नांदेड : येथील नेहरू इंग्लिश स्कूल मधील इयत्ता दहावी शिकणारी कु.मयुरी अशोक कुबडे हिने दहावी परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन केले आहे. मयुरी कुबडे ही नांदेड येथील नेहरू इंग्लिश स्कूल सोमेश कॉलनी नांदेड या शाळेची विद्यार्थिनी असून नुकताच दहावी बोर्डाचा निकाल जाहीर झाला आहे.या परीक्षेत मयुरी कुबडे हिने ७५ % गुण घेतले आहेत. अथक परिश्रम, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर अभ्यास करून हे यश मयुरी कुबडे हिने संपादन केले आहे. प्रसिद्ध साहित्यिक कादंबरीकार अशोक कुबडे यांची ही मुलगी आहे. इयत्ता दहावीत मिळालेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. यावेळी दत्ता डांगे,विजयकुमार चित्तरवाड,माजी शिक्षण संचालक गोविंद नांदेडे, जि.पण.सदस्य साहेबराव धनगे, पंडित पाटील,आनंद पुपलवाड,शितल शहाणे आदींनी तसेच आजोबा रामचंद्र कुबडे,अशोक कुबडे अर्चना कुबडे, सुनील कुबडे,वनिता कुबडे आदी परिवारातील मंडळींनी तिचे अभिनंदन केले आहे.
(राजेश पाटील/किनवट) मोजे दरसांगवी(सि.) ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान" कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड 3. पी एम किसान योजना 4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी), श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

Comments
Post a Comment