Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

गणपती बाप्पा झाले डाऊनलोड...

  कोरोना व्हायरस पासून मुक्त होऊन गणपती पृथ्वीतलावर पुढील दहा दिवसांसाठी डाऊनलोड झाले. एखाद्या चांगल्या ॲप्स चे पिक्चर जसे कार्य करते अगदी तसेच पुढील दहा दिवसांसाठी पृथ्वीतलावर गणपती डाउनलोड झाल्यावर सर्व लोक त्यांच्यासाठी एका फीचर्स प्रमाणे उत्तम उत्तम कामं करण्यासाठी एकत्र येतात.  नुकतेच गणेशोत्सवाला सुरुवात झाली म्हणून आपण जोरदार तयारीला लागलो. केवढी उत्सुकता ! आपल्या घरात दहा दिवसांसाठी एक छोटासा पाहूणा येणार म्हणून तयारी चाललेली असते. मोबाईल बॉक्स मध्ये एखादे ॲप डाऊनलोड केल्यानंतर एखादी जागा व्यापते तसेच गणपती सुद्धा आपल्या घरात डाऊनलोड झाल्यावर घर छोटे असो वा मोठे असो ती आपल्या घरातील नुसतीच जागा नाही तर संपूर्ण घर मंत्रमुग्ध करून व्यापून घेते. एखाद्या मोबाईल मधील एखादे फीचर्स आपल्याला खूप आवडत असते. तसेच, आता घरातील ती जागा भिंतीचा कोपरा म्हणून राहीलेला नसतो. तर ती जागा आपल्या श्रद्धेचे , भाव-भावनांशी जुळलेली जागा असते... अतिशय सुंदर असे सुशोभीकरण करून तिथे गणपतीला विराजमान करतो. टेबलावर दोन्ही बाजूंनी झिरझिरीत पडदे सोडले जातात. घुगूरमाळा सोडल्या जातात. गणपतीला बसवण्यासाठी सुंदर

किनवट येथे पोळा सण उत्साहात साजरा

किनवट तालुका प्रतिनिधी:- किनवट शहरात शेतकऱ्याचा सण हनुमान मंदीर परिसर व सिध्दार्थ नगर परीसर जेतवन बुध्द विहार येथे पोळा हा उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी बैल जोडींना पांरपारीक वेशभुषेत सजवण्यात आले होते व शिवाजी चौकात विविध प्रकारची फुगे खेळणीची दुकाने थाटात सजली होती या मुळे बच्चे कंपनीचा पारावार उरला नाही ठिक ५ वाजता पोळ्यास सुरवात झाली शेतकऱ्यांनी बैलासह हनुमान मंदीरात दर्शन घेतले व प्रदक्षिणा केली तर जेतवन बुध्द विहारात धम्म वंदना घेण्यात आली या वेळी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, माजी नप उपाध्यक्ष  श्रीनिवास नेमानिवार, मनोज तिरमनवार ,गिरीश नेमानीवार,संतोष सिरमनवार, लक्ष्मीपती दोनपेलीवार , मनोहर पाटील, अनिल तिरमनवार, प्रा.रवीकांत सरपे, नागोराव भरणे, दिनेश कावळे, आनंद कावळे, महेमुद खुरेशी, गंगाधर कदम, सय्यद, नदीम नसीर तगाले, राजेश पाटील, संजय नरवाडे, रतन धर्मा, शंकर नगराळे, सुरेश जाधव, राजेंद्र भातनासे, कपील कावळे, अमोल मंदावार, व्यापारी संघटनेचे दिनकर चाडावार, व्यंकट सातुरवार, व्यंकट नेमानीवार ,प्रितम सिरमनवार, औद्दीवार, व प्रतिष्ठीत नागरीक व शेतकरी बांधव उपस्थित होते 

किनवट शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी कॉग्रेंसचे निवेदन

किनवट ता. प्र. २६ ऑगस्ट २०२२ किनवट तालुका काँग्रेस कमीटीचे वतीने येणार्‍या उत्सवाच्या धर्तीवर किनवट शहरातील विविध समस्यांचे तात्काळ निवारण करणे बाबत काँग्रेस कमीटीचे वतीने नगर परिषदचे प्रभारी मुख्याधिकारी यांना निवेदन देतांना काँग्रेसचे सरचिंटणीस गिरीषभाऊ नेम्मानीवार याप्रसंगी अभय महाजन,इम्रान खान,शे.खलीदभाई नाका मुंनशी,दिलीप पाटील,शे.शाहदूला,शे.इम्रान चाँद साहब,वसंत राठोड,जवाद आलम,सत्तार खिच्ची,स्वामी कलगोटूवार,लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,शरद कोतपेल्लीवार,सदिप राठोड,संजय कोत्तूरवार व काँग्रेसचे सर्व पदधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होते....!!!

