Skip to main content

विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळ, किनवटचे संस्थापक, अध्यक्ष स्व. प्रा. इंद्रसिंगजी राठोड यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन



 किनवट दि. 01.08.2022 येथिल विमुक्तजन शिक्षण प्रसारक मंडळ, किनवटचे संस्थापक, अध्यक्ष स्व्. प्रा. इंद्रसिंगजी राठोड यांच्या प्रथम पुण्यस्मरणा निमित्य् विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सकाळी 10.00 वाजता स्व्. प्रा. इंद्रसिंगजी राठोड यांचे दोन्ही चिरंजीव ॲङ सचिनजी राठोड (अध्यक्ष विमुक्तजन् शिक्षण प्रसारक मंडळ, किनवट) व श्री प्रविणजी राठोड (नगरसेवक, न.प.किनवट) यांनी शेतातील समाधीस्थळी जाऊन विधीवत पुजन केले. संपूर्ण परिवारसह, नातेवाईक, मित्रमंडळी आणि संपूर्ण शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी असा मोठा परिवार आदरांजली अर्पण करण्यासाठी उपस्थित होता. समाधीस्थळी वृक्षारोपन करण्यात आले. 



त्यानंतर उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या रूग्णांना वैद्यकीय अधिकारी डॉ. एस.आर.लोंढे, डॉ. मनोज घडसिंग, डॉ. ढोले यांच्या उपस्थितीत फळे व बिस्किटे वाटप करण्यात आले. विमुक्तजन् शिक्षण प्रसारक मंडळा अतंर्गत चालणाऱ्या वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालय, सिंदखेड, सुमतीबाई हेमसिंग नाईक कन्या माध्य्. व उच्च् माध्य्. विद्यालय, किनवट, रतनीबाई राठोड प्रा.शा.किनवट व इंदिरा गांधी माध्य्. विद्यालय, गोकुंदा या शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना खाऊ देण्यात आला. किनवट येथील संथागार वृध्दाश्रमात अन्नदान करण्यात आले. प्रथम पुण्य् तिथी निमित्य् शाळांमध्ये सामान्य् ज्ञान स्पर्धा, चित्ररंग भरण अशा विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. दुपारी ॲङ सचिनजी राठोड यांचे राहते घरी स्व्. प्रा. इंद्रसिंगजी राठोड साहेबांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांच्या पावनस्मृतीस विनम्र् आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी श्री मोहन जाधव (अकोला), श्री परशुराम चव्हाण (नांदेड), श्री प्रभुसिंग नाईक, श्री शाम नाईक (हिवळणी), श्री सुभाष जाधव (तहसीलदार, कारंजा), प्रा.पांडूरंग पवार, ॲङ शंकर राठोड, श्री अखिल खान, श्री साजीद खान (मा.नगराध्यक्ष), प्रा.सुनिल व्यवहारे, प्रा.शिंदे, प्रा. पंजाब शेरे, गिरीश नेम्मानीवार, श्री प्रदिप वाकोडीकर, श्री प्रमोद पोहरकर, श्री गोकुळ भवरे, श्री विजय जोशी आदि पत्रकारासह मान्यवर् उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

