Skip to main content

गणपती बाप्पा झाले डाऊनलोड...

 


कोरोना व्हायरस पासून मुक्त होऊन गणपती पृथ्वीतलावर पुढील दहा दिवसांसाठी डाऊनलोड झाले. एखाद्या चांगल्या ॲप्स चे पिक्चर जसे कार्य करते अगदी तसेच पुढील दहा दिवसांसाठी पृथ्वीतलावर गणपती डाउनलोड झाल्यावर सर्व लोक त्यांच्यासाठी एका फीचर्स प्रमाणे उत्तम उत्तम कामं करण्यासाठी एकत्र येतात.

 नुकतेच गणेशोत्सवाला सुरुवात झाली म्हणून आपण जोरदार तयारीला लागलो. केवढी उत्सुकता ! आपल्या घरात दहा दिवसांसाठी एक छोटासा पाहूणा येणार म्हणून तयारी चाललेली असते. मोबाईल बॉक्स मध्ये एखादे ॲप डाऊनलोड केल्यानंतर एखादी जागा व्यापते तसेच गणपती सुद्धा आपल्या घरात डाऊनलोड झाल्यावर घर छोटे असो वा मोठे असो ती आपल्या घरातील नुसतीच जागा नाही तर संपूर्ण घर मंत्रमुग्ध करून व्यापून घेते. एखाद्या मोबाईल मधील एखादे फीचर्स आपल्याला खूप आवडत असते. तसेच, आता घरातील ती जागा भिंतीचा कोपरा म्हणून राहीलेला नसतो. तर ती जागा आपल्या श्रद्धेचे , भाव-भावनांशी जुळलेली जागा असते...

अतिशय सुंदर असे सुशोभीकरण करून तिथे गणपतीला विराजमान करतो.

टेबलावर दोन्ही बाजूंनी झिरझिरीत पडदे सोडले जातात. घुगूरमाळा सोडल्या जातात. गणपतीला बसवण्यासाठी सुंदर मखराची सजावट केली जाते. गणपतीला बसवायला मऊ-मऊ मखमलीचे आसन केले जाते. त्याच्या मुगूटाच्या पाठीमागे विद्यूतप्रवाहाद्वारे सुशोभित कागदांचे सुदर्शन चक्र सतत फिरते ठेवले जाते. असा सर्व देखावा नेत्रदीपक केला जातो. वेगवेगळ्या रंगाचे चकचकीत कागद लावून चकाकत्या झुरमुळया गणपतीच्या दोन्ही बाजूला सोडल्या जातात.

    आप-आपल्या सवडीने व आवडीने मनाजोगे हवं ते सुशोभीकरण करत असतो.

मनोरंजनासाठी गणपतींच्या गाण्याची गीते चालू ठेवली जातात.त्यामुळे सर्व घरभर धार्मिक वातावरण तयार होते. अशा प्रकारे घरा-घरात , गल्ली-बोळात,अगदी सर्वत्र गणपती डाउनलोड होतात.

बर्याच मंडळांमध्ये विविध प्रकारचे देखावे केले जातात.ते पाहून मन प्रफुल्लीत होते.  गणेशोत्सवाच्या निमित्ताने मंडळे ही नाटक, कलापथक, वगनाट्य, चित्रकला,खेळ, विविध स्पर्धेचे आयोजन करतात. यांचे पुर्वनियोजन केले जाते आणि तशी तयारी ही ठेवली जाते. 

 गणपती ११ दिवसांचा असल्याने सर्व दिवस कार्यक्रमांची रेलचेल असते. निरनिराळे कलाकार आपले कलागुण दाखवत असल्याने त्यांच्या गुणांना वाव मिळत असतो. रोज नवनवीन प्रसाद असल्याने बालचमू आरतीच्या कार्यक्रमाला प्रचंड संख्येने हजेरी लावतात. सर्व गरीब-श्रीमंत एकजुटीने इथे गणरायाची ओवाळणी करण्यात दंग असतात. इथे उच्च, निच हा भेद विसरुन एकजूटीने गणेशोत्सव साजरा केला जातो. म्हणूनच, विषमता नष्ट होण्यास मदत होते. दुसऱ्यांची कुरापत न काढता एकत्र येतात. व आपल्याच घरचे कार्य असल्याप्रमाणे एकजूटीने सर्व कामे पार पाडतात. 

११ व्या दिवशी महाप्रसाद, बँडपथक व लेझीमच्या खणखणाटात 'गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या’अशा आरोळ्यांनी परिसर दुमदुमुन निघतो व गणपतीबाप्पाला निरोप दिला जातो. या मिरवणूकीत सर्व आबालवृद्ध सामील करून असंख्य अश्या फीचर्स ची सेवा करवून गणराया Uninstall म्हणजेच विसर्जित केला जातो.