शिक्षणाचा मांडला बाजार

 किनवट: १३हजार रुपये प्रवेश शुल्क भरून प्रवेश घ्या, प्रशिक्षण घेण्याची गरज नाही,परीक्षाही नाममात्रच होईल व एका वर्षानंतर पदविका प्रमाणपत्र तुमच्या हाती देण्यात येईल,असा शिक्षणाचा बाजार मांडण्याचा प्रकार मागील काही वर्षांपासून गोकुंदा(ता किनवट)येथे कार्यालय असलेल्या गोपीनाथ मुंडे आय.टी.आय.प्रशिक्षण संस्थेने मांडला आहे.फक्त कागदोपत्री प्रशिक्षित प्रशिक्षणार्थि विद्यार्थी तयार करून एकप्रकारे शिक्षणाचा खेळखंडोबा करणाऱ्या सदरील संस्थेची मान्यता संबंधितांनी रद्द करून संस्था चालकांना कोठडीची हवा दाखवावी,अशी मागणी किनवट या आदिवासी तालुक्यातील अनेक जागृत पालकांनी केली आहे.      गोपीनाथ मुंडे आय.टी.आय.प्रशिक्षण संस्थेमार्फत गोकुंदा येथे स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग सेंटर चालविण्यात येते.या सेंटरमध्ये १० वी व १२वी पास विद्यार्थ्यांसाठी पुर्णवेळ असलेला एक वर्षाचा वायरमन - प्रवेश क्षमता २५ व बांधकाम पर्यवेक्षक - प्रवेश क्षमता ५०, असे दोन मान्यताप्राप्त पदविका अभ्यासक्रम आहेत.     या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना शुल्क घेऊन प्रवेश देण्यात येतो.यानंतर मात्र त्यांना प्रशिक्षित पुर्ण करण्याची गरज नसते.

डिजीटल बॅनर लावतांना विजेचा शॉक लागला

  किनवट तालुका बातमीदार:- शहरातील जिजामाता चौकात ३० वर्षीय युवकास डिजीटल बॅनर लावतांना तहसील कार्यलया समोरील न.प. च्या गाळ्यावर बॅनर लावतांना डिजीटल प्रिन्टर आर्ट येथे  कामाला असलेला ३० वर्षीय  शुभंम कुमरे रा. गोकुंदा या युवकास जिवंत तार कट असल्याने स्पर्श झाला व शॉक लागला . जेव्हां शॉक लागला तेव्हां आरडा ओरड एैकुन सेतु चालवणारे रमेश राशलवार,रवी दिसलवार, भगवान भाऊ आदींनी जाऊन मदत केली त्याच्या अगांवर पडलेला सिमेंट पोल काढला व लाकडाच्या सहाय्याने तार हटवला सदरील युवकास साने गुरुजी इस्पितळात दाखल करण्यात आले पुढील उपचार डॉ. अशोक बेलखोडे हे करीत असुन प्रकृती स्थीर आहे अशी माहिती त्यांनी दिली सुदैवाने जीवित हानी टळली मदत करणाऱ्याचे किनवट शहरात कौतुक करण्यात येत आहे.

किनवट येथे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांची जंयती साजरी

किनवट :- किनवट तालुका काँग्रेस कमीटीचे पक्ष कार्यालयात  २० ऑगस्ट रोजी  भारताचे माजी पंतप्रधान,भारतरत्न,संगणक क्रांतीचे जनक स्व.राजीवजी गांधी यांच्या जयंती साजरी करतांना.याप्रसंगी अल्पसंख्यांक काँग्रेस शहरध्यक्ष बिलाल बडगुजर,कार्यालय सचिव माधव खेडकर,खलीदभाई (नाका मुंनशी),वसंत राठोड,जवाद आलम,शेख.रफीक,गंगाधर मुकनेपेल्लीवार व लक्ष्मीपती दोनपेल्लीवार आदी उपस्थिती होते...!

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा रक्षाबंधन स्तुत्य उपक्रम : पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे

करमाळा, सोलापूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने करमाळा पोलीस ठाणेमधील पोलीस बांधव, पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे, टेंभुर्णी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे, उपनिरीक्षक यांना राखी बांधून भाऊ बहिणीचे पवित्र नाते गुंफले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा हा स्तुत्य उपक्रम आहे असे प्रतिपादन करमाळा पोलीस ठाणेचे पोलीस निरिक्षक सुर्यकांत कोकणे यांनी केले. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ शाखा करमाळा या संघाने गुरुवार दि.१७ ऑगस्ट रोजी करमाळा पोलीस ठाणेमधील पोलीस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्यासह ३५ पोलीस, हवालदार, उपनिरीक्षक यांना राखी बांधली. यावेळी पोलीस निरिक्षक कोकणे यांनी पत्रकार संघाच्या या उपक्रमाचे कौतुक करुन अनेक पोलीस बांधव आपल्या ड्युटीमुळे रक्षाबंधनाला बहीणीच्या घरी जाऊ शकत नाहीत अथवा बहिण सुदधा आपल्या भावाकडे येऊ शकत नाही, पत्रकार संघातील महिला पदाधिकारी यांनी पोलीस बांधवांना राखी बांधून बहिण भावाचे नाते गुंफले. आपण पोलीस ठाणेकडुन या संघाला निश्चित सहकार्य करु असेही सांगितले. यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने कर

