किनवट ता. प्र. :-
विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळ किनवट किनवट द्वारा संचालित इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय गोकुंदा शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०२४ सेमी व मराठी माध्यम शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून एकूण २३ विद्यार्थी विशेष प्राविण्य उत्तीर्ण प्रथम श्रेणी १५विद्यार्थी तर द्वितीय श्रेणी मध्ये दोन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत शाळेतून प्रथम अभिनव प्रकाश राठोड ९५.४०% द्वितीयआदिल राजू चव्हाण ९४.४०%
तृतीय रोहित उल्हास राठोड ९१.४०% असे विद्यार्थ्यांचे नावे आहेत संस्थेचे अध्यक्ष माननीय एडवोकेट सचिन राठोड मुख्याध्यापक अरविंद राठोड व सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तीर्ण विद्यार्थी व पालकांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणीक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment