Skip to main content

किनवट राष्ट्रीय राज्यमहामार्ग तात्काळ दुरुस्त करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करू

 


किनवट/प्रतिनीधी:-

किनवट शहरातून रस्ता रुंदी करण्याच्या नावावर मागील पाच वर्षापासून शहरांमधील चुंगी नाका ते डॉ. आंबेडकर चौक रस्त्याची दयनिय अवस्था असल्यामुळे या रस्त्यावर वाहन चालकांना व व्यापाऱ्यांना धुळीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रस्ता रुंदीकरण जेव्हा होईल तेव्हा होईल परंतु तात्काळ सदरील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन छेडू असा इशारा किनवट तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात देण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की भोकरपाटा ते धनोड्यापर्यंत 161 राष्ट्रीय माहामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू झाले परंतु काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने या रस्त्यावर अनेक अपघातही घडले तर शहरातील रस्ता रुंदीकरणाच्या नावावर या रस्त्याकडे शासनाचे व लोकप्रतिनीधीचे लक्ष नाही. शिवाय पाच वर्षापासून शहर विशीयांना या रस्त्या व वरुन चालतांना जिव मुठीत धरुन चालावे लागत आहे हीवाळा उन्हाळा धुळच धुळ तर पावसाळ्यात चिखल पाण्याचा जीव घेणा ञास रस्त्याची कोणतेही डागडूगी नसल्यामुळे संपूर्ण रस्ता हा खड्डेमय झाला आहे. अरुंद रस्ता त्यातल्या त्यात न्यायाची देवता मानली जाणारी न्यायालय यासमोरही संपूर्ण खड्डे व धुळीचे साम्राज्य जमले आहे जागोजागी खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना वाहने चालवणे ही कठीण होत आहे. अनेकदा छोटे मोठे अपघातही घडले परंतु सदरील रस्त्याकडे वारंवार निवेदने व मागण्या करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे

आशोक स्थंभ ते डॉ. आंबेडकर चौक हा शहरातील मुख्य रस्ता असून याच रस्त्यालगत न्यायदेवतेचे

न्यायालय आहे परंतु रस्ता रुंदी करण्याच्या नावावर सदरील रस्त्याची दुरावस्था ही पाच वर्षापासून चालू असून संपूर्ण रस्त्याने खड्डे झाले . सदरील रस्ताचे रुंदीकरण होईल तेव्हा होईल परंतु आज स्थितीला रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या प्रकारचे निवेदने व मागण्या वारंवार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत असल्यामुळे पत्रकार संघटनेने सदरील रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी तात्काळ रस्ता डांबरीकरण करण्यात यावा ही मागणी शासनाकडे केली असून जनहीताच्या मागणी कडे जर आठ दिवसांमध्ये पूर्तता न झाल्यास लोकशाही मार्गाने रस्त्याच्या दुरुस्तकरीता सर्व पक्षीयासह आमजनतेला सोबत घेउन तीव्र आंदोलन छेडू असा इशाराही पत्रकार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...