राष्ट्र सेविका समिती तर्फे किनवट पोलीस स्टेशनला रक्षाबंधन सण साजरा

किनवट शहर प्रतिनिधी:- आपणही समाजाचे काही देणे लागतो पोलिस विभाग, पोलीस शिपाई खाकी वर्दी मध्ये आपली २४ तास कर्तव्य बजावत आपली सुरक्षा करतात त्यांना देखील आपण रक्षाबंधन या सणाच्या माध्यमातुन आंनद वाटावा  या पवित्र भावनेतुन  राष्ट्रसेविका समिती तर्फे किनवट पोलीस स्टेशन कार्यालयात रक्षाबंधन उत्सव सण साजरा करण्यात आला  यावेळी समितिच्या महिलांनी पोलीस बाधंवाना राख्या बांधल्या व पेढा भरला याप्रसंगी पोलीस उपनिरीक्षक अभिमन्यु साळुंके,सहाय्यक पोलीस निरीक्षक वाठोरे, उ.पो.नि विनायक पवार,  पोलीस स्टाफ सय्यद चाँद, गजानन चौधरी, प्रकाश बोदमवाड, सुनिल कोलबुध्दे, अनिता गजलवार, अनिता कावळे, शिवनंदा रायलवार, मंगल कुरे, संजीवनी मुनेश्वर राष्ट्रसेविका समितीचे महिला पदाधिकारी डाॅ. अनुराधा उपासनी (अध्यक्ष), अंजली उदय राठोड, सारिका नागेश वैद्य, रश्मी कंर्चलावार, छाया कागणे, सुनिता भंडारे, वैशाली गटलेवार आदींनी हा अभिनव उपक्रम राबवला.

नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची नागपूरला बदली.

नांदेड:- नांदेड जिल्हाचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटणकर यांची बदली नागपुर येथे झाली असून त्यांची नियुक्ती जिल्हाधिकारी नागपूर या पदावर करण्यात आल्याचे आदेश आज दिनांक 18 ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय मुंबई यांनी काढले आहेत. नागपूरच्या जिल्हाधिकारी श्रीम. विमला आर. यांच्या यांच्या जागी डॉ. विपीन यांची बदली करण्यात आली आहे. सध्याचा कार्यभार विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे सोपवून नवीन पदाचा कार्यभार त्वरित स्वीकारावा असे आदेश अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी दिले आहेत. विपीन इटणकर यांनी 17 फेब्रुवारी 2020 रोजी नांदेड जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला होता.

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचा स्वातंत्र्य अमृत महोत्सव अंध व अपंग आश्रमात साजरा पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले होते आयोजन

 पिंपरी चिंचवड, पुणे: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने स्वातंत्र्य दिन अजिंठा येथील अंध व अपंग आश्रमाला भेट देऊन साजरा केला. आश्रमाचे संस्थापक सुनील चोराडिया, सामाजिक कार्यकर्ते शहाजी नायर यांचा सन्मान करण्यात आला.  यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे कोषाध्यक्ष राजेश शिंदे यांचा वाढदिवस आश्रमातील अंध व अपंग बांधवासोबत केक कापून साजरा केला.  यावेळी अंध व अपंग बांधवांनी देशभक्तीपर गीते गाऊन वातावरण निर्मिती केली. प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने अंध अपंग बांधवांना अल्पोपहार देऊन त्यांच्यासोबत वार्तालाप करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शहाजी नायर, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष राजन नायर, पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष संतोष रणसिंग, महिला शहराध्यक्षा मंदा बनसोडे, शहर उपाध्यक्षा उषा लोखंडे, सहसचिव निर्मला जोगदंड, कोषाध्यक्ष राजेश शिंदे, सदस्य किशोर सुर्यवंशी आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी अंध व अपंग आश्रम संचालक सुनिल चोरडिया

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे उपक्रम कौतुकास्पद - तहसीलदार राजेश लांडगे

भोकर, नांदेड :  भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भोकर तालुका कार्यकारिणीने राबविलेला माजी सैनिक, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान हा कार्यक्रम अतिशय कौतुकास्पद असल्याचे तहसीलदार राजेश लांडगे यांनी प्रतिपादन केले. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भोकर तालुका कार्यकारिणीच्या वतीने दिनांक १५  ऑगस्ट रोजी भोकर येथील लक्ष्मणराव घिसेवाड महाविद्यालयात माजी सैनिक व दिव्यांगाचा सन्मान व ७५ विद्यार्थ्यांना वही पेन वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोकरचे तहसीलदार राजेश लांडगे तर प्रमुख अतिथी म्हणून भोकर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राणी भोंडवे व काँग्रेसचे नेते तथा माजी सभापती नागनाथराव घिसेवाड उपस्थित होते. यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना तहसीलदार राजेश लांडगे म्हणाले की भारताचा अमृत महोत्सव साजरा करत असताना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, भोकरच्या वतीने घेतलेले कार्यक्रम अत्यंत कौतुकास्पद असून पत्रकारांनी दिव्यांग बांधव आणि माजी सैनिकांचा सन्मान म्हणजे आजपर्यं

