १९५६ रोजी सिरसोली ता.तेलारा जि.अकोला  येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सुशिलाबाई तर वडीलांचे नाव विश्वनाथ चिंचोलकर आहे . वडील कपडे शिवण्याचा व्यवसाय करत असत तर आई दुसऱ्याच्या शेतात कामाला जात असे . सत्यपाल महाराजांना  एक मुलगा व एक मुलगी असून मुलगा डाॕक्टर तर मुलगी गृहिणी आहे . सत्यपाल महाराज लहानपणी गुरुदेव सेवा मंडळाच्या प्रार्थनेस जात असत .राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या समाजपरिवर्तनवादी विचारांने प्रेरित होऊन मातीची   खंजीरी  वाजवत किर्तनास सुरूवात केली .नंतर ते लोकप्रबोधनाच्या चळवळीत सप्त खंजिरी वादक सत्यपाल महाराज या नावाने ओळखल्या जाऊ लागले .सत्यपाल महाराज यांनी पंधरा हजारा पेक्षा जास्त मनोरंजनपर  किर्तनातून  आपल्या खास शैलीतून सप्त खंजिरी वाजवत ग्रामप्रबोधनात लक्षणीय योगदान दिल्यामुळे राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरून त्यांना अनेकदा विविध पुरस्कार देवून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा दलित मित्र पुरस्कार, समाज प्रबोधनकार पुरस्कार, मराठा विश्वभूषण पुरस्कार, प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार, आम्ही सारे फाउंडेशन पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. पुणे येथे आयोजित अखिल भारतीय बहुजन संत साहित्य संमेलनाचे (२०११) अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.

त्यांची महिमा शब्दरूपी आपण लिहावे इतपत लेखक मोठा नाही तरीपण थोडक्या मोडक्या शब्दात सत्यपाल महाराजांचे कर्म तथा कृती वाचकाच्या समोर देणे हे लेखकाला अभिप्रेत वाटले आणि या लेखामुळे समाजामध्ये एक चैतन्य निर्माण व्हावे या दृष्टीकोनातून लेखकाने वाचकाच्या समोर हा लेख आणलेला आहे.



विलास पाटील सुर्यवंशी 

राजेंद्रनगर किनवट 

ता किनवट जी. नांदेड 

मो न.9922910080

Comments

Popular posts from this blog

किनवट गोकुंदा रोडवर खरबी कॉर्नर जवळ ॲटो व दुचाकीचा अपघात यात अज्ञात इसमाचा अपघातात जाग्यावर मृत्यु झाला

 

किनवट तालुक्यातील मारेगाव खालचे येथील नाल्यात तीन मुलींचा बुडून दुर्देवी मृत्यू

  सत्यशोधक न्युज किनवट तालुक्यातील मारेगाव (खा) येथे पाण्यात बुडून ३ युवतींचा मृत्यू झाल्याची घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. असुन सदरील या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, मारेगाव येथील स्वाती देविदास कांबळे (१२ वर्षे,) पायल देविदास कांबळे (१६ वर्ष) आणि ममता सुरेश विविधकर (१९ वर्ष) रा. मारेगाव (खालचे) ता. किनवट ह्या तीन तरुणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. किनवट जवळील मारेगाव (खा) ऐथे असलेल्या पैनगंगा नदीच्या शेजारील नाल्यामध्ये पाय घसरून पडल्यामुळे एक मुलीला वाचवण्यासाठी दुसरी मुलगी पाण्यात गेली. त्यानंतर, तिसऱ्या मुलीनेही दोघींना वाचवण्यासाठी पाण्यात धाव घेतली. मात्र, एकमेकींना वाचविण्याच्या नादात तीनही मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनं मारेगाव गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळता किनवट पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून शवविच्छेदनासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा येथे...

रामविजय गरड यांना राज्यस्तरीय कुणबी मराठा समाज भुषण पुरस्कार जाहीर

  किनवट (तालुका प्रतिनिधी) किनवट येथील राधाई हार्डवेअर अँड मशीनरी चे मालक  तथा सामाजिक कार्यकर्ते रामविजय श्रीनिवास गरड (पाटील ) यांना त्यांच्या आर्थिक,सामाजिक, राजकीय,  तथा बिजनेस स्किल या विविधांगी गुणांचा व विविध क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन ' महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या वतीने' वर्ष २०२४चा राज्यस्तरीय कुणबी मराठा भुषण पुरस्कारा साठी निवड करण्यात आलेली आहे. सदरिल निवड झाल्याची माहिती कुणबी मराठा महासंघाचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष गिरीश भाऊ जाधव यांच्या मार्गदर्शना नुसार तालुका अध्यक्ष श्री सुनील उमाजी चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी व प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले आहे. सदरील पुरस्काराचे वितरण दिनांक २५ ऑगस्ट रोजी रविवार सकाळी ११-३० वा भक्ती लांन्स नांदेड नगरीत माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण आणि विद्यमान आमदार भावना गवळी यांच्या हस्ते होणार आहे.श्री रामविजय गरड पाटील यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल त्यांचे श्री शंकर जाधव यांनी  घोटी गावाचे उपसरपंच राजू सुरूशे पाटील यांनी  अभिनंदन केले.. अखिल भारतीय मराठी पत्रका...