सत्यशोधक न्युज किनवट ता. १९ : अजिंक्य सेवाभावी संस्थेच्या वतीने कलावती गार्डन येथे रविवार दि.२६ मे रोजी दुपारी १२.३० वाजता १८ व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, या मेळाव्यात एकुण २४ जोडपी विवाहबध्द झाली अशी माहिती आयोजक माजी नगराध्यक्ष अरुण आळणे यांनी दिली.मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे हे तर निमंत्रक म्हणून दत्ता कसबे व मार्गदर्शक म्हणून अॅड. सभाष ताजने हे होते.
यावेळी अनेक मान्यवर, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते आदींची उपस्थिती होती. मेळावायशस्वीतेसाठी संजय गुरनले, सधाकर हलवले, सुशील रणवीर, राहुल वाढे इत्यादींनी परिश्रम घेतले.
सामुहिक विवाह मेळाव्यात महाराष्ट्राची सुप्रसिद्ध गायिका सुशमा देवी यांचा सन्मान देऊन सत्कार करण्यात आला
Comments
Post a Comment