सौ.रूचिरा बेटकर नांदेड

9970774211

Comments

Popular posts from this blog

"धरती आबा जन-भागीदारी अभियान राबवण्यात आले"

(राजेश पाटील/किनवट)   मोजे दरसांगवी(सि.)       ग्रामपंचायत कार्यालय ता. किनवट जिल्हा नांदेड    येथे "धरती आबा जन-भागीदारी अभियान"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .  नरसांगी गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके यांच्या हस्ते सर्वप्रथम धरती आबा भगवान  बिरसा मुंडा आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले    तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच श्री शशांक सुभाष कन्नाके, उपसरपंच श्रीमती सुरेखा विजय राठोड व ग्राम विकास अधिकारी विष्णू पांचाळ प्रभाकर एन्लेवार तसेच गावातील सर्व नागरिक यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली 1. आधार कार्ड 2. आयुष्यमान कार्ड  3. पी एम किसान योजना  4. जनधन खाते 5. शिष्यवृत्ती कव्हरेज      वरील सर्व योजना कार्यक्रमात राबविण्यात आल्या    या कार्यक्रमाचे सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी महसूल विभागातील श्रीमती शिल्पा राठोड (तलाठी),  श्री विकास पुरी, सहाय्यक कृषी अधिकारी,ग्रामविकास अधिकारी श्री शेळके साहेब,आरोग्य विभ...

आदिवासी विकास समिती मराठवाडा अध्यक्ष पदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती

 किनवट: राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी प्रणय रमेश कोवे यांची नियुक्ती, आज दिनांक 18 एप्रिल 2024 रोजी किनवट येथील गोकुंदा शासकीय विश्रामगृह येथे दैनिक वीर शिरोमणी वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष शंकरसिंह ठाकुर सर तसेच दैनिक सा.नंदगिरीचा कानोसा या वृत्तपत्राचे संपादक राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष मारोती शिकारे सर नांदेड जिल्हाअध्यक्ष विनायक कामठेकर सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक घेऊन राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ संचलित आदिवासी विकास समितीच्या मराठवाडा अध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय जी सूर्यवंशी सर यांनी निवड जाहीर झाल्याबरोबर फोन वर अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या शुभेच्छांचा स्वीकार करत ट्रायबल सेवा न्यूज चॅनेल चे संपादक प्रणय कोवे  यांनी नांदेड जिल्हाअध्यक्ष पदावरून मराठवाडा अध्यक्ष या पदावर नियुक्ती केल्याबद्दल सरांचे मनःपूर्वक आभार मानले  प्रणय कोवे हे गेल्या अनेक वर्षापासू...

१० वर्षीय अरफात मलीक चव्हाण ने ठेवला आयुष्यातील पहिला रोजा

  किनवट प्रतिनिधि : इस्लाम धर्मात पवित्र रमजान या महिन्याला अनन्य महत्व प्राप्त आहेया महिन्यात सर्वच मुस्लिम बांधव यांच्यावर वयाच्या दहाव्या वर्षा पासून रोजा (उपवास) फर्ज (सक्तीचें) असतात.लहानपासून मोठ्यापर्यत या महिन्यांमध्ये 30 दिवस रोजा धरत असतात. पालकांचे पाहून लहान मुलांनाही रोजा धरण्याची लालसा निर्माण होते. त्यामुळे लहान चिमुकले ही मोठ्यांचे अनुकरण करीत रोजा (उपवास) धरतात.अशाच प्रकारे किनवट येथील मलीक चव्हाण यांचा 10 वर्षाचा मुलगा अरफात चव्हाण यांनी आपल्या जीवनातील पहिला रोजा सोमवारी 10 मार्च रोजी पूर्ण केला.मुस्लिम समाजात पवित्र असणाऱ्या या महिन्यात संपूर्ण महिनाभर दिवसभर पाणी न पिता उपवास ठेवला जातो.यावर्षी रोजा (उपवास) सकाळी 5.10 वाजता सुरू होत असून संध्याकाळी 6.28 ला रोजा सोडण्याची वेळ आहे.13 तासा पेक्षा जास्त वेळचा उपवास असल्याने या उष्णतेचा मोठ्या माणसांनादेखील खूप त्रस होतो.त्यात या चिमुकल्याने पहिला रौजा ठैवून आपल्या आयुष्याची सुरुवात एक चांगल्या प्रकारे व्हावी या हेतूने उपवास ठैेवला.त्यामुळे अरफात मलिक चव्हाण यांचे सर्व्र कौतुक होत आहे.