किनवट येथील बसस्थानक परिसरात एड्स जनजागृती कार्यक्रम

  किनवट ता. प्रतीनिधी: दि . २४ सकाळी ९. वाजता किनवट बसस्थानक परिसरात  एच आय व्ही - एड्स आणि गुप्त रोग प्रतिबंधक उपचार आणि नियंत्रण कार्यक्रम महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रन संस्था मुंबई  व जोशाबा उद्योग विकास मिशन समुह सिडको नांदेड आणि जिल्हा एड्स प्रतिबंध व नियत्रंन कक्ष नांदेड याच्या वतिने घेण्यात आला. आयोजीत कार्यक्रमात शाहीर साहेबराव नरंगलकर यांच्या सह किनवट येथील कवि गितकार अशोक वासाटे यांच्या एड्स जनजागृती रचना ,गायक आत्मानंद सत्यवंश , शाहीर दिलीप मुनेश्वर, शाहीर दिलीप कोसले ,संगीत गणेश शेवाळे ,नृत्यकलाकार शेख चाँद पाशा नांदेडकर ,बेंजो सोनकांबळे ,ढोलक प्रकाश येरेकार तबला छोटु वाघमारे गायक ,बालाजी येलूरवाड ,जर्नाधन भगत ,गायीका वाघमारे ताई ,राजेश घोडाम ,संजय ठोके ,साहेबराव वाढवे या संपूर्ण कलावंत संचानी उपस्थीत प्रवासी व अनेक गावातील जनतेसमोर कर्मचारी वृंदासह एड्स जाणीव जागृती या विषयी बहारादार मनोरंजनाच्या माध्यमातून प्रबोधन केले. सर्व स्तरातुन कलाकारांचे कौतूक होत आहे हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी किनवट येथील  प्रगल्भ  व प्रसिद्ध कवि मा .अशोक वासाटे मा. रा...

महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्षरोदय साहित्य मंडळाचे कविसंमेलन

  नांदेड : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त 'अक्षरोदय साहित्य मंडळ, महाराष्ट्र राज्य' या प्रतिष्ठित साहित्य संस्थेतर्फे १४ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता माता रमाई आंबेडकर बुद्ध विहार, सहयोग नगर, नांदेड येथे कविसंमेलनाचे आयोजन केले आहे. कविसंमेलनाचे अध्यक्षस्थानी चंद्रकांत चव्हाण हे राहणार असून, प्रमुख पाहुणे डॉ. भीमराव हटकर, अनुरत्न वाघमारे आणि प्रमुख पाहुण्या जया सूर्यवंशी हे उपस्थित राहणार आहेत. साहित्य, समाजकारण आणि बौद्ध संस्कृती यामध्ये योगदान देणाऱ्या या मान्यवरांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. या कविसंमेलनात राज्यभरातील विख्यात, लोकप्रिय आणि उदयोन्मुख कवी मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. त्यात प्रमुख पंडित पाटील बेरळीकर, प्रज्ञाधर ढवळे, नागोराव डोंगरे, रुपाली वाघरे, अशोक कुबडे, दत्ता वंजे, शिवाजी होळकर, जाफर आदमपूरकर, थोरात बंधू, आ. ग. ढवळे, महेंद्र भगत, निवृत्ती लोणे, शैलेश कवठेकर, चंद्रकांत कदम, दिगंबर कानोले, गजानन हिंगमिरे, अंजली मुनेश्वर, रुचिरा बेटकर, सुमेध घुगरे, बाबुराव पाईकराव, साईनाथ रहाटकर, संजय ...

​किनवट नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्यपदी प्रशांत कोरडे यांची बिनविरोध निवड.

 जो मै बोलता हू,ओ मै करता हू..!करण एंड्रलवार  यांच्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया    तालुका प्रतिनिधी ​किनवट : किनवट नगर परिषदेतील महाविकास आघाडीच्या कोट्यातील रिक्त असलेल्या स्वीकृत सदस्य पदासाठी आज अत्यंत उत्साही वातावरणात निवडणूक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत शिवसेना (उबाठा) गटाचे शहर प्रमुख आणि युवानेते करण एंड्रलवार यांचे खंदे समर्थक प्रशांत सुरेशराव कोरडे यांची स्वीकृत सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले. ​जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या आदेशानुसार, आज  किनवट नगर परिषदेच्या सभागृहात ही निवड प्रक्रिया पार पडली. महाविकास आघाडीच्या वतीने प्रशांत कोरडे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे पीठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद एंड्रलवार यांनी त्यांची अधिकृत निवड झाल्याची घोषणा केली. नगरपरिषदेच्या निवडणुकीवेळी करण एंड्रलवार यांनी प्रशांत कोरडे यांना स्वीकृत नगरसेवकपदाचा शब्द दिला होता. आज तो शब्द पूर्ण  केला असुन 'जे बोलतो, ते  करून दाखवतो', हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे.  प्रशांत कोरडे यांच्या निवडीनंत...