Skip to main content

नाबार्डच्या ४१ व्या वर्धापन दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियानात गृहलक्ष्मी महीला ग्राम विकास संस्थेचे योगदान मोलाचे- मा.किर्तिकिरण एच. पुजार( प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी ए.आ.वि.प्र. किनवट)

 


किनवट ता. प्रतिनिधी:-

भारताला स्वातत्र्यं मिळुन ७५ वर्ष पुर्ण होत आहे यंदाचे वर्ष हे अमृत महोत्सवाच आहे मन की बात कार्यक्रमातुन 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हर घर तिरंगा या अभियानाला भारतभरातुन  प्रतिसाद मिळत आहे याचाच एक भाग म्हणुन किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी मा.किर्तीकिरण एच. पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली गृहलक्ष्मी महिला ग्राम विकास संस्था किनवटच्या महिला बचत गटाच्या महिलांनी २०००राष्ट्रध्वज शिवल्याबद्दल मा.किर्तीकिरण एच. पुजार सहायक जिल्हाधिकारी यांनी बचत गट महीलांचे कौतुक केले. 

 हर घर तिरंगा अभियान व स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करावा असे त्यांनी सांगितले.


तसेच राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक नाबार्डयांच्या ४१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखाधिकारी रुपेशजी दलाल यांनी मार्गदर्शन केले व नाबार्डची कारकीर्द सांगितली बचत गटानां कर्ज वाटप केले .

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक गृहलक्ष्मी महीला ग्रामविकास संस्थेच्या संचालिका संगीता पाटील यांनी केले. सरस्वती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुनील व्यवहारे यांनी किनवट या आदिवासी दुर्गम भागातील महिला बचत गटाच्या माध्यमातून  लघुउद्योग व विविध गृह उद्योगातूनआपल्या वस्तू व खाद्यपदार्थह्या विदेशापर्यंत जाऊन त्यांची मागणी विदेशातून सुद्धा व्हावी असा मानस बोलून दाखविला तर पंढरीनाथ ठाकरे यांनी महिला बचत गट यांनी आर्थिक नियोजन कसे करावे बँकेकडून मिळालेल्या कर्जाचा उपयोग कशाप्रकारे करावा याचे महत्त्व सांगितले .

या कार्यक्रमात राधा बोलेनवार यांचा व ज्या ज्या महिलांनी झेंडे शिवले त्यांचा सत्कार करण्यात आला  कार्यकमाचे सुत्रसंचालन राजेश पाटील यांनी केले तर आभार आत्मानंद सत्यवंश यांनी मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वर्षा गिरे (सरपंच मदनापुर), राधा बोलेनवार, रुचीता फुलझेले ,  आदींनी सहकार्य केले.


ठळक मुद्दे:

▪️बचत गटाच्या महीलांनी स्वत:२००० झेंडे शिवले

▪️सहायक जिल्हाधिकारी/प्रकल्पाधिकारी यांना केले सुपुर्द

▪️बचत गटाच्या महीलांनी नोंदवला सक्रीय सहभाग

▪️या दरम्यान महाराष्ट्र ग्रामिण बँकेचे मुख्य शाखा अधिकारी रुपेश दलाल यांच्या उपस्थितीत महीला बचत गटांना JLG/SHG कर्ज वितरण करण्यात आले.

▪️ एम जी बी शाखा अधिकारी रुपेश दलाल, सरस्वती महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. सुनिल व्यवहारे, बीसी पंढरीनाथ ठाकरे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले .

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...