Skip to main content

अंबाडी येथे युवक व महिलेचा फावड्याने खुन कारण अद्याप अस्पष्ट .... मयतच्या भावाचे शांततेचे आवाहन




तालुका प्रतिनिधी किनवट  :-घराचे बांधकाम करणारा मिस्त्री व शेजारच्या महिलेच्या डोक्यात फावड्याने वार करून दोघांनाही निघृणपणे ठार मारल्याची घटना बुधवारी (दि. २९) दुपारी ४:३० वाजता किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी येथे घडली. पोलिसांनी आरोपी उत्तम भरणे यास तत्काळ अटक केली आहे.

गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयातील मृतदेह घेऊन नातेवाईक पोलिस ठाण्यात आले. आरोपीला फाशी देण्यात यावी म्हणून घोषणाबाजी करत दुकाने बंद करण्यात आली. काहींनी दगडफेकही केली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मांडवी, इस्लापूर व सिंदखेड पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले.

मृत मिस्त्री शेख वसीम शेख महेबूब कुरेशी (२९, रा. इस्लामपुरा, किनवट) यांच्या मारेकऱ्याला फाशी द्यावी, म्हणत घोषणाबाजी करत चक्क मृतदेह नातेवाइकांनी पोलिस ठाण्यात आणला.दगडफेक करून गोकुंदा व शहरातील दुकाने बंद करण्यात आली. तणावपूर्ण शांतता प्रस्थापित झाल्याने भोकरचे अपर पोलिस अधीक्षक डॉ. के. ए. धरणे हे वेळीच किनवट शहरात दाखल झाले. बंदोबस्तासाठी मांडवी, सिंदखेड व इस्लापूर ठाण्याचे पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आले. त्यानंतर तणाव निवळला. आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांच्या गोळ्या चालू असल्याची माहिती आहे. हल्ल्याचे कारण अजूनही अस्पष्टच आहे.

पोलिस सूत्रांनुसार व प्राप्त माहितीनुसार, किनवट पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंबाडी येथे आरोपी उत्तम भरणे यांच्या घराचे बांधकाम सुरू आहे. किनवट येथील शेख वसीम शेख महेबूब कुरेशी (२९) हा २९ मे रोजी घराचे बांधकाम करण्यासाठी अंबाडी येथे गेला. वीट बांधकाम करत असतानाच अचानक आरोपी उत्तम भरणे याने मिस्त्री शेख वसीम यांच्या डोक्यात फावड्याने जबर वार केला. गंभीर दुखापत झाल्याने वसीम रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्यानंतर शेजारी असलेल्या विशाखां भारत मुनेश्वर (५०) या महिलेच्या डोक्यात त्याच फावड्याने निघृणपणे वार केला. दोघांनाही • गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉ. प्रतीक्षा डोंगरे यांनी मृत घोषित केले.

......खुद्द भोकरचे अपर पोलिस अधीक्षकं डॉ. के. ए. धरणे, किनवटचे उपविभागीय पोलिस अधिकारी रामकृष्ण मळघणे, पोलिस निरीक्षक सुनील बिर्ला लक्ष ठेवून होते, ठाण्यात आणलेला मृतदेह पोलिस बंदोबस्तात परत शवविच्छेदन करण्यासाठी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...