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अविनाश घायगुडे

  अंबाजोगाई : तालुक्यातील/केज मतदार संघातील बनसारोळा गावचे सुपुत्र,सर्वसामान कुटुंबातील युवक, व्याख्याते अविनाश घायगुडे यांची आज दि 15 ऑगस्ट रोजी मुंबई येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र त्यांना महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार व इतर जेष्ठ नेते  मंडळी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. अतिशय सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या अविनाश घायगुडे यांचा विध्यार्थी दशेपासूनच समाजकारनाकडे/राजकारणाकडे ओढा राहिलेला आहे. याच कारणास्तव अविनाश घायगुडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 2019 साली गळती लागलेली असताना पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षाने देखील त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांची पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून निवड केली.राष्ट्रवादी पक्षाने दिलेल्या या संधीचे सोने करीत अविनाश घायगुडे यांनी अनेक सभा स्वतःच्या वक्तृव शैलीने महाराष्ट्रभर गाजवल्या. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांची आज राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. पक्षाने आपल्यावर दाखवलेल्या

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने वृद्ध महिलेला दिले जीवदान पोलीस अधिक्षक विजय मगर यांनी तातडीने केली मदत

  नागपूर : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष अमीत वानखेडे यांना वृद्ध महिलेची घटना समजताच तात्काळ पोलीस अधीक्षक यांना फोन करून सदर वृद्ध महिलेला जीवदान दिले आहे.  सविस्तर वृत्त असे की, वार्ताहर चंद्रशेखर गुरनुलेरे यांना वनाथ चौरे कॉलेज, बोरुजवाडा येथे स्वातंत्रदिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होण्यासाठी जातांना रेवनाथ चौरे कॉलेजच्या मार्गावर रस्त्याच्या बाजूला एक वृद्ध महिला वय साधारण ७० वर्ष बसलेल्याअवस्थेत आढळली. ती एकाच जागेवर छत्री घेऊन बसलेली होती, चौकशी केल्यावर कळलं की ती मुळची उमरेडला राहणारी, तिच्या मुलांनी तिला तीन दिवसा आधी इथे आणून सोडले ती पूर्णपणे घाबरलेली होती पायांची अवस्था फार वाईट होती, मानसिक स्थिती बरोबर नव्हती परिस्थितीची गंभीरता लक्ष्यात घेता, वार्ताहर चंद्रशेखर गुरनुले यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष अमीत वानखेडे यांना संपर्क साधला व व्हिडिओ बनवून पाठवला. त्यानंतर प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे नागपूर जिल्हाध्यक्ष अमीत वानखेडे यांनी तात्काळ एस.पी. मगर यांच्याशी संपर्क साधला व त्यांनी जातीने लक्ष देत सावनेर पोलीस

गोदावरी अर्बनच्या “हर ब्रॅच तिरंगा” उपक्रम प्रतिसाद व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर; यांची माहिती ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

  नांदेड, दि. १३ (प्रतिनिधी)-  या वर्षी भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी "हर घर तिरंगा" अभियानात प्रत्येक नागरीकांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या आवाहनास प्रतिसाद म्हणून गोदावरी अर्बन परिवाराने देखील "हर घर तिरंगा" अभियानांतर्गतन गोदावरी अर्बनच्या पाच राज्यातील ९१ ब्रँचमध्ये हर ब्रँच तिंरंगा हा उपक्रम उत्स्फूर्तपणे राबविल्याची गोदावरी अर्बनचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी माहिती दिली.                  गोदावरी अर्बनचे संस्थापक तथा हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील, गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पाच राज्यातील गोदावरीच्या ९१ शाखांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला असून, तरोडा नाका येथील गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य या मुख्यालयाचे कार्यालयात शनिवारी (ता.१३) हा उपक्रम मोठ्या उत्साहत साजरा करण्यात आल्याचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांनी सांगितले आहे.  पुढे ते म्हणाले की, गोदावरी अर्बन मल्टीस्टेट को. ऑप क्रेडि

देशभक्ती हिच ईश्वर भक्ती

  "आपल्या देशाचा तिरंगा हा वाऱ्यामुळे नव्हे तर ह्या देशातील शूर जवानांच्या धाडसामुळे शौर्यामुळे आज फडकतो आहे.  एकवेळ श्वास थांबेल पण देशप्रेमाचा मनातील भाव थांबणार नाही" आज आपला भारत देश स्वतंत्र होऊन 75 वर्षे होत आहेत.म्हणूनच आपण स्वातंत्र्याचा अमृत  महोत्सव साजरा करत आहोत.  हर घर तिरंगा, घरोघरी तिरंगा असे आगळे वेगळे उपक्रम साजरे होताना दिसत आहेत.  म्हणून हे  सर्व स्वातंत्र्य वीरांच्या  बलिदानामुळेच  मिळाले. त्यांचे बलिदान विसरून आपल्याला चालणार नाही. जरा आठवण बघा. आपण ज्यावेळी गुलामगिरी मध्ये होतो त्यावेळी आपल्याला कुठल्याही प्रकारचे अधिकार नव्हते. इंग्रज त्यांना वाटेल तसा मनमानी कारभार करत होते.   भारतीय लोकांमध्ये जाती-धर्माच्या नावाखाली भेदाभेद निर्माण करत होते व फायदा उठवत होते. आपला देश कसा चालावा? यासाठी कुठलेही नियम आणि कायदे त्यावेळी नव्हते. केवळ अनागोंदी असे सर्व काही,अशी परिस्थिती होती. इंग्रज आपल्या देशातून केवळ संपत्तीची लूट करत होते असे नाही तर पिळवणूक देखील करत होते. असे चित्र असताना लोकमान्य टिळक, महात्मा गांधी,सुभाष चंद्र बोस, सावरकर यासारखी अनेक मंडळी परदेश

नाबार्डच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानात गृहलक्ष्मी महीला ग्राम विकास संस्थेचे योगदान मोलाचे- मा.किर्तिकिरण एच. पुजार( प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी ए.आ.वि.प्र. किनवट)

  किनवट ता. प्रतिनिधी:- भारताला स्वातत्र्यं मिळुन ७५ वर्ष पुर्ण होत आहे यंदाचे वर्ष हे अमृत महोत्सवाच आहे मन की बात कार्यक्रमातुन  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या अभियानाला भारतभरातुन  प्रतिसाद मिळत आहे याचाच एक भाग म्हणुन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा.किर्तीकिरण एच. पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली गृहलक्ष्मी महिला ग्राम विकास संस्था किनवटच्या महिला बचत गटाच्या महिलांनी २०००राष्ट्रध्वज शिवल्याबद्दल मा.किर्तीकिरण एच. पुजार सहायक जिल्हाधिकारी यांनी बचत गट महीलांचे कौतुक केले.   हर घर तिरंगा अभियान व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे त्यांनी सांगितले. तसेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डयांच्या ४१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी रुपेशजी दलाल यांनी मार्गदर्शन केले व नाबार्डची कारकीर्द सांगितली बचत गटानां कर्ज वाटप केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहलक्ष्मी महीला ग्रामविकास संस्थेच्या संचालिका संगीता पाटील यांनी केले. सरस्वती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुनील व्यवहारे यांनी

बंध रेशमाचे हि खास रचना वाचुया मीता नानवटकर लिखीत

  बंध रेशमाचे... मनापासून  जपतेय,गोड नाते हे प्रेमाचे मनगटावर बांधतेय,आज  बंध रेशमाचे काळजात काळजी,डोळ्यांत जिव्हाळा सुसंवादातून पाझरतो,भाव रंग निराळा मनी स्थान मानाचे,जणू स्पंदनं हृदयाचे मनगटावर बांधतेय,आज  बंध रेशमाचे कधी राग लटका,कधी हक्काने फटका  साहावा लागतो कधी,मौनाचाही चटका अलौकिक मित्रत्वाचे, सुमधूर आठवांचे मनगटावर बांधतेय,आज  बंध रेशमाचे जीवापाड जपले,हरेक क्षणातले गुपित अलवारपणे गोंजारले,सदा नयनकुपित वचन स्त्री आदराचे,आजन्म संरक्षणाचे मनगटावर बांधतेय,आज  बंध रेशमाचे अंतर जरी मैलांचे,ऐकू येईल आर्त साद  सप्तसुरांसम भासेल,अंतरी मंजूळ नाद  निरंतरी  आधाराचे, प्रतीक हे कर्तव्याचे मनगटावर बांधतेय,आज  बंध रेशमाचे औचित्य सणाचे,पण रोजचेच हे मागणे नितदिनी चमकावे, प्रगतीचे यश चांदणे मखमली  स्पर्शाचे, धागे हे  बहू मोलाचे मनगटावर बांधतेय, आज  बंध रेशमाचे ✍🏻मीता नानवटकर सावनेर , नागपुर

यु ट्युब सिल्वर च्या यशा बद्दल शेख अतीफ यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

✍🏻राजेश पाटील  किनवट ता. प्रतिनिधी: किनवट येथील क्रियाशील मेहनती कलाकार तथा यु ट्युबर , दिग्दर्शक शेख अतीफ यांना टिव्ही न्युज एक्सप्रेस यु ट्युब या चॅनल ला एक लाख विवर्स झाल्या बद्दल युट्युब ने अमेरीकेहुन  सिल्वर बटन आवार्ड पाठवले आहे हे त्यांच्या मेहनतीचे फळ आहे कारण त्यांनी  आदीवासी भागात जाऊन विविध ठिकाणी जाऊन  युट्युब शॉर्ट मुव्ही , न्युज कव्हर केले  या यशा बद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव व संपुर्ण टिम तर्फे शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी तालुका अध्यक्ष आशिष शेळके नसीर तगाले( तालुका सचिव) सय्यद नदीम( तालुका कार्याध्यक्ष) राजेश पाटील( तालुका उपाध्यक्ष) गौतम कांबळे( तालुका सरचिटणीस) रेहान खान( तालुका कोषाध्यक्ष) प्रणय कोवे( ता. सह सचिव) गंगाधर कदम ( तालुका प्रसिद्धी प्रमुख) राज माहुरकर( तालुका संघटक) अरविंद सुर्यवंशी( ता. संघटक) प्रज्वल कारले( ता. संघटक) मारोती देवकत्ते (ता. सहकोषाध्यक्ष) अक्रम चव्हाण( ता.सह संघटक) परमेश्वर पेशवे(ता.सह संघटक) इंद्रपाल कांबळे( ता.सह संघटक) रमेश परचाके( सदस्य) शेख सईद(सदस्य) विकास वाघमारे( सदस्य) गणेश यमजलवाड( स

स्वातंत्र्यदिनी रमेश राशलवार यांचा आत्मदहनाचा इशारा

  किनवट ता. बातमीदार:- किनवट नगर परषिदे द्वारा बेल्लोरी किनवट येथील पुरग्रस्त मातंग अनुसुचीत जाती समाजाला गत २० वर्षापासून नियोजित वस्तीवाढ राखीव क्षेत्र मौजे किनवट बेल्लोरी येथील भू. क्र १३०/१ क्षेत्रफळ ०.४९ आर जमीन न. प. च्या ताब्यात घेण्यात आली. परंतु पात्र पुरग्रस्त मातंग (अ.जा.)समाजाला वस्तीसाठी प्लाटींग वाटप न करता खोट्या आश्वासने देत वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे राशलवार यांनी असा इशारा दिला आहे की, १५ आगष्टपर्यत ह्या मागणीचा विचार न झाल्यास त्याच दिवशी कुठल्याही प्रशासकीय कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असे दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे. गत २००२ पासुन ते आज पर्यंत हया समाजाला दरवर्षी महापूराचा तडखा बसून अन्न धान्य व घराची नासधूस होऊन जिवण मरण्याची कसरत करावी लागत आहे. गेल्या २० वर्षापासून न.प. प्रशासन संबंधीत पूरग्रस्त मांतग समाजाला २००२ ला आश्वासन दिले होते कि, नियोजित वस्तीवाढ करु प्लाटींग करुन वस्ती स्थलांतरीत करणार असे लेखी आश्वासन दिले असे अनेक आश्वासनाचे लेखी प्रत आजही उपलब्ध आहेत. लोकशाही मार्गाने कित्येकवेळा आमरण उपोषण व आंदोलने केली. प्रत्येक वेळी लोक प्रतिनीधिंनी

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिलाध्यक्षा डॉ.सुधाताई कांबळे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित राष्ट्रीय स्तरावरचा आणाभाऊ साठे सामाजभूषण पुरस्कार प्रदान

  मुंबई : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती पर्व, दिल्ली लोकशाहीर जनकल्याण समिती, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०२ वी जयंती महाराष्ट्र सदन नवी दिल्ली येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या राज्य महिलाध्यक्षा डॉ. सुधाताई हरीश कांबळे यांना राष्ट्रीय स्तरावरचा अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले यांचे हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय अर्थमंत्री विनय सहस्रबुदधे, डॉ. शिवलिग शिवाचार्य महाराज, अशोक मेंढे, माजी आमदार राम गुंडीले, संयोजन समितीचे मुख्य सचिव विक्रम सोळसे, अध्यक्ष विशवनाथ सदामते, शारदा डोलारे, दिलीप सोळसे, केशव सरवदे, मधुकर सोनवणे, कमलेश गायकवाड अविनाश महातेकर आदी मान्यवर व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. राज्य महिला अध्यक्षा डॉ. सुधाताई कांबळे यांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेबद्दल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष, राज्य, विभाग, जिल्हा व तालुका

गोदावरी अर्बन सहकार क्षेत्रातील हायटेक संस्था -पाशा पटेल, यांची गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य मुख्यालयास भेट

  नांदेड, ता.६ (बातमीदार) – सहकार क्षेत्रात अनेक संस्था आहेत. परंतू संस्था सुरु करण्यामागचा अनेकांचा हेतू स्पष्ट नसतो. या उलट खासदार हेमंत पाटील व राजश्री पाटील यांनी सुरु केलेल्या गोदावरी अर्बन संस्थेचा पाच राज्यात झालेला विस्तार बघून त्यांचा सामान्य व्यक्तीस सहकारातून मदतीचा हात देण्याचा उद्देश अगदीच स्पष्ट दिसून येतो. यामुळे गोदावरी अर्बन हि सहकार क्षेत्रात अल्पावधितच राज्यातीलच नव्हे परराज्यातील सामान्य ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली एकमेव हायटेक संस्था असल्याचे कृषी मुल्य आयोगाचे माजी सदस्य पाशा पटेल यांनी म्हटले आहे.      सध्या नांदेड दौऱ्यावर असलेले पाशा पटेल यांनी शनिवारी (ता.सहा) तरोडा नाका परिसरातील गोदावरी अर्बनच्या सहकारसूर्य  मुख्यालयास भेट दिली. यावेळी गोदावरी समुहाच्या अध्यक्ष राजश्री पाटील यांनी श्री पटेल यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्प गुच्छ देऊन सत्कार केला. सोबतच बँक आफ महाराष्ट्र लातूर शाखेचे चिफमॅनेजर बिझनेस हेड मार्केटिंग नितीन श्रोत्री, बिझनेस डेव्हलमेंट आफिसर सोहम खरात, शिवसेनेचे प्रल्हाद इंगोले यांची उपस्थिती होती. दरम्यान पाशा पटेल यांनी सहकारसूर्य मुख

प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने केले होते आयोजन

पिंपरी चिंचवड :  प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ पिंपरी चिंचवड शाखेच्या वतीने माजी उपमहापौर व नगरसेवक केशव घोळवे यांच्या उपस्थितीत साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.  निगडी भक्ती शक्ती येथील साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी माजी उपमहापौर व नगरसेवक केशव घोळवे, प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र संघटक श्रीनिवास माने, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष संतोष रणसिंग, पिंपरी चिंचवड महिला शहराध्यक्षा सौ मंदा बनसोडे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. माजी उपमहापौर व नगरसेवक केशव घोळवे यांचे सामाजिक क्षेत्रात मोठे योगदान असून  कामगारांचे नेते म्हणून ते प्रसिद्ध आहेत कामगारांचे अनेक प्रश्न त्यांनी सोडवले आहेत. यावेळी माजी उपमहापौर व नगरसेवक केशव घोळवे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

नॅशनल मोबाईल मेडीकल युनिट टिम वॅन कमठाला येथे भेटीला

  (मारोती देवकत्ते प्रतिनिधी किनवट/कमठाला:-  सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत अतिसार, सर्दी, डेंगु, ताप, हिवताप, मलेरीया व कोरोना सारखे संसर्गजन्य विविध आजार उदभवण्याची शक्यता असते म्हणुन या बद्दल जनजागृती व तपासणी करण्यासाठी किनवट तालुक्यातील कमठाला येथे ३ ऑगष्ट ला दाखल झाली व गावकऱ्यांच्या विविध आजारांची तपासणी करण्यात आली हि मोबाईल मेडीकल युनीट वॅन किनवटहुन- माहुर येथील ग्रामीण भागत जाणार अशी माहीती डॉ. शुंभांगी कवाणे( वैद्यकीय अधिकारी) MO यांनी दिली  या वेळी रमाकांत जाधव ( लॅब टेक्निशियन) ,रमेश सूर्यवंशी ( सुपरवाईझर ), गजानन डोंगरे NMMU वाहन चालक, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र येथील कर्मचारी श्रीमती एम. एम. हिवाळे (आरोग्य सेविका),आर जी. ढोरे (कं. आरोग्य सेविका) ,पुनम भरकड (आशा वर्कर) शशिकला मेश्राम (अंगनवाडी कार्यकर्ती) तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी पाटील कऱ्हाळे,लक्ष्मण देवसरकर,घनश्याम पाटील कऱ्हाळे,तसेच संपुर्ण ग्रामस्थांनी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनी किल्ल्याच्या दर्शनी भागावर राष्ट्रध्वज फडकवा अन्यथा उपोषण माजी नगरसेवकाचा निवेदनाद्वारे उपोषनाचा इशारा

माहूर / प्रतिनिधी: माहूर गडावर असलेल्या किल्ल्यावर भारत देश स्वातंत्र्य झाल्यापासून राष्ट्रध्वज फडकविला जात होता. सुमारे दहा वर्षांपूर्वी अतिवृष्टी झाल्याने किल्ल्याचा दर्शनी भाग जेथे राष्ट्रध्वज फडकविला जात होता त्या जागेची पडझड झाली होती. शाषणाकडून त्या ठिकाणच्या दुरुस्तीसाठी कोट्यवधीचा निधी देवून त्या जागेची दुरुस्ती करून जागा राष्ट्रध्वज फडकविण्या योग्य बनविण्यात आली. ही बाब पुरातत्व विभाग व सा.बा. विभागाने लेखी तहसीलदार कार्यालयात कळविलेली आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी किल्ला व किल्ल्याच्या परिसरातील बऱ्याच वास्तूंची दुरुस्ती करण्यातयेऊन किल्ला पर्यटकांसाठी आकर्षनाचे केंद्रबनला आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतर गेल्या पाच वर्षांपासून माजी नगरसेवकाणे तहसीलदार पोलीस निरीक्षक आणि इतर संबंधित सर्व विभागाकडे निवेदना द्वारे किल्ल्याच्यादर्शनी भागावर राष्ट्रध्वज फडकवावा म्हणून मागणी करत आहे परंतु काही ना काही कारण पुढे करून पूर्वीच्या ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविला जात नाही. गेल्या ५ वर्षांपासून प्रत्येक दि. २६ जानेवारी, १५ ऑगस्ट, १७ सप्टेंबर, १ मे रोजी अपणासह इतर सर्व अधिकाऱ्यांना निवेदने

श्रावणमास व नागपंचमी निमित्त मिता नानवटकर यांची कविता वाचुया " झोका"

                    झोका...... धुंद    श्रावण  महिना हर्ष  उल्हास   देखणा सण  पंचमीचा   येता झोका  चढतो  गगना गाठ   यशाची  पेलते उंच  स्वप्नांची डहाळी दोर   संयमाचा  हाती रेघ  आशेची कपाळी ओढ   अनाम  अंतरी दोन  पायांना  उभारी मागे   ढकलून  माती वाजे वाऱ्याची तुतारी दुष्ट    हेलकावे   जरी बाह्य  संकटांचे   सारे आंतरिक    आनंदाचे बंद   मुठीत    सितारे मनं   हलके   फुलके देह       अहंकारशून्य    रितं   होता   सर्वोपरी जीव  वाटतो हा धन्य दु:ख,   वेदना,  विरह रीत  जुनीच   जीवनी समाधानी प्राजक्ताचा बांधू   बंगला   नयनी समतोल    विचारांचा झोका सभ्य वर्तनाचा मोठेपण     विसरूनी बालपण   जगण्याचा रोमरोम   आज   गाई नवं  जन्माचा सोहळा मखमली   कवितांचा जणू  पाऊस कोवळा मीता अशोक नानवटकर सावनेर,नागपूर. 9823219083.

विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळ, किनवटचे संस्थापक, अध्यक्ष स्व. प्रा. इंद्रसिंगजी राठोड यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 किनवट दि. 01.08.2022 येथिल विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळ, किनवटचे संस्थापक, अध्यक्ष स्व्. प्रा. इंद्रसिंगजी राठोड यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्य् विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10.00 वाजता स्व्. प्रा. इंद्रसिंगजी राठोड यांचे दोन्ही चिरंजीव ॲङ सचिनजी राठोड (अध्यक्ष विमुक्तजन् शिक्षण प्रसारक मंडळ, किनवट) व श्री प्रविणजी राठोड (नगरसेवक, न.प.किनवट) यांनी शेतातील समाधीस्थळी जाऊन विधीवत पुजन केले. संपूर्ण परिवारसह, नातेवाईक, मित्रमंडळी आणि संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असा मोठा परिवार आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होता. समाधीस्थळी वृक्षारोपन करण्यात आले.  त्यानंतर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांना वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.आर.लोंढे, डॉ. मनोज घडसिंग, डॉ. ढोले यांच्या उपस्थितीत फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले. विमुक्तजन् शिक्षण प्रसारक मंडळा अतंर्गत चालणाऱ्या वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय, सिंदखेड, सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्य्. व उच्च् माध्य्. विद्यालय, किनवट, रतनीबाई राठोड प्रा.शा.किनवट व इंदिरा गांधी माध्य्. विद्यालय, गोकुंदा या

कॉस्मोपॉलिटन विद्यालय किनवटचे मुख्यध्यापक डी.आर. बिच्चेवार सेवानिवृत्त

 किनवट:(तालूका प्रतिनिधी)             कॉस्मॉपॉलिटन विद्यालय किनवट येथील मुख्याध्यापक डी. आर. बिच्चेवार हे 31 जुलै रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून निरोप समारंभ  प्रसंगी त्यांचा आहेर, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देवुन सपत्नीक सत्कार करण्यात आला.           या वेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे जेष्ठ शिक्षक आर. व्ही घोरबांड, संस्थेचे सचिव पी. व्ही रामतिर्थकर, अध्यक्ष एन.व्ही रामतिर्थकर, जेष्ठ शिक्षक बी. एस. मोहिते, प्रिती रामतिर्थकर, बी.एस. मोहीते, एस.बी गज्जलवार, वाय.एम.राठोड, पी.आर कदम, आर.आर. बारापात्रे, एस. डी बामणीकर आदी मान्यवर उपस्थित होते.             कॉस्मापॉलिटन विद्यालय  किनवट येथे डी.आर बिच्चेवार  यांनी 35 वर्षे प्रदीर्घ सेवा पुर्ण केली. या काळात शाळेला अच्छे दिन आलेले आहे. शारीरिक शिक्षक म्हणून  तालुक्यात प्रसिद्ध होते. लवचिक, निर्भीड व्यक्तिमत्व, समयसूचकता, सडेतोडपणा हे त्यांचे विशेष. यावेळी शालांत प्रमाणपत्र परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा शाळेतर्फे पारितोषिक देऊन सहपरिवार सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. एम पुराणिक, परिचय व